नांदेड जिल्ह्यांत कोरोनाचा कहर,प्रथमच रुग्णांचा आकडा हजारांवर 

नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 291 व्यक्ती कोरोना बाधित ,दहा जणांचा मृत्यू

नांदेड दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 61 अहवालापैकी 1 हजार 291 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 771 तर अँटिजेन तपासणीद्वारे 520 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 33 हजार 7 एवढी झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील 54 वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 53 वर्षाचा पुरुष, अंबानगर येथील 70 वर्षाची एक महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे राजनगर नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, भाग्यनगर येथील 47 वर्षाची माहिला, खाजगी रुग्णालयात सोमेश कॉलनी येथील 90 वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर येथील 50 वर्षाचा पुरुष, चैतन्यनगर येथील 68 वर्षाचा पुरुष आणि नांदेड येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. हे मृत्यू दिनांक 20 ते 22 मार्च 2021 या कालावधीत झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 658 एवढी झाली आहे.

आजच्या 5 हजार 61 अहवालापैकी 3 हजार 390 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 33 हजार 7 एवढी झाली असून यातील 25 हजार 855 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 6 हजार 264 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 19, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 305, कंधार तालुक्यांतर्गत 3, माहूर तालुक्यांतर्गत 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 16, हदगाव 1, मुखेड 5, खाजगी रुग्णालय 32 असे एकूण 392 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.33 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 76 हजार 352एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 37 हजार 866एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 33 हजार 7एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 25 हजार 855एकुण मृत्यू संख्या-658उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.33 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-26आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-354आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-329रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-6 हजार 264आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-59.