नांदेड जिल्ह्यात 1 हजार 246 व्यक्ती कोरोना बाधित,23 मृत्यू

नांदेड दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 381 अहवालापैकी 1 हजार 246 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 537 तर अँटिजेन तपासणीद्वारे 709 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 45 हजार 76 एवढी झाली असून यातील 33 हजार 636 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 558 रुग्ण उपचार घेत असून 153 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल या तीन दिवसांत 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 843 एवढी झाली आहे. दिनांक 31 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे तामसा ता. हदगाव येथील 30 वर्षाचा पुरुष, अर्धापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, मुखेड येथील 79 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे सरसम ता. हिमायतनगर 45 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 63 वर्षाचा पुरुष, क्रांती नगर नांदेड येथील 53 वर्षाचा पुरुष , भोकर येथील 52 वर्षाचा पुरुष, विवेक नगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, कौठा नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, गाडीपुरा नांदेड येथील 31 वर्षाची महिला, शिवाजी नगर येथील 75 वर्षाचा पुरुष, निवघा ता. मुदखेड येथील 75 वर्षाची महिला, चौफाळा नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष,पीरबुऱ्हाण नगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे सिडको नांदेड येथील 47 वर्षाचा पुरुष,गुरुद्वारा नांदेड येथील 53 वर्षाची महिला, हदगाव कोविड रुग्णालय येथील 72 वर्षाची महिला, खाजगी रुग्णालय येथे डोणगाव ता. मुदखेड येथील 32 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, गांधीनगर देगलूर येथील 86 वर्षाचा पुरुष, लातूर फाटा नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, खामगाव ता. लोहा येथील 70 वर्षाचा पुरुष, व्यंकटेश नगर नांदेड येथील 85 वर्षाची महिला असे एकूण 23 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

आज 983 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 9, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 743, किनवट कोविड रुग्णालय 21, बिलोली तालुक्याअंतर्गत 19, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, उमरी तालुक्याअंतर्गत 11, मुखेड कोविड रुग्णालय 15, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 12, खाजगी रुग्णालय 87, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 19, देगलूर कोविड रुग्णालय 2, कंधार तालुक्याअंतर्गत 6, माहूर तालुक्याअंतर्गत 23 असे एकूण 983 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 22 हजार 605एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 70 हजार 630एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 45 हजार 276एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 33 हजार 636एकुण मृत्यू संख्या-843उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-39आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-402रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 558आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-153.