चिंताजनक!देशात सर्वात जास्त बाधित १० जिल्ह्यांपैकी ९ महाराष्ट्रात

मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. देशात सक्रीय कोरोना रुग्ण असणाऱ्या टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले ९ जिल्हे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.  महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. 

“दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे.” असं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे”.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण पत्रपरिषदेला संबोधित करतांना म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे. याशिवात गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७०० तर मध्य प्रदेशात १५०० रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत. दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे.

कोरोना सक्रीय रुग्णांमध्ये देशातील टॉप १० जिल्ह्यांत महाराष्ट्रातले कोण-कोणते जिल्हे? 

जिल्हा कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण
पुणे४३ हजार ५९०
नागपूर३३ हजार १६०
मुंबई२६ हजार ५९९
ठाणे २२ हजार ५१३
नाशिक१५ हजार ७१०
औरंगाबाद१५ हजार ३८०
नांदेड१० हजार १०६
जळगाव६ हजार ८७
अकोला५ हजार ७०४