नांदेड जिल्ह्यात 597 व्यक्ती कोरोना बाधित ;सहा मृत्यू

नांदेड दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 87 अहवालापैकी 597 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 355 तर अँटिजेन तपासणीद्वारे 242 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 28 हजार 520 एवढी झाली आहे.

सोमवार 15 मार्च 2021 रोजी लेबर कॉलनी नांदेड येथील 58 वर्षाच्या एका पुरुषाचा तर मंगळवार 16 मार्च 2021 रोजी नावघाट नांदेड येथील 45 वर्षाच्या एका महिलेचा, चैतन्यनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा, नायगाव नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर बुधवार 17 मार्च 2021 रोजी नंदीग्राम सोसायटी नांदेड येथील 61 वर्षाच्या एका महिलेचा व हाडको नांदेड येथील 81 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 624 एवढी झाली आहे.

आजच्या 2 हजार 87 अहवालापैकी 1 हजार 453 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 28 हजार 520 एवढी झाली असून यातील 24 हजार 329 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 343 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 40 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 13, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 153, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, धर्माबाद तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 25, मुखेड कोविड रुग्णालय 1, उमरी तालुक्यांतर्गत 5, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 217 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 85.30 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 56 हजार 787एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 23 हजार 482एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 28 हजार 520एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 329एकुण मृत्यू संख्या-624उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 85.30 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-24आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-13आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-311रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 343आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-40.