अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला निर्णय

प्रसाद यांनी केलेल्या टीकेला मलिक यांनी दिले सडेतोड उत्तर

मुंबई दि. 22 : भाजपचे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर आणि गृहमंत्र्यांवर अधिकार्‍यांनी सवाल उपस्थित केले होते त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. रवीशंकर प्रसाद यांनी लोकांना नैतिकता शिकवू नये. रास्वसंघाचे कोणीही संविधानिक पदावर नसताना भाजपावाले संघाच्या कार्यालयात जाऊन सरकारचे रिपोर्टींग करतात ही कोणती संविधानिक प्रोसेस आहे, ही कोणती नैतिकता, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, परमवीर सिंह यांचे पत्र हे ठरवून केलेल्या एका कटाचा भाग आहे. परमवीर सिंह दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे आहे, त्यामुळे निश्चितच चौकशीतून सत्य समोर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक पुढे म्हणाले ,मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या चिठ्ठीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपली बदली होणार असल्याची माहिती त्यांना होती. त्यामुळे त्याच्या एक दिवस आधी चॅट मधून पुरावे तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या चॅटमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख हे शेवटच्या आठवड्यात सचिन वाझे यांना भेटले आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र देशमुख हे विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारी पर्यंत त्यांनी स्वतःला होम आयसोलेट केले होते. एक दिवस ते लोकांना भेटले असता त्याबाबत पुरावे तयार करून त्यांना बदनाम करण्याचे कट-कारस्थान कुठेतरी केले जात आहे. या प्रकरणी केले गेलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि सत्य बाहेर येईल. चौकशीतून जे निष्पन्न होईल त्याद्वारे पुढील कारवाई होईल. त्यामुळे तूर्तास मंत्री महोदय अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे.


माजी खासदार ए. आर. शाहीन :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

खा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत आज दिल्ली येथे जम्मू-काश्मिर मधील माजी खासदार ए. आर. शाहीन, माजी महापौर जी. आर. डार, तारिक शेख, सुमैरा रसूल, रौफ शफी, आदित्य सप्रू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. के. शर्मा उपस्थित होते.

May be an image of 2 people, people standing and outdoors