देशातील सक्रिय रूग्णांत एकट्या महाराष्ट्राचा वाटा 58.23%

भारतातील एकूण लसीकरणाने गाठला जवळपास 8 कोटींचा टप्पा
India's Cumulative Vaccination Coverage nears 8 Crore Mark | Odisha  Breaking News | Odisha News | Latest Odisha News| Odisha Diary

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2021 

कोविड -19  विरूद्धच्या लढा देण्याच्या  देशाच्या  महत्त्वपूर्ण प्रगतीमध्ये, देशभरात  दिल्या गेलेल्या कोविड -19  विरूद्धच्या लसींच्या डोसची एकूण संख्या आज 7.9 कोटींवर गेली आहे.देशातील एकूण सक्रिय रूग्णांत एकट्या महाराष्ट्राचा वाटा 58.23% आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 12,31,148 सत्रांद्वारे ,7,91,05,163 लसींचे डोस दिले गेले आहेत.

HCWsFLWsOver 45 years Total
1st Dose2nd Dose1st Dose2nd Dose1st Dose2nd Dose
90,09,35353,43,49397,37,85041,33,9614,99,31,6359,48,8717,91,05,163
Date: 4th April,2021
HCWsFLWsOver 45 yearsTotal Achievement
1stDose2ndDose1stDose2nd Dose1stDose2ndDose1stDose2ndDose
1,4709,4612,66516,54715,36,54171,78015,40,67697,788

8 राज्यांत आत्तापर्यंत एकूण 60% संचयित लसीकरण झाले आहे.देशात दररोज आढळणा-या रूग्णसंख्येत वाढ होत आहे.

गेल्या 24 तासांत एक लाखांहून अधिक (1,03 558) नव्या रूग्णांची नोंद झाली.महाराष्ट्रात सर्वाधिक 57,074 (55.11%) नव्या रूग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 5,250 तर कर्नाटकात 4,553 नव्या रूग्णांची नोंद झाली.देशातील एकूण रूग्णसंख्या आता 7,41,830 इतकी झाली आहे.ही संख्या एकूण सक्रीय रूग्णसंख्येच्या 5.89% इतकी आहे. गेल्या 24 तासांत 50,233 नव्या सक्रीय रूग्णांची नोंद झाली.देशातील एकूण सक्रिय रूग्णांत एकट्या महाराष्ट्राचा वाटा 58.23% आहे.गेल्या 24 तासांत 478 मृत्यूंची नोंद झाली.

8 राज्यातील मृत्यूंचे प्रमाण 84.52%इतके आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यूंची म्हणजे 222 नोंद झाली.त्याखालोखाल पंजाबमधे 51 मृत्यू झाले.