नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित 360 वर, दोघांचा मृत्यू

जनतेने त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन

नांदेडदि. 12 :- गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत असून आज तब्बल 360 व्यक्ती कोरोना बाधित आले आहेत. सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 360 बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 151 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 209 बाधित आले. याचबरोबर दिनांक 9 मार्च रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 35 वर्षीय महिलेचा व दिनांक 11 मार्च रोजी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुखेड येथील 62 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 610 एवढी झाली आहे.

आजच्या 993 अहवालापैकी 619 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 25 हजार 800 एवढी झाली असून यातील 23 हजार 360 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 614 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 44 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 100, किनवट कोविड रुग्णालय 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 29, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 156 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 90.54 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 127, अर्धापूर तालुक्यात 1, हदगाव 2, मुखेड 4, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 8, धर्माबाद 4, लोहा 2, नायागव 1, परभणी 1 असे एकूण 151 बाधित आढळले.आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 173, अर्धापूर तालुक्यात 1, हदगाव 12, लोहा 1, मुदखेड 1, हिंगोली 1, पुणे 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 3, किनवट 10, माहूर 2, नायागव 2, यवतमाळ 1 असे एकूण 209 बाधित आढळले.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 45 हजार 960एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 15 हजार 608एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 25 हजार 800एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 360एकुण मृत्यू संख्या-610उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 90.54 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-256रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 614आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-44.