आरपीआयचा पहिल्यांदाच अटकेपार झेंडा!

रामदास आठवलेंच्या आरपीआयचा नागालँडमध्ये दोन जागांवर विजय

कोहिमा : नागालँडमधील दोन जागांवर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) दोन आमदार निवडून आले आहेत. पहिल्यांदाच राज्याबाहेर रामदास आठवले यांच्या आरपीआयचे आमदार निवडून आले आहेत.

आरपीआय पक्षाच्या (आठवले) वाय. लिमा ओनेन चँग यांनी नागालँडमधील नोक्सेन जागेवर विजय मिळवला आहे. तर इम्तीचोबा यांनी तुएनसांग सदर-२ येथील जागा जिंकली आहे.

महाराष्ट्राबाहेर रामदास आठवलेंच्या आरपीआयचा विजय हा त्यांच्यासाठी खूप मोठा विजय असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे इतर राज्यामधील निकालांवर याचा परिणाम होऊ शकतो. आरपीआय आठवले गटाच्या इमतीछोबा यांनी तुनसंग सदर २ या विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला.

तर उमेदवार वाय लीमा ओनेने चांग यांनी नोकसेन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पहिल्यांदाच आरपीआयने नागालँडमध्ये निवडणूक लढवली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दोन जागा जिंकल्याने सध्या त्यांच्या पक्षात आनंदाचे वातावरण आहे.