पाटोद्याच्या राहुलला सुवर्णपदक राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा : कुस्ती क्रीडाप्रकारांत भारताची दणदणीत सुरुवात गोल्ड कोस्ट – अनुभवी कुस्तीगीर सुशील कुमार आणि युवा कुस्तीगीर राहुल आवारे यांनी आपापल्या गटांत सुवर्णपदकाची कमाई करताना येथे सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील सलग आठव्या दिवशी भारताला सोनेरी यश मिळवून दिले. त्यामुळे स्पर्धेतील प्रत्येक दिवशी किमान एक सुवर्णपदक जिंकण्याची भारताची परंपरा कायम राहिली आहे. मात्र भारताच्या बबीता फोगटला महिलांच्या कुस्तीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या राहुल आवारेने पुरुषांच्या 57 किलो गटांतील अंतिम फेरीत कॅनडाच्या स्टीव्ह ताकाहाशीचा प्रतिकार 15-7 अशा गुणफरकाने संपुष्टात आणताना भारताला कुस्तीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. एक वेळ 6-7 असा पिछाडीवर असतानाही राहुलने झुंजार पुनरागमन करीत आघाडी घेतली. त्यानंतर लढत संपण्यास सुमारे एक मिनिट बाकी असताना राहुलच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. परंतु वेदना होत ... ...

राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांना राज्याकडून रोख पारितोषिके जाहीर मुख्यमंत्र्यांकडून खेळाडू-मार्गदर्शकांचे अभिनंदन मुंबई, दि. 11 : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले असून या खेळाडूंसह यापुढेही पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.   राज्य शासनाकडून क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडू व त्यांच्या ... ...

ब्राव्होच्या झुंजार खेळीने चेन्नई ठरली ‘सुपर किंग’ मुंबईचा विजय हिसकावला! मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांची आयपीएलच्या ११ व्या मोसमातली पहिली लढत मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आली. अत्यंत चुरशीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबईच्या हातून विजय अक्षरशः हिरावून घेतला. त्यामुळे दोन बलाढ्य संघांमधला चुरशीचा सामना पुन्हा एकदा अनुभवला. शेवटच्या षटकापर्यंत प्रत्येक चेंडूवर काय होईल याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. ८ गडी बाद होऊनही चेन्नईने सामना खिशात घातला तो ब्राव्होच्या आक्रमक खेळीमुळे. ब्राव्होने ३० चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकार मारून ६८ धावांची खेळी केली, ज्यामुळे मुंबईच्या तोंडून अक्षरशः विजयाचा घास हिसकावून घेतला गेला. डावाच्या सुरूवातीला वॉटसनने चांगली सुरुवात केली. मात्र तो झेलबाद झाला आणि त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जची पडझड सुरु झाली. अंबाती रायडूची विकेट मयंक मारकंडेने घेतली. त्यामुळे चेन्नईला आणखी एक झटका बसला. ज्यानंतर सुरेश रैना ४ धावांवर, महेंद्र सिंह धोनी ५ ... ...

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : वेंकट राहुल  ठरला सुवर्णपदकाचा मानकरी गोल्ड कोस्ट : भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची मालिका सुरु केलेली आहे. त्या मालिकेत वेंकट राहुल रगाला याचे देखील नाव आज सामील झाले आहे. ८५ किलो वजनी गटात त्याने ३३८ किलो वजन उचलून हे पदक पटकावले आहे.     आज सकाळी सतीश शिवलिंगम या भारताच्या वेटलिफ्टरने ७७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले होते. ७७ किलो वजनी गटातील सतीशने ३१७ किलो वजन उचलून आपल्या नावावर हा विजय केला. अटीतटीच्या या सामन्यात शिवलिंगम यांने इंग्लंडच्या जॅक ऑलिव्हरला मागे टाकले.   ४ तारखेपासून सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या खेळांमधील भारताचे हे ६ वे पदक आहे. मीराबाई चानू (सुवर्ण), संजिता चानू (सुवर्ण), दिपक लाथर (कांस्य), पी.गुरूराजा (रजत) यांनी आत्तापर्यंत भारताचा झेंडा उंचावला असून पदक ... ...

भारताच्या मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक नव्या विश्वविक्रमासह राष्ट्रकुलमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे कालपासून सुरु झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आजच्या पाहिल्यास दिवशी भारताने सुवर्ण कामगिरी करत वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्ण पदक पटकावले आहे. भारताची मीराबाई चानू हिने नवा विश्वविक्रम रचत ४८ किलोग्रॉम वजनीगटामध्ये हे सुवर्णपदक पटकावले आहे. या या सुवर्णपदकाबरोबरच आजच्या पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी दोन पदके जमा झाली आहेत.   महिला वेटलिफ्टिंग गटामध्ये मीराबाईने ८६ किलोग्रॉम स्नॅचमध्ये आणि ११० किलोग्रॉम क्लीन अॅण्ड जर्क असे मिळून एकूण १९६ किलोग्रॉम वजन उचलले. स्नॅचच्या पहिल्या फेरीमध्ये मीराबाईने ८० किलोग्रॉम त्यानंतर ८५ आणि शेवटच्या टप्प्यात ८६ किलोग्रॉम वजन उचलले. यातील तिसऱ्या प्रयत्नात ८६ ... ...

 मुंबई क्रिकेट असोसिएशनवर प्रशासकाची नियुक्ती मुंबई : लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आता प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. उच्च न्यायालयाच्या दबावानंतर भानावर आलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. बीसीसीआयनेही या नावांना पसंती दिली. त्यामुळे गुरुवारपर्यंत उच्च न्यायालय यासंदर्भात आपले आदेश जारी करणार आहे. एमसीएची निवडणूक प्रक्रिया आणि घटना दुरुस्तीची कामं ही आता प्रशासकांच्या देखरेखीखाली होतील. मात्र IPL च्या आयोजनात कोणतीही आडकाठी येणार नसल्याचंही उच्च न्यायालयाचे यावेळी केले स्पष्ट. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोढा समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणे हे देशातील प्रत्येक क्रिकेट संघटनेला बंधनकारक आहे. त्यामुळे एमसीएही त्याला अपवाद नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले ... ...

अव्वल क्रिकेटपटूंवर बीसीसीआयची नजर… नवी दिल्ली – सात आठवडे चालणाऱ्या आयपीएलच्या 11 व्या पर्वात खेळणाऱ्या आघाडीच्या 50 क्रिकेटपटूंची कामगिरी आणि फिटनेस यावर बीसीसीआय जवळून नजर ठेवणार आहे. या खेळाडूंना मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी ताजेतवाने ठेवता यावे हा यामगील हेतू आहे. आघाडीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि स्थानिक प्रतिभावान खेळाडू यांचा वेगवेगळा पूल तयार करण्याचा बीसीसीआयचा विचार असल्याची माहिती आहे. यामुळे संघाची कामगिरी उंचावणे आणि खेळाडूंना दुखापतीपासून दूर ठेवणे शक्‍य होणार आहे. बीसीसीआय आघाडीच्या 50 खेळाडूंवर जवळून लक्ष ठेणार आहोत. या 50 जणांमध्ये 27 जण केंद्रीय करारप्राप्त तसेच 23 अन्य खेळाडू असतील. आयपीएलदरम्यान या खेळाडूंची कामगिरी आणि हालचालींवर विशेष लक्ष असेल. भारताच्या इंग्लंड दौऱ्यापासून खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांना संधी दिली जाणार आहे. 2019 च्या विश्वचषकापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. या खेळाडूंमधून आवश्‍यक फिटनेस नसणाऱ्या खेळाडृंच्या नावाचा विचार भारतीय अ संघासाठीही होणार नाही. ... ...