जिल्हाधिकाऱ्यांनी केली विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडाची कारवाई

· अनपेक्षितपणे देणार अनेक ठिकाणांना भेटी
· ध्वनीक्षेपकाव्दारे  नागरिकांना केले मास्क वापरणाऱ्यांचे आवाहन
·नियम न पाळल्यास दुकान परवाना रद्द करणार
Displaying दंडात्मक कारवाई-4.JPG

औरंगाबाद दि, 12 :- गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने  जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉक डाऊन ची घोषणा केली. मात्र नागरिकाकडून कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने  कोरोना रुग्ण वाढत आहेत याचे गांभीर्य लक्षात घेऊन आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पडेगाव, कांचनवाडी, बीड बायपास रोड, शहानुरमियाँ दर्गा, गारखेडा परिसर, पुंडलीक नगर, कामगार चौक, सिडको चौक,चिकलठाणा परिसरात स्वत: विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई केली. यावेळी  जिल्हाधिकारी यांनी स्वत: ध्वनीक्षेपाव्दारे नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले.

आज सकाळी जिल्हाधिकारी यांनी शहरातील काही ठिकाणी अचानक भेटी देऊन नियमांचे पालन होत आहे का नाही याची पाहणी केली.  यावेळी त्यांनी गायत्री मेडिकल, नोबेल मेडिकल, दवा इंडिया मेडिकल, पटेल मेडिकल या दुकानांवरील दुकानदारांनी मास्क न घातल्याचे आढळुन आल्याने त्यांना दंड ठोठावला. तसेच शहरातील हॉटेल 360, पवन ट्रेडर्स, साई दुध डेअरी, अशा अनेक दुकानांवर कारवाई करत दंड वसुल केला. आजच्या कारवाईत 24 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आल. तसेच मास्क न लावल्यास आणि उल्लघंन केल्यास दुकांनाचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जिल्हाधिकारी यांनी स्वत:  काही  मेडिकल तसेच इतर दुकानांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन ऑक्सी मीटर, थर्मल गण आहेत का याची तपासणी केली.  

आस्थापनांनी अंशत: लॉकडाऊन नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन

औरंगाबाद :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशानूसार, दि.11 मार्च 2021 ते 04 एप्रिल 2021 अंशत : लॉकडाऊन मध्ये अन्न आस्थपना सुरु ठेवण्याच्या कालवधी व उपाययोजनांची अंमलबजावणी अन्न व औषध  प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने  आठवडी बाजार उपरोक्त कालावधीत बंद राहतील तसेच, जाधवमंडी भाजी मार्केट दि.11 मार्च 2021 ते 17 मार्च 2021 या कालावधीत पुर्णपणे बंद राहतील.

Displaying जाधवमंडी पाहणी-5.JPG

अटी व शर्तीसह हॉटेल/ बार/ परमीट रुम/ रेस्टॉरंट/ खादयगृह/ किराणा दुकाने सकाळी 06.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.हॉटेल/रेस्टारंट/खादयगृह इत्यादी हे एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत सुरु ठेवता येतील. प्रत्यक्ष डायनिंग सुविधा रात्री फक्त 9.00 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र होम डिलीव्हरी व त्यासाठी स्वयंपाकगृह (किचन) रात्री 11.00 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा असेल.

तसेच 04 एप्रिल 2021 पर्यंत फक्त दर शनिवारी व रविवारी दुध विक्री व पुरवठा,  भाजी-पाला/फळे विक्री व पुरवठा जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, उदयोग व कारखाने फक्त स्टॅड अलोन स्वरुपातील किरणा दुकाने, पशुखाद्य दुकाने, चिकन,मटन,अंडी, मांस व मच्छी दुकाने इत्यादी विहीत वेळेत सुरु राहतील. तसेच, सदर कालावधीत D-Mart/Big Bazar/ Reliance Mall/ More इत्यादी मॉल्स/ चित्रपटगृहे/ नाटयगृहे बंद राहतील व हॉटेल्स आणि रेस्टारंट प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलव्हरी व त्यासाठी स्वयंपाकगृह (किचन) रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा राहील.

उपरोक्त प्रमाणे ज्या आस्थपनांना सदर कालावधीत (दि.11 मार्च 2021 ते 04 एप्रिल 2021) व्यवसाय सुरु राहणेसाठी परवानगी देण्यात आली आहे, त्या आस्थपनांशी संबंधित सर्व मालक/ चालक/ कर्मचारी/ मजूर व तेथील कार्यरत सर्व व्यक्तीना कोविड-19 च्या अनुषंगाने दर 15 दिवसांनी RTPCR वारंवार तपासणी करणे बंधनकारक राहील व नजीकचा ( Latest ) तपासणी अहवाल जवळ बाळगणे अनिवार्य असेल. तसेच, कोविड-19 च्या अनुषंगाने मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.

तरी, औरंगाबाद जिल्ह्यातील अन्न्‍ आस्थपनांनी सदरहू आदेशाचे 04 एप्रिल 2021 पर्यंत काटेकारेपणे पालन करावे, अन्यथा, संबंधिताविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषधे प्रशासनाचे सह आयुक्त, श्री उदय वंजारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.