क्रीडा भारती रौप्य महोत्सवी मॅरेथॉन स्पर्धेत १३७० खेळाडूंचा सहभाग शुभम, सोनाली, विष्णु, संचीता, संतोष, तबस्सुम आपआपल्या गटात विजयी   औरंगाबाद-क्रीडा भारती, भारतीय खेळ प्राधिकरण, मनपा औरंगाबाद व औरंगाबाद जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय खेळ प्राधिकरण (साई), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीसर येथे आयोजित क्रीडा भारती रौप्य महोत्सवी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १३७० खेळाडनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिरीष बोराळकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आयोजन समितीची अध्यक्ष मुकुंद भोगले, साई चे उपसंचालक विरेंद्र भांडारकर, विद्यापीठ क्रीडा विभागाचे संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे, डॉ. दिवाकर कुलकर्णी, डॉ. गजानन सानप, सुभाष शेळके, जिल्हा अ‍ॅथलेटीक्स संघटनेचे सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. पी. आर. ... ...

फूटबॉल सेल्फी पॉईंटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन मुंबई : जागतिक महासंघांची (फिफा) 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आज मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फूटबॉल सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या दशकापूर्वी लागलेल्या आगीनंतर नव्याने झळाळी मिळालेल्या मंत्रालयाचे सर्वांनाच आकर्षण लागून राहिले आहे. गारेगार वातानुकुलित वातावरण, कार्यालयांच्या पारदर्शक भिंती, सरकते जीने आणि त्रिमुर्तीमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली मंत्रालयाची नवीन इमारत आता सेल्फी पॉईंट ठरू लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज जागतिक महासंघांच्या (फिफा) विश्वचषक स्पर्धेनिमित्त मंत्रायालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या फुटबॉल सेल्फी पॉईंटवर सहकारी मंत्र्यांचे मोबाईलद्वारे फोटोसेशन केले. मंत्र्यांचे खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच केले जात असलेले फोटोसेशन पाहण्यासाठी मंत्रालयातील अधिकारी व ... ...

टी-20 क्रिकेट सामन्यातही भारताचा दणदणीत विजय विराट कोहली, मनीष पांडेचे झंझावाती अर्धशतक कोलंबो – एकमेव टी-20 क्रिकेट सामन्यातही भारताने श्रीलंकेवर 7 गडी आणि 4 बॉल राखून दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयाने भारताने एकही सामना न हारता हा दौरा जिंकला आहे. श्रीलंकेने दिलेल्या 171 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली. रोहीत शर्मा 9 धावंवर तर आर. राहूल 24 धावांवर बाद झाले. मात्र, त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने झंझावाती अर्धशतक करत 82 धावांची खेळी केली. तर दुसरिकडे त्याला एम. पांडेने मोलाची साथ देत आपले अर्धशतक पुर्ण केले. पांडे नाबाद राहिला तर महेंद्रसिंग धोनी ही 1 धावांवर नाबाद राहीला. दिलशान मुनावीराचे झंझावाती अर्धशतक आणि अशन प्रियंजनने तळाच्या सहकाऱ्यांसोबत केलेल्या बहुमोल भागीदाऱ्या यामुळे येथे पार पडलेल्या एकमेव टी-20 सामन्यात श्रीलंकेला भारतासमोर विजयासाठी 171 धावांचे आव्हान ठेवता आले. नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाने निर्धारित 20 ... ...

लंकेत  डंका, कसोटीनंतर ‘वन डे’मध्ये व्हाईट वॉश कोलंबो भारत आणि श्रीलंका संघात झालेल्या पाचव्या व अंतिम सामन्यात भारताने  लंकेचा ६ विकेटने पराभव केला आहे. या विजयासह भारताने  पाच सामन्यांच्या मालिकेत सर्व सामने जिंकत लंकेला व्हाईट वॉश देण्याची किमया साधली आहे. कसोटीपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही भारताने  निर्भळ यश मिळवले आहे. लंकेने विजयासाठी दिलेले २३९ धावांचे आव्हान भारताने  ४ गडी गमावून ४७ व्या षटकात पूर्ण केले. विदेशामध्ये कसोटीपाठोपाठ आणि एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश देण्याची भारताची  ही पहिलीच वेळ आहे. भारतातर्फे  कर्णधार विराट कोहलीने शतक, तर केदार जाधवने अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने ११७ चेंडूंचा सामना करताना ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ११० धावा केल्या, तर केदार जाधवने ७३ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांच्या सहाय्याने ६३ धावा केल्या. विजयासाठी २ धावांची आवश्यकता असताना केदार जाधव बाद झाला. त्यानंतर कोहली आणि धोनीने विजयाची ... ...

सचिनने घेतले बाप्पाचे दर्शन मुंबई: मुंबईच्या सर्वात जुन्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या सोहळ्यात आज सचिन सहभागी झाला. त्याने या वेळेस १२५ वर्षपासून चालत येणाऱ्या गिरगांव येथील गणेशाचे दर्शन घेऊन या परंपरेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि असा  हा  सर्वाना एकत्र आणणारा उत्सव चालू राहो असा भावना  त्याने व्यक्त केल्या.     सौजन्य :- ट्विटर  ...

क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी- पंकजा मुंडे बीड : अंबाजोगाई शहर हे शिक्षणाचे व संस्कृतीचे माहेरघर असून येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलामुळे येथील खेळाडूंना खेळाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. भविष्यात येथे उत्कृष्ट खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच येथील खेळाडूंना आपल्या खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. अंबाजोगाई येथील तालुका क्रीडा संकुलाच्या भूमीपूजनप्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाला आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा रचना मोदी, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा परिषदेचे सदस्य अविनाश मोरे, सुनिल गिराम, रमेश पोकळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती नंदा खुरपुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती मुंडे म्हणाल्या, क्रीडा संकुलामुळे अंबाजोगाई तालुक्यासह ... ...

भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय कोलंबो – कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्या शतकांनंतर गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या गोलंदाजीच्या बळावर भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 165 धावांनी धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळविला. सलग चौथ्या विजयाने पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 4-0 अशी आघाडी मिळवली आहे. भारताने ठेवलेल्या 376 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची संपूर्ण टीम 207 धावांत गारद झाली. भारताने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या तडाखेबंद शतकांच्या बळावर लंकेसमोर 375 बाद धावांचा डोंगर उभा केला होता. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक 70 धावा केल्या. त्याच्या एकाकी झुंजीमुळे लंकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वेगवान शतके नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारण्याचा कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे भारतीय फलंदाजांनी दाखवून दिले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वेगवान शतके आणि त्यांनी केलेल्या द्विशतकी ... ...