औरंगाबाद शहरात कडकडीत बंद

औरंगाबाद, दिनांक 13 मार्च  : मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता  कडकडीत बंद पाळण्यात  आला आहे.  गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत कोरोना व्हायरसने मोठे थैमान घातलं आहेत.

दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ५०० ते ९०० रुग्णांची वाढ होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असल्यानं प्रशासनासमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात आज 849  जणांना (मनपा 802, ग्रामीण47) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 51017 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 720 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 56678 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1334 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4327 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

 

बीड बायपास, शिवाजीनगर,सुतगिरणी चौक परिसर, शहानुर मियाॅ दर्गा परिसर, उस्मानपुरा,रेल्वे स्टेशन,महावीर चौक,सेंटृल बसटॅन्ड,मिल काॅर्नर,घाटी परीसर,टाऊन हॉल,बुढढी लाईन,औरंगपुरा, पैठण गेट,गुलमंडी,सिटी चौक,शहागंज,चंपा चौक,रोशनगेट,दिल्ली गेट, हडको,सिडको परिसर,हर्सुल,बजरंग चौक,सेंटृव नाका ,सेव्हन व्हील, आकाशवाणी,मोढा नाका,क्रांती चौक,ज्योती नगर,उल्कानगरी, जवाहर काॅलनी,बालाजी नगर, गजानन महाराज मंदिर चौक परिसर, पुंडलिक नगर,जय भवानी नगर , चिकलठाणा, मुकुंदवाडी,सिडको  बसस्थानक परिसर, एन तेरा ,जटवाडा ,एम टु,कटकटगेट, मौलाना आझाद चौक,रहेमानिया काॅलनी ,कडकडीत बंद पाळण्यात आला औषधी दुकाना, किराणा दुकाना वगळता सर्वच दुकाना व व्यवहार बंद होते.

महाराष्ट्राची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे, असं केंद्र सरकारने गुरुवारी (11 मार्च) म्हटलं आहे. ‘आपण अशा परिस्थितीकडे जातो आहोत, की लॉकडाउनसारखे सर्व उपाय पुन्हा लागू करावे लागत आहेत. ही गंभीर बाब आहे,’ असं नीती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. काळजी घ्या आणि परिस्थितीवर लक्ष ठेवा. कोरोनाची लागण होण्याचा धोका असलेली मोठी लोकसंख्या अजूनही आहे,’ असं त्यांनी म्हटलं.

जिल्ह्यात वाढत्या करोना संसर्गाच्या साखळीला खंडित करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या दोन  दिवसांच्या टाळेबंदीला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी अकोला शहरासह जिल्हा कडकडीत बंद आहे. या बंदमधून केवळ वैद्याकीय सेवा व निवडक पेट्रोल पंप वगळण्यात आले आहेत. सर्वत्र शुकशुकाट असून नेहमी गजबजलेल्या बाजारपेठा व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.जिल्ह्यात करोनाचा प्रकोप कायम आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्णवाढीसोबतच मृत्यूचे प्रमाणाचाही चढता आलेख आहे. करोनाने शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाय पसरले आहेत. करोनाचा वाढता संसर्ग अनियंत्रित झाल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले.

यापूर्वीच शहरातील विवाहसमारंभ, सभा, आंदोलने, शाळा, महाविद्याालये, विद्यापीठातील अध्ययन-अध्यापन बंद करण्यात आले आहे. शहरातील जाधवमंडी येथे होणारी गर्दी लक्षात घेता खते आणि किटकनाशकांचे दुकाने वगळता बाकी भाजीमंडई पूर्णत: बंद करण्याची निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.