बांगलादेशची राजधानी ढाक्यात  इमारतीमध्ये भीषण स्फोट; १६ जणांचा मृत्यू

ढाका:-बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये मंगळवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात १6 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर १००हून जण अधिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट ५ मजली इमारतीत झाला असून यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हा स्फोट मंगळवारी संध्याकाळी ५च्या सुमारास झाला. स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक पोलिसांनी माहिती दिली की, जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, अद्याप या मागचे कारण समोर आलेले नाही.ढाका येथील गुलिस्तान भागात हा स्फोट झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या 11 आपत्कालीन तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही व्यावसायिक इमारत गजबजलेल्या सिद्दीकी मार्केटमध्ये होती ज्यामध्ये अनेक कार्यालये आणि दुकाने होती. सात मजली इमारतीच्या तळमजल्यावर स्वच्छता साहित्य विकणाऱ्या एका दुकानात हा स्फोट झाला.