संपादकीय सध्या क्रिकेट जगतात तळपता तारा म्हणून जर कोणाचे नाव घेतले जात असेल तो म्हणजे विराट कोहली होय. युवकांच्या गळ्यातील ताईत तो बनला आहे. त्याची खेळण्याची खास शैली, दाढी ठेवण्यासह केसांची हटके स्टाईल यामुळे युवकांप्रमाणेच युवतींमध्ये देखिल तेवढाच लोकप्रिय आहे. आज ज्याच्या नावात विराट असल्याने त्या नावाला साजेशा खेळी तो क्रिकेटमध्ये करत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष त्याच्याकडे न गेल्यास नवल. दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंड सोबतच्या एकदिवसीय मॅचमध्ये ते ते दीड शतक झळकवले आहे ते पाहता तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या पेक्षा जास्त गतीने आणि कमी सामन्यात तो शतकांचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. भारतात क्रिकेट म्हटले की, इतर खेळांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते ही बाब नाकरता येत नाही. साहेबांचा देश म्हणून ओळख असलेल्या इंग्लडचा हा मुळ खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये त्यांच्या पेक्षाही जास्त सरस कामगिरी भारतीयांनी पूर्वीपासूनच केली आहे. आज इंग्लडंची ...

संपादकीय उत्तरप्रदेशात 2017 मध्ये सार्वत्रीक निवडणुका होत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर यादव परिवारातील कलह चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील वादात नेताजी अर्थात मुलायमसिंग यादव यांची चांगलीच गोची झाली आहे. गेल्या महिन्याभरापासुन सुरू असलेला हा वाद पक्षाच्या व्यासपीठावर सोडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु अजुनही हा वाद सुटलेला नाही. अखिलेश यादव हे मुख्यमंत्री म्हणुन राज्याचे प्रमुख आहेत. मुलायमसिंग हे पक्ष प्रमुख आहेत. तर शिवपाल यादव हे पक्षाचे उत्तरप्रदेशाध्यक्ष आहे. मुळात अमरसिंह यांच्या भोवतीच हा वाद फिरत आहे. अमरसिंह यांची पक्षात पुन्हा ऍन्ट्री झाली. आणि वादाला तोंड फुटले मुळात राजकारणांनी या वादाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे. एखाद्या पक्ष म्हटला की त्याचे कर्ते धर्ते आपणच मालक असल्याप्रमाणे आपल्याच घरातील सदस्यांना पक्षात आणि सरकार मध्ये स्थान देवुन मोकळे होतात. पक्षासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्याची कुठली ... ...

संपादकीय भारतीय संस्कृतीत दिवाळ सणाला मोठे महत्व आहे. प्रभूरामचंद्र हे दिवाळीच्या दिवशीच 14 वर्ष वनवास भोगून आणि रावणावर विजय मिळवून दिवाळीलाच आयोध्येत पोहचल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे त्यावेळी संपूर्ण आयोध्या नगरी ही दिव्यांनी सजली होती. तेव्हांपासून भारतात दिवाळी सण हा अंत्यत महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवाळी सणाच्या वेळी खरीपातील  अन्नधान्य बाजारात येते. पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कपाशीची चाहूल बाजारपेठेत लागते. त्यामुळे खऱ्या अर्थाने कष्टकरी बळीराजाच्या हातात थोडाबहूत का होईना पैसा येतो. या शेतात घाम गाळून आलेल्या पैशाची पूजा करणे म्हणजेच लक्ष्मीपूजन होय. या दिवशी सर्वत्र मौल्यवान वस्तू पुजेच्या तामणात ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. दिवाळी निमित्त पाडवा, भाऊबीज, धनतेरस हे देखिल लागून येतात. या प्रत्येक दिवसाचे स्वतंत्र महत्व पुरणात नमूद केले आहे. एकूणच दिवाळी हा उत्साह आणि आनंदाचा सण म्हणून यावेळी फटाके फोडून या सणाचे स्वागत केले जाते. हे फटाके फोडत असतांनाच आता आपण सर्वांनी काळजी घेण्याची ... ...

संपादकीय राज्यातील जवळपास दोनशे नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणूका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर राज्यातील काही जिल्हा परिषदा, पंचायती समिती यांच्या निवडणूका होणार आहेत. निवडणूकांची ही रणधूमाळी 2017 च्या मध्यपर्यंत सुरुच राहणार आहे. या सर्व निवडणुकांमध्ये सर्वच प्रमुख पक्ष आणि स्थानिक राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करतांना दिसत आहे. अर्थात प्रत्येक पक्षाने आपले धोरण ठरविले आहे, प्रत्येक पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असतो आणि ही वाढ निवडणुकांच्या निकालामुळे स्पष्ट होते. निवडणुकीत सातत्याने पराभूत होणारे पक्ष देखील या निवडणुकांमध्ये स्वतंत्र्य लढण्याच्या मनस्थितीत आहे. याचाच अर्थ पालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पक्षांना किंवा स्थानिक लोकप्रिय व्यक्तिंना महत्त्व प्राप्त होते. विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्यांना फारशे महत्त्व नसते. परंतु पालिका निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे महत्त्वाचे आणि निर्णायक ठरतात. हे सर्वच राजकीय पक्षांना ज्ञात आहे. तरी देखील त्या त्या ... ...

बहिष्कार; मुळासगट  उखडून फेका भारताने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याने चीनला हे पचनि पडलेले नाही. मुळात पाकिस्तानचे भुमि वापरुन आपल्या देशाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचे स्वप्न चीन पाहत आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या सर्वच चुकीच्या भुमिकांना चीन कुठलाही विचार न करता  समर्थन देत आहे. हि मुळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधासाठी घातकबाब आहे. सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तान जेवढ बरळाचा होता, तेव्हाढा बरळला त्याला चीन ची ही साथ होती. पाकिस्तानातील दहशतवादी मसुद अझहरला दहशतवादी घोषित करण्यासही चीन चा विरोध आहे. यावरुन चीन आपल्या स्वार्थासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो. हे यावरुन सिद्ध होते. मध्यंतरीच्या काळात चीन संबंधाबाबत फारशी चर्चा होत नव्हती. परंतु आता पाकिस्तान, चीन आणि भारत यांच्या मधील अंतरगत  संबंध मोठ्या प्रमाणावर दुरावले आहेत. पाकिस्तानला बळ देण्याची भाषा करणाऱ्या चीनला भारत आर्थिक दृष्ट्या कमकुवत करु शकतो. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गणेशोत्वापासून भारतात विकल्या जाणाऱ्या चीनी मालावर ... ...

मोबाईल ठरतोय  डोळ्यांसाठी कर्दनकाळ  आज ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल दिसत आहे. हा मोबाईल जसा बहुपयोगी तसाच तो विशेष करून डोळ्यासांठी कर्दनकाळ ठरत आहे. याची सर्वात जास्त शिकार ही लहान मुले आणि टीन-एजर्स होत आहेत. आज घरात जेवढ्या व्यक्ती तेवढे मोबाईल झाले आहेत. त्यामुळे लहान मुलांना तो मोबाईल अंत्यत सहजपणे हाताळायला मिळत आहेत. याचे पहिल्यांदा घरातल्यांना मोठे कौतूक असते. आम्हांला मोबाईलमध्ये जे काही फिचर्स आहेत ते कळत नाहीत. परंतु आमच्या छोट्या मुलाला ते कळतात ही एकप्रकारे त्याची स्तुती करून तो किती हुशार आहे हेच दर्शविण्याचा एक प्रकार जवळपास प्रत्येक पालक करतांना दिसतात. मात्र हे थोड्यावेळचे कौतुक मुलांसाठी मोठे घातक असल्याचा निष्कर्ष नुकत्याच झालेल्या दृष्टीदिनाच्या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे.  त्यात साधारपणे 14 ते 18 या वयोगटातील मुलांचा मोबाईल वापर हा मोठं्यापेक्षा जास्त असल्याचे नमूद केले आहे, ही बाब अंत्यत गंभीर आहे. याचा प्रत्येक पालकाने गंभीरतेने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. दृष्टीदान दिना ... ...

संपादकीय गेल्या महिन्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र विविध प्रकारच्या मोर्चांनी दणाणून गेला आहे. कोपर्डी येथील एका अल्पवयीन मुलींवर जो अमानवीय अत्याचार करून तिला माथेफिरूंनी संपविले. या ऱ्हदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणातील आरोपींरिूध्दचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर अत्ंयत शिस्तबध्द पध्दतीने लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने काढले. त्यात ऍट्रॉसिटी  कायद्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली. हे मोर्चे निघताच ऍट्रासिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, मागणीसाठी  दलित समाजही आता रस्त्यावर उतरला आहे. तर मुस्लिम समाजालाही पाच टक्के शिक्षण क्षेत्राप्रमाणेच  नोकरीतही हे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी  जालन्यात मुस्लिम समाजही मंगळवारी रस्त्यावर उतरून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे करीत जोरदार घोषणाबाजी केली. एकूणच काय तर प्रत्येकजण आपल्या मागण्यासांठी मोर्चा काढत आहे. ही बाब ... ...