भाषा संचालनालयाचे शासन शब्दकोश अॅप इंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ लावणे झाले सोपे मुंबई दि. २५ : शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा. रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या भाषा संचालनालयाने शासन शब्दकोश अॅप तयार केले आहे. शासन शब्दकोश भाग - एक असे या मोबाईल अ‍ॅपला नाव देण्यात आले असून, यात निवडक शब्दकोशातील ७२ हजार १७१ पर्यायी शब्दांचा समावेश आहे.   भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या शब्द कोशांपैकी शासन व्यवहार कोश, प्रशासन वाक्प्रयोग, न्यायव्यवहार कोश व कार्यदर्शिका हे चार निवडक शब्दकोश पहिल्या टप्प्यात या भ्रमणध्वनी उपयोजकाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपयोजकाद्वारे शासन व्यवहारात व न्याय व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी ... ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : केंब्रिज ऍनालिटीकाला केंद्र सरकारची नोटीस नवी दिल्ली – फेसबुक युजर्स डेटा लिकप्रकरणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या केंब्रिज ऍनालिटीका या ब्रिटीश कंपनीला आज केंद्र सरकारने नोटीस बजावली. भारतीयांच्या डेटाचा गैरवापर केला का आणि त्यांच्या मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला का, अशी विचारणा सरकारने कंपनीकडे केली आहे. कंपनीकडून 31 मार्चपर्यंत उत्तर मागवण्यात आले आहे. अनेक देशांमधील निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी फेसबुक डेटाचा गैरवापर केल्याचा आरोप केंब्रिज ऍनालिटीकावर आहे. भाजपने हे प्रकरण पुढे आल्यावर या कंपनीशी असलेल्या कथित संबंधांवरून कॉंग्रेसला लक्ष्य केले. याशिवाय, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी डेटा चोरी करून भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा फेसबुकला दिला होता. ...

समाज विघातक कृत्याविरोधात ‘महामित्र’ने ढाल बनून काम करावे - मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई, दि. २४ : माहितीच्या स्फोटाच्या युगात सकारात्मक ज्ञानाचा अभाव राहू नये यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र’ यांनी समाज विघातक कृत्याविरोधात ढाल बनवून काम करावे. त्या माध्यमातून सकारात्मक, सक्षम महाराष्ट्र घडवू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.   माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यस्तरीय ‘सोशल मीडिया महामित्र’ सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवासन, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह,  लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर, लोकमत न्यूज 18 चे संपादक डॉ. उदय निरगुडकर, उद्योगपती दिपक ... ...

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांचे निधन केंब्रिज: ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग्ज यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी केंब्रिज येथे निधन झाले. कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. हॉकिंग्ज यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला. हॉकिंग्ज एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग्ज यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यासारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. २००१ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील विज्ञानक्षेत्रातील संशोधन संस्थेने आयोजीत केलेल्या ‘स्ट्रींग’ या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्या परिषदेत हॉकिंग्ज यांनी ... ...

इस्रोने रचला इतिहास ; १००व्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज आणखीन एक नवा इतिहास रचला असून पीएसएलव्ही-सी ४० या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने इस्रोने आपला '१००' व्या उपग्रहाचे देखील यशस्वी प्रक्षेपण केले आहे. याच बरोबर अन्य देशांचे आणखीन ३० उपग्रहांचे देखील इस्रोने यशस्वी प्रक्षेपण केले असून त्यांना योग्य त्याकक्षेमध्ये स्थापन केले आहे. आज सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ४०चे प्रक्षेपण केले. यावेळी पीएसएलव्हीसह भारत, कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, ब्रिटेन आणि अमेरिका या देशांचे एकूण ३१ उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. यामध्ये भारताचे तीन उपग्रह होते. यामध्ये भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कार्टोसॅट-२ या उपग्रहाचे देखील प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणानंतर थोड्याच वेळात कार्टोसॅट-२ ला त्याच्या ... ...

'डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन थ्रू ब्लॉकचेन' : ब्लॉकचेन तंत्रज्ञान परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन मुंबई : वाहनाचे नोंदणीकरण, जमिनीचे अभिलेख, मालमत्तेची नोंदणी यासारख्या बाबींची आनलाईन नोंद ठेवण्यासाठी तसेच त्यात फेरबदल करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान ‘ब्लॉकचेन’ वापरण्यात येणार आहे. या संदर्भात राज्यशासनाने पुढाकार घेतला असून  'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ जानेवारी रोजी ट्रायडेंट,नरिमन पॉईंट, मुंबई येथे एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही आर श्रीनिवास यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.    या परिषदेबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, या परिषदेचे उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून याची संकल्पना ... ...

आधार प्राधिकरणची ‘एअरटेल’वर कारवाई नवी दिल्ली : आधार कार्ड जारी करण्यात येणाऱ्या ‘युआयडीएआय’ प्राधिकरणने भारतीय एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँक यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे. एअरटेलचे ई – केवायसी लायसन अस्थायी स्वरूपात रद्द करण्यात आले आहे. एअरटेलला त्यांच्या ग्राहकांचे सिमकार्ड आधार कार्डशी जोडता येणार नाही. तसेच एअरटेल पेमेंट बँकेची ई – केवायसी प्रक्रिया ही थांबविण्यात आली आहे. ग्राहकांच्या सहमतीशिवाय त्यांच्या बँक खात्यांची तपासणी करून दुरुपयोग केल्याच्या कथित आरोपाखाली एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँक यांच्या विरुद्ध ‘युआयडीएआय’ने कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘युआयडीएआय’ने दिलेल्या अंतिम आदेशात भारतीय एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँक यांचे ई – केवायसी लायसन तात्काळ रद्द करण्यात यावे असे सांगितले. ...