महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 9 पटीने वाढली,सक्रीय रुग्णांपैकी जवळजवळ 59.36% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात

भारतातील एकूण लसीकरण मात्रांची संख्या 7.3 कोटींहून जास्त
देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोज सापडणाऱ्या नव्या बाधितांच्या संख्येत तीव्र वाढ

नवी दिल्ली,३ एप्रिल २०२१:

कोविड-19 विरोधात सुरु असलेल्या लढ्यात महत्त्वाचा टप्पा गाठत, आज देशातील कोविड-19 प्रतिबंधक लसीची मात्रा घेणाऱ्यांच्या संख्येने 7.3 कोटींचा आकडा पार केला आहे.देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्येच्या निम्मे, 50 % रुग्ण फक्त 10 जिल्ह्यांमध्ये आहेत.त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे.  

साकल्याने विचार करता, आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अंतरिम अहवालानुसार, देशात, 11,53,614 सत्रांच्या आयोजनाद्वारे कोविड लसीच्या 7,30,54,295 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 89,32,642 आरोग्य सेवा कर्मचारी(पहिली मात्रा), 52,96,666 आरोग्य सेवा कर्मचारी (दुसरी मात्रा), 95,71,610 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 39,92,094 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले 4,45,77,337 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 6,83,946 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

एकुणात विचार करता पहिल्या मात्रेची आकडेवारी 6 कोटीपेक्षा जास्त (6,30,81,589) आणि दुसऱ्या मात्रेची आकडेवारी देखील 1 कोटीच्या जवळपास (99,72,706) पोहोचली आहे.

HCWsFLWsOver 45 years Total
1st Dose2nd Dose1st Dose2nd Dose1st Dose2nd Dose
89,32,64252,96,66695,71,61039,92,0944,45,77,3376,83,9467,30,54,295

लसीकरण मोहिमेच्या 77 व्या दिवशी, काल 2 एप्रिल 2021 रोजी कोविड लसीच्या 30,93,795 मात्रा देण्यात आल्या. यापैकी, 35,624 लसीकरण सत्रांच्या आयोजनाद्वारे 28,87,779 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 2,06,016 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांमध्ये रोज सापडणाऱ्या नव्य कोविड ग्रस्तांच्या संख्येत तीव्र वाढ दिसून येत आहे. नव्याने नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 81.42% रुग्ण या आठ राज्यांमधील आहेत.

गेल्या 24 तासांत, 89,129 नव्या कोविड ग्रस्तांची नोंद झाली.या कालावधीत सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 47,913 रुग्णांची नोंद झाली. तर कर्नाटकात 4,991 आणि छत्तीसगडमध्ये 4,174 नवे रुग्ण सापडले.

भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या 6,58,909 पर्यंत पोहोचली आहे. हे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या 5.32% आहे. गेल्या 24 तासांत, देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येत 44,213 ने घट झाली.

देशातील सर्वात जास्त कोविड सक्रीय रुग्णसंख्या असलेल्या 10 राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढीचे गेल्या 2 महिन्यातील (3 फेब्रुवारी 2021 ते 3 एप्रिल 2021) तुलनात्मक विश्लेषण खालील आलेखात दर्शविले आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 9 पटीने वाढली आहे. टक्केवारीचा विचार केला तर पंजाबमध्ये सक्रीय रुग्णसंख्या सर्वात जास्त टक्क्यांनी वाढली आहे.देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 77.3% रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ आणि पंजाब या पाच राज्यात आहेत. एकूण सक्रीय रुग्णांपैकी जवळजवळ 60% (59.36%) रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

मंत्रिमंडळ सचिव राजीव गऊबा यांनी काल सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, पोलीद महासंचालक आणि आरोग्य सचिवांची आढावा बैठक घेतली. रोज मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण सापडत असलेल्या तसेच जास्त मृत्युदर असणाऱ्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील परिस्थितीवर या बैठकीत प्रामुख्याने विचार करण्यात आला. या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना “गंभीर चिंताजनक परिस्थिती” असलेल्या राज्यांचा दर्जा देण्यात आला असून त्यांना सक्रीय रुग्ण आणि प्रतिदिन मृत्यू यांच्या नियंत्रणासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना हाती घेण्याचे निर्दश देण्यात आले आहेत. यामध्ये, चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, कडक प्रतिबंधन, त्वरित संपर्क शोध आणि कोविड योग्य आचार संहितेची सक्तीची अंमलबजावणी तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांन यापूर्वी सांगण्यात आलेल्या प्रमाणित आरोग्य व्यवस्थापन नियमावलीचे पालन या उपाययोजनांचा समावेश आहे. कोविड-19 आजाराशी लढा देण्यासाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक आरोग्य उपायांसाठी आणि वैद्यकीय व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना साधने आणि मदत देणे सुरूच ठेवेल यावर या बैठकीत भर देण्यात आला.

भारतात आतापर्यंत कोविड मुक्त झालेल्यांची संख्या 1,15,69,241 आहे. राष्ट्रीय रोगमुक्ती दर 93.36% आहे.

गेल्या 24 तासांत 44,202 रुग्ण कोविड मुक्त झाले.गेल्या 24 तासांत, कोविडमुळे 714 रुग्णांचा मृत्यू झाला.यापैकी 85.85% रुग्ण देशाच्या सहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 481 कोविड ग्रस्तांचा मृत्यू झाला, तर पंजाबमध्ये एका दिवसात 57 रुग्ण दगावले.देशातील ओदिशा, आसाम,लडाख (कें.प्र.), दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, लक्षद्वीप, मेघालय,मिझोरम, अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि अरुणाचल प्रदेश या 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोविड संसर्गामुळे रुग्ण दगावल्याची नोंद झालेली नाही.