14वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत टी साई जान्हवी, संजना देवीनेनी, सोहिनी मोहंती यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

मुंबई,  18 मार्च, 2021 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए 14वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात ओरिसाच्या सोहिनी मोहंती, कर्नाटकाच्या टी साई जान्हवी व संजना देवीनेनी यांनी मानांकित खेळाडूंवर  विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

Displaying T Sai Janvi of Karnataka.jpg
T Sai Janvi


जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व वुडहाऊस जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात ओरिसाच्या बिगरमानांकीत सोहिनी मोहंती हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित तेलंगणाच्या कनूमुरी इकराजूचा 6-4, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. कर्नाटकाच्या सातव्या मानांकित संजना देवीनेनी हिने चौथ्या मानांकित उत्तराखंडच्या सौमित्रा वर्माचा 6-4, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. 

Displaying Sohini Mohanty of Odisha.jpg

कर्नाटकाच्या टी साई जान्हवी हिने दहाव्या मानांकित तेलंगणाच्या लक्ष्मी दांडूचा 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. महाराष्ट्राच्या आस्मि आडकर हिने आपलीच राज्य सहकारी ऐश्वर्या जाधवचा 6-1, 6-4 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. 
मुलांच्या गटात तामिळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएसने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तेलंगणाच्या सहाव्या मानांकित वेंकट बटलंकीचा 6-2, 6-0 असा तर तिसऱ्या मानांकित हरियाणाच्या तेजस आहुजाने मणिपूरच्या सातव्या मानांकित सेंजम अश्वजीतचा 6-3, 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. कर्नाटकाच्या दुसऱ्या मानांकित क्रिश त्यागीने महाराष्ट्राच्या अर्णव पापरकरचा टायब्रेकमध्ये 2-6, 7-6(5), 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव केला. 
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर व वेदांत भसीन या जोडीने चौथ्या मानांकित अंतरिक्ष तमुली व अश्वजित सेंजम या जोडीवर 4-5, 5-4, 10-6 असा सनसनाटी विजय मिळवला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व(मुख्य ड्रॉ)फेरी: मुले:प्रणव रेथीन आरएस(तामिळनाडू)(1)वि.वि.वेंकट बटलंकी(तेलंगणा)(6)6-2, 6-0;  तेजस आहुजा(हरियाणा)(3)वि.वि.सेंजम अश्वजीत(मणिपूर)(7) 6-3, 6-4;महालिंगम खांदवेल(तामिळनाडू)(5)वि.वि.श्री प्रणव तम्मा(तेलंगणा) 6-1, 6-2; क्रिश त्यागी(कर्नाटक)(2) वि.वि.अर्णव पापरकर(महाराष्ट्र)2-6, 7-6(5), 6-0;   मुली:
आस्मि आडकर(महाराष्ट्र)वि.वि.ऐश्वर्या जाधव(महाराष्ट्र)6-1, 6-4;  टी साई जान्हवी(कर्नाटक)वि.वि.लक्ष्मी दांडू(तेलंगणा)(10)6-3, 6-4; संजना देवीनेनी(कर्नाटक)(7) वि.वि.सौमित्रा वर्मा(उत्तराखंड)(4) 6-4, 6-1; सोहिनी मोहंती(ओरिसा)वि.वि.कनूमुरी इकराजू(तेलंगणा)(6)6-4, 6-3;दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुले: 
प्रणव रेथीन आरएस/साम्प्रीत शर्मा(1) वि.वि.रूरिक रजनी/व्रज गोहिल 4-1, 5-3;
अर्णव पापरकर/वेदांत भसीन वि.वि.अंतरिक्ष तमुली/अश्वजित सेंजम(4) 4-5, 5-4, 10-6;
तेजस आहुजा/सिद्धांत शर्मा(3) वि.वि.शुभम शेरावत/अर्जुन पंडित 4-0, 4-2;
वेंकट बटलंकी/क्रिश त्यागी(2) वि.वि.हितेश चौहान/अक्षत धूल 4-2, 4-0;

मुली:
रिशीता बासिरेड्डी/टी साई जान्हवी वि.वि.साईजयानी बॅनर्जी/वामिका शर्मा 4-1, 5-4(5);
मानसी सिंग/सोहिनी मोहंती वि.वि.वरलिका श्री/लक्ष्मी दांडू 1-4, 4-2, 10-5;
कनूमुरी इकराजू/ऐश्वर्या जाधव वि.वि.संजना देवीनेनी/सर्वा किलारू(3) 5-4(0), 4-1;
प्रार्थना सोळंकी/प्रियांका राणा वि.वि.माहिका खन्ना/शगुन कुमारी 5-4(3), 4-1