भारतात कोविड-19 लसीकरणाने नोंदविला ऐतिहासिक टप्पा


देशभरात 3 कोटी हून अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा

नवी दिल्ली , 13 मार्च 2021:

भारताने, आपली  देशभरातील लसीकरण मोहीम, जिचा आरंभ 16 जानेवारी 2021ला झाला होता, तिने महत्वपूर्ण टप्पा नोंदवला आहे.

लसीकरण मोहिमेच्या 56 व्या दिवशी (12 मार्च 2021) 20 लाखांपेक्षा अधिक (20,53,537) लसीकरण मात्रा 39,561 सत्रांत  दिल्या गेल्या. ही  आतापर्यंत  एका दिवसात झालेली   सर्वाधिक लसीकरण अंमलबजावणी  आहे.16,39,663 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली(एचसीडब्ल्यूज आणि एफ एलडब्ल्यूज) आणि 4,13,874 जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत आलेल्या अंतरिम अहवालानुसार एकूण 2.82 कोटी (2,82,18,457) लसींच्या मात्रा 4,86,314 सत्रांद्वारे देण्यात आल्या.यात 72,93,575  एचसीडब्ल्यूज (आरोग्य कोविड योध्दे,पहिला डोस) 41,94,030एचसीडब्ल्यूज (आरोग्य कोविड योध्दे,दुसरा डोस), 72,35,745 आघाडीवरील योध्दे (एफएलडब्ल्यूज पहिला डोस,) 48,923 आघाडीवरील योध्दे(एफएलडब्ल्यूज दुसरा डोस), 12,54,468 सहव्याधी असलेले  45 वर्षांवरील लाभार्थी (पहिला डोस) तर  60 वर्षांपेक्षा जास्त  वय असलेले 72,91,716 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

8 राज्यांत गेल्या 24 तासांत 74% लसीकरण झाले असून  20,53,537 लसींच्या मात्रा देण्यात आल्या .उत्तरप्रदेश  3.3 लाख लसींच्या मात्रासह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.दहा राज्यांत लसीकरणाची दुसरी मात्र देण्यात आली  असून 69% लसीकरण  झाले आहे.भारतामधील लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेचे  प्रमाण एकट्या उत्तरप्रदेशात 9.71% (4,99,242)  इतके आहे.

आज भारतातील सक्रीय रुग्णभार 2.02 लाख (2,02,022) इतका  आहे.सध्या असलेला सक्रीय रुग्णभार एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्येच्या 1.78 % इतका आहे. गेल्या 24 तासांत 24,882  नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्र, केरळ,पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि मध्यप्रदेशात 87.72% नव्या रूग्णांची नोंद झाली.भारतातील सक्रीय रुग्णांपैकी  63.75 % रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली.दुसरीकडे 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत 1,000 पेक्षा कमी सक्रीय रूग्ण आहेत.

भारतात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आज 1,09,73,260 इतकी आहे. बरे होण्याचा राष्ट्रीय दर 96.82% इतका आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यातील फरक सतत वाढत असून तो आज 10,771,238 इतका झाला आहे.गेल्या  24 तासांत 19,957 रूग्ण बरे झाल्याची नोंद झाली. बरे झालेल्या रुग्णांपैकी 86.43% रुग्ण 6 राज्यांत एकवटलेले आहेत.महाराष्ट्रात एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून 11,344 नवीन रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांत 140 मृत्यूंची नोंद झाली.पाच राज्यांत 81.43% नव्या रूग्णांचा मृत्यु झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक  (56) मृत्यू  झाले. त्याखालोखाल पंजाबमध्ये 34  तर केरळमध्ये 14 मृत्यूंची नोंद झाली.अठरा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत गेल्या 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.यात राजस्थान, चंदीगड, हिमाचल प्रदेश,ओदिशा, झारखंड, पुडुचेरी, आसाम, लक्षद्वीप, लडाख, दीव आणि दमण, दादरा आणि नगरहवेली,सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय,अंदमान आणि निकोबार  द्वीप समूह, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.