सर्वसामान्यांना न्याय व मदत करण्यासाठी शिवसैनिकांनी कायम तत्पर राहण्याचे आवाहन

शिवसेना औरंगाबाद  शाखेचा ३५ वा वर्धापनदिन साधेपणात साजरा

औरंगाबाद  , दि. ८ (प्रतिनिधी) – ८ जून १९८५ रोजी मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन  झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेचा ३५ वा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सामाजिक उपक्रमांसह गुलमंडी येथे सकाळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते ध्वजारोहण व सत्यनारायण महापूजेने साजरा करतात आला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये शिवसैनिक कार्य करत असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. शहरासह गावागावात सर्वसामान्यांना न्याय व मदत करण्यासाठी शिवसैनिकांनी  कायम तत्पर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी सहसंपर्कप्रमुख त्रंबक तुपे, शिवसेना महानगरप्रमुख तथा आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी आमदार किशनचंद तनवाणी, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृह नेते विकास जैन, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, अनिल पोलकर, आनंद तांदूळवाडीकर, गणू पांडे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, जिल्हा युवाधिकारी,नगरसेवक ऋषिकेश खैरे, महिला आघाडी संपर्क संघटक कला ओझा, सहसंपर्क संघटक सुनीता आऊलवार, जिल्हासंघटक सुनीता देव, उपजिल्हासंघटक अंजली मांडवकर, नलिनी बाहेती, अनिता मंत्री, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, नलिनी महाजन, लक्ष्मी नरहिरे, शहरप्रमुख प्राजक्ता राजपूत, आशा दातार, उपशहर संघटक अरुणा भाटी, नगरसेवक सचिन खैरे, उपशहरप्रमुख जयसिंग होलीये, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब गायकवाड, रमेश बाहुले, गोपी घोडेले, प्रफुल मालानी, किशोर नागरे,  किशोर कच्छवाह, सचिन ढोकरट, सचिन लकासे, सचिन शहाणे, सुभाष मुळे, रमेश तारापुरे, मनीष मगरे, कृष्णा खडके, पूनम राजपूत, सुनील दायमा, संजय भैरव, भगवान कोकाटे, संजय खडके, गोपाळ देव, बाळासाहेब वाघ, देविदास बकले, जनार्दन हरणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

क्रांतिचौक येथे शिवपूजन व ध्वजारोहण

मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना ध्वजारोहण औरंगाबाद शाखेच्या ३५ वा वर्धापन दिनानिमित्त क्रांतीचौक येथे शिवपुजन व ध्वजारोहण शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, अनिल पोलकर, अशोक शिंदे, विधानसभा संघटक राजु वैद्य, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, केजन काजे, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, रतनकुमार साबळे, प्रमोद ठेंगेडे, नंदु लबडे, सुर्यकांत कुलकर्णी, उपतालुकाप्रमुख संजय मोटे, गणेश अंबिलवादे, संतोष बोर्डे, स्वप्निल साबळे, चांगदेव सावडे, रवि लोढा, संजय लोहिया, बाबा साबडे, अभिजीत अरकिडवार, गोपी घोडेले, ऋषिकेश गावंडे, प्रदीप जाधव, बाळासाहेब गायकवाड, भगवान कोकाटे, तारापुरे व शिवसेना पदाधिकारी यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *