सुखोईमधून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी नवी दिल्ली – भारताच्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची बुधवारी सुखोई-30एमकेआय फायटर जेट विमानातून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. सुखोई-30एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ब्राह्मोसची सुखोईवरुन घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरल्यामुळे भारतीय हवाई दलाची शत्रू प्रदेशात खोलवर हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे. ब्राह्मोस हे वर्ल्डक्लास क्षेपणास्त्र आहे. भारताकडे आता जमीन, समुद्र आणि हवेतून हे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. अचूकता आणि वेग हे ब्राह्मोसचे वैशिष्टय आहे. सुखोईमधून ब्राह्मोस डागल्यानंतर या क्षेपणास्त्राने बंगालच्या सागरातील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ब्राह्मोस आणि सुखोई हे कॉम्बिनेशन सर्वात खतरनाक असून शत्रू सैन्यासाठी धोक्याची घंटा आहे. जगातील हे एक वेगवान क्रूझ मिसाईल आहे. ही चाचणी यशस्वी ... ...

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला मिळणार ‘विशेष’ अधिकार नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांसाठी कायम चेष्टेचा विषय ठरणाऱ्या अॅडमिनला आता जबरदस्त ‘पॉवर’ मिळणार आहे. ग्रुप सब्जेक्ट, आयकॉन आणि डिस्क्रिप्शन कोण बदलू शकतो अथवा नाही, हे ठरवण्याचा ‘विशेष’ अधिकार त्याला लवकरच मिळणार आहेत. तसंच व्हॉट्सअॅप आणत असलेल्या एका फिचर्समुळं त्याला कुणीही ग्रुपमधून काढू शकणार नाही. एका वेबसाइटच्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्सची चाचणी करणाऱ्या एका वेबसाइटनं गुगल प्ले Beta च्या माध्यमातून लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन 2.17.387 सादर केलं आहे. याशिवाय आणखी नवीन फीचर्स आणण्यात येणार असल्याची घोषणा व्हॉट्सअॅपनं केली आहे. त्यानुसार ग्रुप तयार करणाऱ्याला त्यातून काढून टाकता येणार नाही. एका वृत्तानुसार, व्हॉट्सअॅप ‘डीलीट फॉर एव्हरीवन’ (Delete for everyone) या फीचर्सवरही काम करत आहे, असं समजतं. ...

व्हॉट्स अॅपचे नवे इमोजी.... लोकप्रिय संदेश वाहक व्हॉट्स अॅपने स्वत:चे नवे इमोजी सेट विकसित केले आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपवर वापरण्यात येणाऱ्या इमोजीचे नवीन स्वरूप आता पाहायला मिळेल. आतापर्यंत व्हॉट्स अॅपमध्ये अॅप्पलचा इमोजी सेट वापरला जात असे. नवीन इमोजी डिझाईन सध्या बीटा व्हर्जन २.१७.३६३ केवळ अॅन्ड्रॉईडसाठी उपलब्ध आहे. अॅन्ड्रॉईड युझर्सच्या प्रतिक्रियेवर इतर युझर्सना त्याचा वापर करता येईल. तसेच व्हॉट्स अॅप देखील त्यात आवश्यक ते बदल घडवून आणेल.हा इमोजी सेट दिसायला जवळपास अॅपमध्ये इमोजी सेट सारखा असला तरी देखील यात डिझाईनच्या अंगाने अनेक बदल घडविले गेले आहेत. नवीन युझर्सना आवडेल, तथा योग्य असेल अशीच याची डिझाईन केली गेली असल्याचे व्हॉट्स अॅपने स्पष्ट केले आहे. ...

आयफोनचा थक्क करणारा नवीन मॉडेल पाहिलंय का ? कॅलिफोर्निया : जग प्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपल ही नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोनमुळे जगातील अनेकांना भुरळ घालते. उतम प्रतीचे हार्डवेअर आणि वेगवेगळ्या फीचर्समुळे अॅपलच्या आयफोन सिरीजची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या वर्षी आयफोन ७ सादर केल्यानंतर आता आणखीन वैशिष्ट्य मोबाईल फोन ग्राहकांनासमोर आणण्यासाठी अॅपल सज्ज झाली आहे. येत्या तीन नोव्हेंबरला अॅपल आपला आयफोन एक्स हा नवीन मोबाईल बाजार उतरवणार आहे. अनेक नवनवीन फीचर्स या मोबाईलमध्ये भरणा केलामुळे पाहताच क्षणी ग्राहकांमध्ये या मोबाईल विषयी कुतूहल निर्माण होऊ लागले आहे. आयफोनची ओळख असलेले होम की यामधून काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे या मोबाईलमध्ये फेस आणि आय अॅक्सेसिंग देण्यात आले आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्याने इशारा करून किंवा मोबाईल तुमचा चेहरा पाहून अनलॉक होईल. याच बरोबर हा मोबाईल वायरलेस पद्धतीने चार्ज करता येणार आहे. मोबाईल चॅटिंग अधिक मनोरंजक व्हावी, ... ...

आता गुगल ट्रान्स्लेटद्वारे ७ भारतीय भाषांत भाषांतर करणे अधिक सोपे अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी गुगलने आठ भारतीय भाषांमध्ये भाषांतर करता यावेत याकरिता अधिक चांगले फिचर्स उपलब्ध केले आहेत. यामध्ये मराठी, बेंगाली, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु आणि उर्दू या भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी यापूर्वी अनेक अडचणी येत होत्या. गुगलने दिलेल्या नव्या फिचर्समुळे या भारतीय भाषांमधील भाषांतर सुकर होणार आहे. गुगल ट्रान्स्लेट हे अॅप्लीकेशन किंवा वेबपेजवरून भाषांतर करताना ऑनलाइन सेवा आधीपासून उपलब्ध होती. आता नेट नसतानाही भाषांतर करता येणार असल्याने अनेकांना या सेवेचा मोठा उपयोग नक्कीच होऊ शकतो. भारतातील इंटरनेट सेवा सर्वदूर चांगली नसल्याने कित्येक ठिकाणी गुगलच्या सेवा वापरणे लोकांना शक्य होत नाहीत. याचा विचार करून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी फक्त हिंदीत भाषांतर करण्यासाठी ऑफलाइनचा पर्याय उपलब्ध होता. ऑफलाइन ट्रान्सलेशन सेवा ... ...

“ब्ल्यू व्हेल’मुळे होणा-या आत्महत्यांना सरकार जबाबदार का?हायकोर्टाचा सवाल मुंबई – मुलाला सांभाळण्याची जबाबदारी ही पालकांची आहे. तो काय कारतो, कोठे जातो याकडे त्यांनी लक्ष ठेवायला हवे. ही सर्वस्वी जबाबदारी त्यांनी झटकून चालणार नाही, असे मत व्यक्त उच्च न्यायालयाने व्यक्त केले. ब्ल्यू व्हेल गेममुळे मुले आत्महत्या करत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्यावेळी मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त करताना आता या खेळातून होणाऱ्या आत्महत्यांनी ही सरकारच जबाबदार आहे काय? असा सवाल याचिकाकर्त्यांनाकरून याचिकेची सुनावणी 14 सप्टेंबरला निश्‍चित केली. ब्ल्यू व्हेल गेम मुळे होणाऱ्या आत्महत्यांच्या पार्श्‍वभूमीवर सिटीझन सर्कल फॉर सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने ऍड. शेहझाद नखवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली आहे . ही याचिका आज मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती ... ...

आता गूगलशी बोला ८ भारतीय भाषांमध्ये आता तुम्ही गूगल सोबत ८ विविध भारतीय भाषांमध्ये बोलू शकता. गूगल असिस्टंट या अॅपमध्ये आता भारतीय भाषांमध्ये बोलण्याचा पर्याय उपलब्ध केला गेला आहे. यात मराठी, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगु, तामिळी, मल्याळम आणि उर्दू अशा महत्वच्या भारतीय भाषांचा पर्याय गूगलने उपलब्ध केला आहे. याच बरोबर गूगल सर्च हे देखील भारतीय भाषेनुसार काम केले पाहिजे, यावरही कंपनीने काम केले आहे. गूगलने अद्याप ११९ जागतिक भाषांवर काम केले आहे. ८ भारतीय भाषांच्या समावेशासह गूगलने सध्या ३६ भाषांना अॅपमध्ये स्थान दिले आहे. अधिकाधिक स्थानिक भाषा आम्ही यात समाविष्ट करू असे कंपनीने सांगितले आहे. अँड्रॉइडमध्ये गूगल असिस्टंट, अॅपल फोनमध्ये सिरी, तसेच मायक्रोसॉफ्ट फोनमध्ये कोर्टाना नावाचे बोलणारे अॅप आज बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्याचा प्रभावी वापर केला जात आहे. विविध देशांमध्ये हे सर्व अॅप मोठ्या प्रमाणात दैनंदिन कामासाठी वापरले जात असतात. त्यामुळे जर स्थानिक भाषांमध्ये हे ... ...