बॉल टॅम्परिंगची संपूर्ण घटना माझ्यामुळे घडली-कॅन्डिस वॉर्नर सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. बॉल टॅम्परिंगची संपूर्ण घटना माझ्यामुळे घडली, असे धक्कादायक विधान ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरची पत्नी कॅन्डिस वॉर्नरने केले. दक्षिण आफ्रिकेत माझ्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेचा बदला घेण्यासाठी पती डेव्हिड वॉर्नरने हे पाऊल उचलले, असे कॅन्डिस म्हणाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान, कॅन्डिस वॉर्नरची थट्टा करण्यात आली होती. तीन चाहत्यांनी कॅन्डिसची खिल्ली उडवण्यासाठी रग्बी खेळाडू सोनी बिल विल्यम्सचे मुखवटे घातले होते. त्यांच्यासोबत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे दोन वरिष्ठ खेळाडूही उपस्थित होते. वॉर्नरशी लग्न करण्यापूर्वी 2007 साली कॅन्डिस आणि सोनी बिल विल्यम्स यांचा पुरुषांच्या बाथरुममधील फोटो व्हायरल झाला होता. तीन प्रेक्षक हा सर्व प्रकार करत चिडवत होते आणि ते गप्प सहन केले, असा दावा कॅन्डिसने केला. अपमानाचा बदला घेण्यासाठी ... ...

स्मिथ आणि वॉर्नरवरील बंदी योग्यच- तेंडुलकर मुंबई : बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्राफ्ट यांच्यावरील एक वर्षाचा बंदीचा निर्णय हा योग्यच असल्याचे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे. तर बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली आहे. दरम्यान, या प्रकरणावर सचिन तेंडुलकरने ट्वीट करून आपले मत व्यक्त केले आहे. ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जातो. हा एक असा खेळ आहे की, जो पारदर्शक पद्धतीने खेळला गेला पाहिजे असे माझे मत आहे. जे काही झालं ते अत्यंत चुकीचं झालं. पण याप्रकरणी जो निर्णय घेण्यात आला आहे तो अतिशय योग्य आहे. विजय हा महत्त्वाचाच असतो. पण तो तुम्ही कशा पद्धतीने मिळवता हे अतिशय महत्त्वाचं असतं.’ असं ट्वीट सचिननं केलं आहे. ...

स्मिथ, वॉर्नर, बॅंक्रॉफ्ट यांची क्षमायाचना स्मिथने स्वीकारली “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणाची जबाबदारी सिडनी  – “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणी दोषी ठरल्यानंतर निलंबित करण्यात आलेला ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट यांनी आपल्या चुकीबद्दल क्षमायाचना केली आहे. निलंबनानंतर मायदेशी परतल्यावर या तिघांनीही वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्या चुकीची कबुली देतानाच क्रिकेटशौकिनांची, तसेच देशवासीयांची क्षमाही मागितली. स्मिथ व बॅंक्रॉफ्ट यांनी या प्रकरणात सहभाग घेतला असला, तरी संपूर्ण कट वॉर्नरनेच रचल्याचेही उघड झाले आहे. सिडनी विमानतळावरच झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथने या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. बॉल टॅम्परिंगचा कट रचताना त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतील, याची मला कल्पनाच आली नव्हती, असे सांगून ही घटना म्हणजे आपल्या नेतृत्वाचे अपयश असल्याची कबुलीही स्मिथने दिली. सगळ्यांना मिळालेला धडा हीच एक या सगळ्यातून निर्माण झालेली ... ...

डेडलीफ्ट स्पर्धेमध्ये परमीत घई प्रथम ,सलोनी आव्हाड, प्रियंका गोल्हाईत, पूजा  पाटील यांनी मारली बाजी मराठवाडास्तरीय बेंच प्रेस स्पर्धा उत्साहात औरंगाबाद- मराठवाड्यात  पहिल्यांदाच आरेफ सय्यद बॉडी बिल्डर अ‍ॅण्ड फिटनेस ट्रेनरच्या वतीने मराठवाडास्तरीय बेंच प्रेस या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिला व तरुणींसाठी  विशेष या स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते.  यामध्ये तरुणींसाठी  डेड लिफ्ट तसेच फिटनेस चॅलेंजर्स या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये स्ट्रॉंग वुमन, फिट वुमन तसेच वंडर वुमन निवडण्यात आल्या.   डेडलीफ्ट स्पर्धेमध्ये चाळीस ते नव्वद किलो वजना मध्ये परमीत घई हिने  ८७ किलो वजन डेड लिफट करून  प्रथम पारितोषिकाचा मान मिळविला तर द्वितीय डॉ. प्रियंक गोल्हाईत हिने ८५ किलो वजन डेड लिफट् करून  द्वितीय तर नाजेमा शहा हिने ७० किलो वजनात तृतीय क्रमांक  पटकाविला. ...

क्रीडा क्षेत्राला उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्व.विजय मांजरेकर-रमाकांत देसाई टी-20 क्रिकेट स्पर्धांचा प्रारंभ मुंबई, दि. २४ : खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन क्रीडा क्षेत्राला उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून क्रीडा संघटनांचाही प्राधान्याने उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्याचा दृष्टिकोन असावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाणेफेक करुन शिवाजी पार्क जिमखानातर्फे (एसपीजी) शिवाजी पार्क (दादर) येथे आयोजित स्व.विजय मांजरेकर- रमाकांत देसाई टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्याचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सदानंद सरवणकर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, शिवाजी पार्क ... ...

'हॉर्न नको' आणि 'रस्ते सुरक्षे'चा संदेश देत वानखेडेवर रंगला 20 - 20 क्रिकेट सामना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला सामन्याचा शुभारंभ मुंबई : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहन चालविताना ‘हॉर्न वाजवू नका’ तसेच रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यासाठी मुंबईत आज भारतीय क्रिकेट संघातील खेळाडुंचा विशेष २०-२० सामना खेळण्यात आला.   वानखेडे स्टेडियम येथे आयोजित या मॅचचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. परिवहन मंत्री दिवाकर रावते, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान नरी कॉन्ट्रॅक्टर यावेळी उपस्थित होते.   यावेळी माजी कप्तान सुनिल गावसकर, अजित वाडेकर यांना ... ...

'नो हाँकिंग' जागृतीबाबत भारतीय क्रिकेट संघाच्या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन मुंबई, दि. २१ : परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नो हाँकिंग जनजागृतीकरिता भारतीय क्रिकेट संघाच्या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. नो हाँकिंग इलेव्हन विरुद्ध रोड सेफ्टी इलेव्हन यांच्या दरम्यान हा 20-20 सामना 24 मार्च रोजी सायं. 7 वा वानखेडे स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनीय सामन्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना  देण्यासाठी माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर हे आज विधानभवनामध्ये आले होते. या सामन्यात भारतीय संघातील शिखर धवन, अजिंक्य रहाणे, के. राहुल, सुरेश रैना, युवराज सिंग, दिनेश कार्तिक आदी नामांकित क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. ...