लॉकडाऊन काळात सायबर संदर्भात नांदेड येथे नवीन गुन्ह्याची नोंद

लॉकडाऊन काळात सायबर संदर्भात ४६१ गुन्हे दाखल ; २५० लोकांना अटक
४६१ गुन्हे दाखल ; २५० लोकांना अटक

मुंबई, दि.७ – लॉकडाऊन काळात राज्यात काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४६१ गुन्हे दाखल झाले असून २५० व्यक्तींना अटक केल्याची  माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १३ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला  धार्मिकतेचा रंग देणाऱ्या आशयाची पोस्ट आपल्या व्हाट्सॲप वरून विविध ग्रुप्सवर टाकली होती त्यामुळे परिसरामध्ये शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ०६ जून २०२० पर्यंत एकूण ४६१ गुन्ह्यांची (ज्यापैकी २८ N.C आहेत) नोंद झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने विश्लेषण केले असता, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९२, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८५, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३, ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४, तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स,युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत २५० आरोपींना अटक केली आहे. यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात यश आले आहे.

चुकीच्या मेसेज पासून सावधान

महाराष्ट्र सायबरने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपणास कोणी अपरिचित व्यक्तीने किंवा आपण ज्या व्हाट्सॲप ग्रुप्सवर आहात त्यावरील परिचित किंवा अपरिचित व्यक्तीने असे व्हिडिओ, फोटोज, मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स ज्यामुळे धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे मेसेज पाठवत असल्यास तत्काळ त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यांमध्ये द्यावी. तसेच आपण असे व्हिडिओ, फोटोज, मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स कोणालाही पाठवू नयेत त्या त्वरित डिलिट कराव्यात . व्हाट्सॲप ग्रुपचे निर्माते (owner) किंवा ॲडमिन असणाऱ्यांनी चुकीच्या पोस्ट्स अथवा अफवा पसरवणारे मेसेजेस व व्हिडिओ ग्रुपवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी तसे न केल्यास व्हाट्सॲप ग्रुप निर्माते व ॲडमिन यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यासाठी group सेटिंग मध्ये only admin असे setting करावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *