महाराष्ट्रासह ७ राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येने नोंद

देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या 6.3 कोटीपेक्षा जास्त मात्रा

नवी दिल्ली,३१ मार्च :

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक,केरळ, तामिळनाडू, गुजरात, पंजाब आणि  मध्य प्रदेश या आठ राज्यात कोरोना रुग्णांची  दैनंदिन संख्या वाढती असून नव्या रुग्णांपैकी 84.73%  रुग्ण या आठ राज्यात आहेत.

 गेल्या 24 तासात 53,480 नव्या रुग्णांची नोंद झाली.महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 27,918 नव्या रुग्णांची नोंद झाली. छत्तीसगडमध्ये  3,108 आणि कर्नाटकमध्ये 2,975 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या 5,52,566 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 4.55% आहे.देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 79.30% महाराष्ट्र, कर्नाटक,केरळ, पंजाब, आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये आहेत. देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 61%  इतके रुग्ण महाराष्ट्रात  आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 10,46,757 सत्राद्वारे 6.30 कोटीहून अधिक (6,30,54,353) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

 यामध्ये 82,16,239 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (पहिली मात्रा ), 52,19,525  आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (दुसरी मात्रा), 90,48,417  आघाडीवर राहून काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा ), 37,90,467  आघाडीवर काम करणारे कर्मचारी (दुसरी मात्रा),  45 वर्षावरील आणि सह व्याधी असणारे 73,52,957  (पहिली मात्रा), 6,824  (दुसरी मात्रा) तर साठ वर्षावरील 2,93,71,422 (पहिली मात्रा), 48,502 लाभार्थी  (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

लसीकरण अभियानाच्या 74 व्या दिवशी (30 मार्च 2021) लसीच्या 19,40,999 मात्रा देण्यातआल्या.39,666 सत्राद्वारे 17,77,637 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 1,63,632 लाभार्थींना दुसरी मात्रा देण्यात आली.

भारतात एकूण 1,14,34,301 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 94.11%.आहे.गेल्या 24 तासात 41,280 रुग्ण कोरोनातून बरे झाले.गेल्या 24 तासात 354 रुग्णांचा मृत्यू झाला.यापैकी 82.20%  मृत्यू सहा राज्यातले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 139 जणांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये 64 जणांचा मृत्यू झाला.गेल्या 24 तासांत, चौदा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांत कोविड-19 मुळे  एकाही मृत्यूची नोंद नाही.  यामध्ये राजस्थान, आसाम, ओडिशा, लडाख (केंद्रशासित प्रदेश ), दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव , मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, लक्षद्वीप, मेघालय, मिझोरम, अंदमान निकोबार बेटे, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.