गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे,गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

मुंबई, दि. 5 : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.

गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. श्री.वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.

देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

‘भारताने जगाला प्राणीमात्र, निसर्ग व वसुंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार दिला’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 5 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार  मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे-पाटील यांचेकडे  देण्यास मंजूरी दिली आहे.

दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, मंत्री, ग्रामविकास यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.

महाविकास आघाडीच्या 2 मंत्र्यांचा राजीनामा

अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं होतं. महाविकासआघाडी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. पण अनिल देशमुख यांचा राजीनामा सरकारने घेतला नव्हता. पण आज अखेर न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर गेली आहे.

अनिल देशमुख यांच्याआधी माजी वनमंत्री संजय राठोड यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता. संजय राठोड यांच्यावर देखील गंभीर आरोप झाले होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दबाव वाढल्यानंतर संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं.दीड वर्षात महाविकासआघाडी सरकारमधील आधी शिवसेनेचे संजय राठोड आणि आता राष्ट्रवादीचे अनिल देशमुख अशा 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.