कोरोना साथीची वर्षेपूर्ती:उस्मानाबाद जिल्हयात वैद्यकीय सुविधा वाढवण्याबरोबरच लसीकरणाची गतीही वाढविण्यात यश

1 एप्रिल 2021 रोजीची पॉझिटिव्हीटीची टक्केवारी 19.8

उस्मानाबाद,दि.02:-  उस्मानाबाद जिल्हयात पहिला कोरोना बांधित रुग्ण आढळून आल्याच्या घटनेस आज एक वर्षे पूर्ण झाले आहे .  गेल्या वर्षभरात कोरोना बांधित रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहावयास मिळाला.20 हजार 881 रुग्णं आढळून आले. त्यापैकी 18 हजार 248 रुग्णं बरे होऊन घरी गेले,तर 600 रुग्णांचा मृत्यू झाला. 1 एप्रिल 2021 रोजी जिल्हयात एका  दिवसातील रुग्णं संख्या 283 होती.या पर्शिवभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा वाढवण्याबरोबरच जिल्ह्यात लसीकरणास गती देण्यात आली आहे .आता नागरिकांनी कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सजगता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रत्यक्ष जीवनात आपण पॉझिटिव्हीटी असावी असे नेहमी ऐकतो पण कोरानाची पॉझिटिव्हीटी वेदनादायक असल्याने कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर जो आनंद होतो, तो जीवनातील पॉझिटिव्हीटी मध्ये अनुभवता येत नाही.आता तर जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने गंभरी रुग्णांची कशी व्यवस्था करावी अशी चिंता बळावते आहे. 1 फेब्रुवारी 2021 रोजी पाच रुग्णं पॉझिटिव्ह होते.ती संख्या कालपर्यंत तिनशेच्या वर  पोहोचली आहे.

जिल्हयात गेल्या वर्षी सर्वाधिक रुग्णं सप्टेंबर 2020 मध्ये 6 हजार 488 होते.ऑगस्ट 2020 मधील रुग्णं संख्या 4 हजार 524 होती तर ऑक्टोंबर 2020 मध्ये 2 हजार 554 रुग्णं संख्या होती.या वर्षी गेल्या मार्च 2021 मध्ये 3 हजार 246 पॉझिटिव्ह रुग्णं आढळून आले. 1 मार्च 2021 रोजी पॉझिटिव्ह रुग्णांची  टक्केवारी 8 टक्के होती.ही टक्केवारी 31 मार्च 2021 रोजी 19.8 टक्कयावर जाऊन पोहोचली.म्हणजे 1 मार्च ते  31 मार्च 2021 दरम्यान रुग्ण पॉझिटिव्हीटीची टक्केवारी दुप्पटीपेक्षा अधिक झाली आहे.1 मार्चला केवळ 9 रुग्णं पॉझिटिव्ह आले होते.31 मार्च 2021 रोजी  ही रुग्णं संख्या 260 वर जाऊन पोहोचली.9 मार्च 2021  पर्यंत रोजची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 50 च्या आत होती , ती  10 मार्च 2021 नंतर 50 रुग्णांपेक्षा अधिक होत गेली.17 मार्च 2021 रोजी या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली. 20 मार्च 2021 रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 150 पेक्षा जास्त  झाली . 26 मार्च 2021 रोजी या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनशेच्या पार गेली, तर 30 मार्च 2021 नंतर  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 250 च्या पुढेच येत आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 17 मार्च 2021 पर्यंत एक अंकी होती . ती 21 मार्च 2021 नंतर दोन अंकी झाली.कालचा म्हणजे 1 एप्रिल 2021 रोजीची पॉझिटिव्हीटीची टक्केवारी 19.8 झाली आहे.त्यामुळे जिल्हयातील नागरिकांनीच आता कोरोनाला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना प्रतिसाद देऊन सहकार्य करण्याची गरज आहे.     

जिल्हयात 1 एप्रिल 2021 रोजी 1 हजार 441 कोरोना टेस्ट करण्यात आल्या,त्यापैकी 285 जण पॉझिटिव्ह आले.काल पर्यंत जिल्हयात 2 हजार 33 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 600 जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्हयाची कोरोना बरे होण्याची टक्केवारी 87.4 टक्के आहे.तर मृत्यू दर 2.9 टक्के आहे.1 एप्रिल 2021 पर्यंत जिल्हयात  1 लाख 89 हजार 945 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.यातील 63 हजार 93 लोकांची आरटीपीसीआर कोरोना टेस्ट केल्या गेल्या तर 95 हजार 852 लोकांच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आल्या.जिल्हयांचा कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 13.1 टक्के तर आरटीपीसीआर टेस्टची पॉझिटिव्हीटीची 16.4 टक्के आहे.रॅपिड ॲन्टीजन टेस्टची पॉझिटिव्हीटीची 11 टक्के आहे.       

जिल्हयातील काल पर्यंतची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20 हजार 881 आहे.1 लाख 99 हजार 303 कॉन्टॅक्ट शेाधण्यात आले आहेत , त्याची टक्केवारी 9.6 होती.जिल्हयात काल पर्यंत 64 हजार 861 अती गंभीर रुग्णं होते.त्याची टक्केवारी 3.2 होती,तर 1 लाख 34 हजार 442 रुग्णं अती गंभीर प्रकारातील नव्हते, त्याची टक्केवारी 6.4 टक्के आहे.         

जिल्हयात कोरोना लसीकरणाचे काम नियोजनपूर्ण पध्दतीने गतीमान करण्यात आले आहे.1 एप्रिल 2021 पर्यंत कोरोना लसीकरणासाठी रोज 16 सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.1 एप्रिल 2021 रोजी 2 हजार 894 जणांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 2 हजार 677 जाणांना पहिल्यांदा तर 217 जणांना दुसरा लसीचा डोस देण्यात आला आहे.यात आरोग्य सेवेशी संबंधित 151, फ्रंटलाईन वर्कर 634 तर 60 वर्ष वयांपेक्षा अधिकच्या 1 हजार 75 जणांचा समावेश होता.एक एप्रिल 2021 पासून शासनाच्या आदेशाप्रमाणे 45 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे.त्यांची संख्या 1 हजार 34 होती.काल पर्यंत जिल्हयातील 56 हजार 370 नागरिकांनी कोरोना लसीसाठी नाव नोंदणी केली होती.त्यापैकी 48 हजार 342 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.तर जिल्हयात काल पर्यंत 55 हजार 564 या लसीचे डोस देण्यात आले आहेत.काल पर्यंत 7 हजार 222 नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.रोज 2 हजार 500 कोरोना लस देण्याचे उदिष्ट असता 1 एप्रिल 2021  रोजी 180.9 टक्के उदिष्ट साध्य करण्यात आले आहे.         

जिल्हयातील नागरिकांचे कोरोना विषाणू पासून संरक्षण करण्याबरोबरच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आरोग्य  सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न नियोजन पध्दतीने सुरू आहेत.राज्याचे मृद व जलसंधाण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली जिल्हा प्रशासन आणि जिल्हयातील आरोग्य यंत्रणा दिवसरात्र जीव धोक्यात घालून काम करीत आहे.परंतुराज्यातील आणि  जिल्हयातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता वैद्यकीय सुविधांवर ताण पडत आहे.जिल्हयातील वैद्यकीय यंत्रणाच्या आवाक्याबाहेर कोरोना रुग्णं संख्या जाऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्न करीत असतांना नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसादर देण्याची गरज आहे.म्हणूनच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांनी मास्कचा वापर करा, सामाजिक अंतराचे नियम पाळा, गर्दी करू नका,गर्दीत जाऊ नका, गरज नसेल तर घरा बाहेर पडू नका, कोरोनाची लक्षणे दिसताच कोरोना टेस्ट करा,सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन वारंवार केले  आहे . आता नागरिकांनीच या आवाहनास प्रतिसाद द्यावयास हवा.