चिंताजनक :नांदेडात 995 व्यक्ती कोरोना बाधित,26 जणांचा मृत्यू

नांदेड दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 57 अहवालापैकी 995 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 422 तर अँटिजेन तपासणीद्वारे 573 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 44 हजार 30 एवढी झाली असून यातील 32 हजार 653 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 319 रुग्ण उपचार घेत असून 172 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

दिनांक 30 व 31 मार्च या दोन दिवसांत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या 820 एवढी झाली आहे. दिनांक 30 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे देऊळगाव ता. लोहा येथील 60 वर्षाचा पुरुष, शिवाजी नगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, नायगाव येथील 70 वर्षाचा पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, चैतन्य नगर नांदेड येथील 73 वर्षाची महिला, निवघा ता. मुखेड येथील 65 वर्षाचा पुरुष, सहयोग नगर नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, इतवारा नांदेड येथील 86 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 80 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 62 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे विठ्ठल नगर येथील 65 वर्षाची महिला, गुरुद्वारा नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, सरस्वती नगर नांदेड येथील 50 वर्षाची महिला, सांगवी नाका नांदेड येथील 47 वर्षाची महिला, लोहा येथील 62 वर्षाचा पुरुष, दिनांक 31 मार्च रोजी विवेक नगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे दया नगर नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, गोकूळ नगर नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालयात 80 वर्षाचा पुरुष, उमरी कोविड केअर सेंटर येथे 51 वर्षाची महिला, किनवट कोविड रुग्णालयात 75 वर्षाचा पुरुष, खाजगी रुग्णालयात नांदेड येथील 47 वर्षाचा पुरुष, 68 वर्षाचा पुरुष, 65 वर्षाची महिला, 70 वर्षाचा पुरुष असे एकूण 26 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

आज 806 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 539, किनवट कोविड रुग्णालय 13, बिलोली तालुक्यातंर्गत 26, धर्माबाद 14, देगलूर कोविड रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 27, उमरी तालुक्यातंर्गत 11, हदगाव कोविड रुग्णालय 33, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 17, नायगाव तालुक्या अंतर्गत 7, खाजगी रुग्णालय 75, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 15, भोकर तालुक्याअंतर्गत 1, कंधार तालुक्याअंतर्गत 3, माहूर तालुक्याअंर्गत 14, लोहा कोविड रुग्णालय 1 असे एकूण 806 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.16 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 17 हजार 611एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 66 हजार 944एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 44 हजार 30एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 32 हजार 653एकुण मृत्यू संख्या-820उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.16 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-36आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-407रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 319आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-172.