उमरी ता. केज येथे कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू

बीड, दि.11 :- उमरी ता. केज येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .

याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उमरी ता. केज हे गाव कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

धारुर येथील दुधिया कॉलनीचा कन्टेनमेंट झोन शिथील, परिस्थिती पूर्ववत

Image may contain: 1 person, sitting and indoor

धारुर मधील दुधिया कॉलनी येथे कोरोना विषाणू बाधित (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती. शासनाचे नियमानुसार येथील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे कळविले आहे. यामुळे धारुर मधील दुधिया कॉलनी या परिसरातील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *