4वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तामिळनाडूच्या प्रणव रेथीन आरएस याला दुहेरी मुकुटाची संधी

दुहेरीत मुलांच्या गटात प्रणव रेथीन व साम्प्रीत शर्मा यांना, तर मुलींच्या गटात कनूमुरी इकराजू व ऐश्वर्या जाधव यांना विजेतेपद  

मुंबई,  19 मार्च, 2021 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए 14वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात तामिळनाडूच्या प्रणव रेथीन आरएस याने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. तर, दुहेरीत मुलांच्या गटात प्रणव रेथीन व साम्प्रीत शर्मा यांना, तर मुलींच्या गटात कनूमुरी इकराजू व ऐश्वर्या जाधव यांनी विजेतेपद पटकावले.  

जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व वुडहाऊस जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात तामिळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएसने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत हरियाणाच्या तिसऱ्या मानांकित तेजस आहुजाचा 6-4,2-6,6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला. दुसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागी याने तामिळनाडूच्या पाचव्या मानांकित महालिंगम खांदवेलचा 6-4, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.याच गटात दुहेरीत अंतिम फेरीत प्रणव रेथीन आरएस याने साम्प्रीत शर्माच्या साथीत तेजस आहुजा व सिद्धांत शर्मा या जोडीचा 4-6,6-1,10-8 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. 
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या आस्मि आडकर हिने आस्मि आडकर हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत कर्नाटकाच्या टी साई जान्हवीचा 6-1,6-4 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. ओरिसाच्या बिगरमानांकीत सोहिनी मोहंती हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सातव्या मानांकित कर्नाटकाच्या संजना देवीनेनीचा 7-5,6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुहेरीत अंतिम फेरीत कनूमुरी इकराजू व ऐश्वर्या जाधव यांनी  मानसी सिंग व सोहिनी मोहंती यांचा 5-7,6-3,10-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्पर्धा संचालक मनोज वैद्य, एआयटीए सुपरवायझर सोनल वैद्य आणि वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.   
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य(मुख्य ड्रॉ)फेरी: मुले:प्रणव रेथीन आरएस(तामिळनाडू)(1)वि.वि.तेजस आहुजा(हरियाणा)(3) 6-4,2-6,6-1;क्रिश त्यागी(कर्नाटक)(2) वि.वि.महालिंगम खांदवेल(तामिळनाडू)(5) 6-4, 7-5; 
मुली:
आस्मि आडकर(महाराष्ट्र)वि.वि.टी साई जान्हवी(कर्नाटक)6-1,6-4;सोहिनी मोहंती(ओरिसा)वि.वि.संजना देवीनेनी(कर्नाटक)(7) 7-5,6-3;
दुहेरी गट: उपांत्य फेरी: मुले: 
प्रणव रेथीन आरएस/साम्प्रीत शर्मा(1) वि.वि.अर्णव पापरकर/वेदांत भसीन 6-4, 6-2; तेजस आहुजा/सिद्धांत शर्मा(3) वि.वि.वेंकट बटलंकी/क्रिश त्यागी(2) 6-7(9), 6-3, 10-7;अंतिम फेरी: प्रणव रेथीन आरएस/साम्प्रीत शर्मा(1) वि.वि. तेजस आहुजा/सिद्धांत शर्मा(3)4-6,6-1,10-8
मुली: उपांत्य फेरी: 
मानसी सिंग/सोहिनी मोहंती वि.वि.रिशीता बासिरेड्डी/टी साई जान्हवी 7-6(5), 6-3;
कनूमुरी इकराजू/ऐश्वर्या जाधव वि.वि.प्रार्थना सोळंकी/प्रियांका राणा  6-4, 6-3;अंतिम फेरी: कनूमुरी इकराजू/ऐश्वर्या जाधव वि.वि. मानसी सिंग/सोहिनी मोहंती 5-7 , 6-3 , 10-1