कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राने चीनलाही  टाकले मागे

राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
Are more virulent strains of coronavirus causing higher deaths in ...

मुंबई, दि.७: आज कोरोनाच्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.राज्यातली रुग्णसंख्या ८५ हजारांच्या वर गेल्याने महाराष्ट्राने चीनलाही मागे टाकले आहे.एकूण संख्या आता ८५,९७५ अशी झाली आहे. देश कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात ५ व्या क्रमांकावर असून स्पेनलाही भारताने मागे टाकले आहे. 

राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी ८५ हजार ९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार ६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात ९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७१ (मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा-भाईंदर ४, पालघर १), नाशिक- १ (नाशिक १), पुणे- १४ (पुणे ६, सोलापूर ८), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २), औरंगाबाद-१ (जालना १), अकोला-१ (अकोला मनपा १). इतर राज्य- १ (पश्चिम बंगाम मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ९१ रुग्णांपैकी ६७ जणांमध्ये (७३.६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०६० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३१ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १३ एप्रिल ते ४ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६० मृत्यूंपैकी मुंबई ४४, उल्हासनगर – ५, मीरा भाईंदर – ४, सोलापूर ४ , नाशिक -१ ,पालघर -१, इतर राज्ये -१,असे मृत्यू आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४८,७७४), बरे झालेले रुग्ण- (२१,१९०), मृत्यू- (१६३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव रुग्ण- (२५,९४०)

ठाणे: बाधित रुग्ण- (१३,०१४), बरे झालेले रुग्ण- (४८३६), मृत्यू- (३३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (७८४६)

पालघर: बाधित रुग्ण- (१४८५), बरे झालेले रुग्ण- (६०७), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८३८)

रायगड: बाधित रुग्ण- (१४४१), बरे झालेले रुग्ण- (७३५), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (६४९)

नाशिक: बाधित रुग्ण- (१५२१), बरे झालेले रुग्ण- (१०२७), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४०५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२०३), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९४)

धुळे: बाधित रुग्ण- (२३८), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१००)

जळगाव: बाधित रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४८९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८)

पुणे: बाधित रुग्ण- (९७०५), बरे झालेले रुग्ण- (५५१६), मृत्यू- (४०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३७८३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१३४३), बरे झालेले रुग्ण- (६२०), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६१९)

सातारा:  बाधित रुग्ण- (६३०), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२९४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६४७), बरे झालेले रुग्ण- (३३५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३०४)

सांगली: बाधित रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (११३), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३५४), बरे झालेले रुग्ण- (१५९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१८५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१९६५), बरे झालेले रुग्ण- (११८९), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६८४)

जालना: बाधित रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६४)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१६३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५०)

परभणी: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२९)

लातूर: बाधित रुग्ण- (१३७), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३१)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६२)

बीड: बाधित रुग्ण- (५५), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (१५)

नांदेड: बाधित रुग्ण- (१६९), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५४)

अकोला: बाधित रुग्ण- (७७८), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (३०२)

अमरावती: बाधित रुग्ण- (२९३), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६०), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३६)

वाशिम: बाधित रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (७४७), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३०२)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१५)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५३)

एकूण: बाधित रुग्ण-(८५,९७५), बरे झालेले रुग्ण- (३९,३१४), मृत्यू- (३०६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०),ॲक्टिव रुग्ण-(४३,५९१)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १३८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६५४ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ५१५ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.६० लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड19  घडामोडींवरील माहिती 

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 5,220 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,19,293 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोविड –19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 48.37% वर पोहोचले आहे. आजमितीस 1,20,406 रुग्ण संक्रमित असून ते सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोशाळांची संख्या 531 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 228 पर्यंत (एकूण 759) वाढविण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 1,42,069 नमुने तपासण्यात आले. आत्तापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 46,66,386 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *