ठाणे, दि. 10 - मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटर घोटाळयातील मुख्य सूत्रधाराचे वय अवघे 23 वर्ष असल्याची नवी माहिती समोर आली आहे. शागर ठक्कर उर्फ शॅगी असे या युवकाचे नाव आहे. मागच्या मंगळवारी हा घोटाळा उघड झाल्यापासून शागर फरार असून त्याचा साथीदार तपशही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मीरा रोडच्या डेल्टा टॉवर इमारतीतून चालवल्या जाणा-या बोगस कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरीकांना फोन केले जायचे. विमा पॉलिसी विक्री तसेच कर गोळा करण्याची धमकी देऊन अमेरिकन नागरीकांकडून पैसे उकळले जायचे. ठाणे पोलिसांच्या 200 जणांच्या पथकाने मागच्या मंगळवारी कारवाई करुन सात कॉल सेंटर्सना सील ठोकले.  ...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंगिंग बेल्स कंपनीचे अध्यक्ष अशोक चड्ढा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. आता ते कंपनीत केवळ एक सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. कंपनीचे प्रमोटर मोहित गोयल यांच्याशी त्यांचे मतभेद असल्याचं समोर येतंय. आता यापुढे कंपनीचे सर्व निर्णय गोयलच घेतील.  कामगारांनीही केला "राम-राम' : इतकंच नाही तर कंपनीचे जवळपास 30-35 कर्मचाऱ्यांनीही कंपनीला राम राम ठोकलाय. कंपनी सुरू झाली तेव्हा जवळपास 60 कर्मचारी इथं रुजू झाले होते.  कंपनी आर्थिक पेचात : 251 रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचं स्वप्न दाखवलेला हा स्मार्टपोन मार्केटमध्ये आलाच नाही. त्यामुळे, त्यांना डिस्ट्रिब्युटरदेखील मिळालेले नाहीत. अशात कंपनीच्या सेल्स आणि मार्केटिंग टीमनं कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला.  प्रत्येक फोनमागे 90 रुपयांचं नुकसान : ... ...