देशातील आर्थिक क्षेत्रासाठी कालचा मंगळवार वेगळा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करतांना 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून बंद होणार असल्याचे घोषित केले. दरम्यान पुढच्या 50 दिवसात सर्वसामान्यांकडे असलेल्या नोटा बॅंका आणि पोस्टांच्या माध्यमातून बदलल्या जाऊ शकणार आहेत. हा सर्वसामान्यांसाठी दिलासा आहे. मोदींनी ही घोषणा करताच देशात "अर्थकंप' झाला. मोदींच्या या निर्णयाचे विविध राजकीय पक्षांसह उद्योग क्षेत्राने आणि विशेष करून अर्थकारण समजणाऱ्या प्रत्येक सामान्य भारतीयाने स्वागत केले आहे. मोदींच्या या निर्णयाचे देशाच्या आर्थिक क्षेत्रावर दुरगामी परिणाम होणार आहेत. अनेक वर्षांपासून दबलेला काळा पैसा या निमित्ताने बाहेर येणार आहे किंवा नष्ट होणार आहे. हा निर्णय घोषित करण्यापूर्वी मोदींनी राष्ट्रपतींनाही कल्पना दिली होती. एवढेच नाही तर पंतप्रधांचे आर्थिक सल्लागार, देशाचे अर्थमंत्री, अर्थसचिव आणि रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर यांना या विषयाची माहिती होती. परंतू देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि ... ...

गेल्या काही वर्षात बदलत्या राजकारणांचे अनेक रंग आपण पाहात आलो आहोत. नेत्यांच्या भोवतीच फिरणारे राजकारण कार्यकर्त्याना मात्र गिरक्या घालायला लावणारे आहेत. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी राजकारण कोणत्याही स्तराला जात आहे. ऐवढेच नाही तर अलिकडच्या काळात राजकारणातील भाऊबंदकीचा वाद ऐरणीवर आला आहे. सध्या उत्तरप्रदेशातील यादवी सर्वाच्या डोळ्यांसमोर आहे. येथे काका आणि पुतण्यातील विसंवाद वाढला आहे. अख्खा उत्तरप्रदेश यांचे परिणाम भोगतो आहे. काका शिवपाल यादव आणि पुतण्या मुंख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील या वादासमोर समाजवादींचे नेताजी मुलायमसिंग यादव यांनी हात टेकले आहेत. मला मुख्यमंत्रीपद नको म्हटणाऱ्या शिवपाल यादव यांनी उत्तरप्रदेशातील पक्षाची सुत्रे हाती घेवुन मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यादव यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. दुसरीकडे अखिलेश यादव शिवपाल यांच्यावर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे भविष्यातील समाजवादींचे हे राजकारण काय रंग दाखवेल हे सांगता येणे कठीण झाले आहे. काका - पुतण्यांचा हा मुद्दा ... ...

 शाळाबाह्यमुलांना शाळेत आणण्यासाठी सरकार कडुन विविध उपाय योजना केल्या जातात. गेल्या अनेक वर्षापासुन सरकारी शाळांमध्ये माध्यांन्न भोजन हा विषय सुरू झाला. या निमित्ताने भटके, आदिवासी आणि गरिबांची मुले नेहमी शाळेत येतील असा सरकारचा कयास होता. परंतु आजही हजारो मुले शाळांबाह्य आहेत. त्यांना शाळेत आनण्याच्या दृष्टीने आणि शाळेतील हजेरी दिसावी या उद्देशाने सरकारने आता सेल्फीचा नविन फंडा शोधुन काढला आहे. या माध्यमातुन नियमित शाळेत न येणाऱ्या मुलांचे आडिट केले जाणार आहे. जानेवारी 2017 पासुन सरकारचे हे सेल्फी प्रकरण सुरू होणार आहे. प्रत्येक सोमवारी सकाळी, शिक्षकांने आपल्या वर्गातील मुलांचा सेल्फी फोटो काढुन तो शिक्षण विभागात पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे. दहा मुलांचा एक गट करून शिक्षकांने ही सेल्फी काढायची, फोटोत असलेल्या मुलांच्या नावाची यादी करून अपडेट ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. एकीकडे सेल्फीने तरूणाईला वेड लावले आहे. सेल्फी पायी अनेक तरूणांनी आपल्या जीवही गमावला आहे. त्यामुळे सरकारला पोलिसंाच्या माध्यमातुन अनेक ... ...

दिवाळी  हा सण उत्साह आणि आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवाळी सणावर बाजारपेठेचे मोठे गणित अवलंबून असते. यंदा दिवाळी चा आनंद व्दिगूणित होण्याचे दुसरे कारण म्हणजे जोरदार झालेला पाऊस हे होय. या चांगल्या पावसामुळे निसर्गासह प्रत्येकाच्या मनामनात आनंद संचारला. या आनंदावर स्वार होत एकूणच बाजारपेठेत जी मरगळ आली होती. ती थोडी का होईना दूर झाली आहे. वाहन बाजारातील चित्र तर दिलासादाायकच म्हणावे लागेल. चारचाकी आणि दुचाकींसाठी ही दिवाळी  तर लक्षणीय ठरली. त्या पाठोपाठ घरबांधणी व्यवसायाला देखिल या दिवाळीत बरीच झळाळी मिळाली. त्याचे कारण पंतप्रधान आवास योजना हे देखिल कारणीभूत ठरले. या योजनेतून सुलभ कर्ज तसेच मिळणाऱ्या अनुदानामुळे गोरगरींबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होत आहे. एकट्या जालन्याचा विचार केल्यास जे घर बांधणी क्षेत्र पूर्णपणे थंड झाले होते. त्याला या नवीन आवास योजनेचे बुस्टर मिळाले. आज जालना शहराच्या चाहू बाजूंनी फेरफटका मारल्यास बंद पडलेली घरबांधणीची कामे पुन्हा नव्याने सुरू झाल्याचे चित्र आहे. यामुळे घरांचे ... ...

दिवाळी निमित्त कितीही जाणीव जागृती झाली तरी फटाके हे लोकांनी तेवढ्याच उत्साहाने फोडले. या फटाक्यांचे आवाज आता क्षिण झाला आहे. असे असतानाच ऐन दिवाळीत राज्यातील 200 पेक्षा अधिक नगर पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिवाळीपूर्वी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची तारीख दिली होती. त्यामुळे अर्ज भरलेल्या प्रत्येकानेच आपल्या वॉर्डातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा मोठ्या आत्मीयतेने दिल्या. तसेच आपल्याला मतदान केल्यास आपण वॉर्डाचा कायापालट करू अशी ग्वाही देण्यासही हे उमेदवार विसरले नाहीत. त्यामुळे यंदा दिवाळीत अप्रत्यक्षपणे प्रचाराची ठरली. आत दिवाळी संपली असून, उमेदवारी अर्जांची छाननी देखिल पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता केवळ उरले आहेत ते अर्ज मागे घेण्याचा मुहूर्त एकट्या जालना पालिकेचा विचार केल्यास साडेसहाशे पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज हे नगरसेवकासाठीर तर अध्यक्षपदासाठी 33 जणांचे 39 अर्ज आले आहेत. यावरूनच या निवडणुकीबाबत नागरीकांमध्ये आणि विशेष करून युवकांमध्ये किती क्रेझ आहे हेच स्पष्ट होते. प्रत्येकालाच पक्षाचे ... ...

राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्याच्या दफ्ताराचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने मध्यंतरी काही हालचाली केल्या होत्या. 2016 च्या शैक्षणिक सत्रापासुन याबाबत निश्चितपणे काही निर्णय होईल असे ही वाटले होते. दस्तुरखुद्द शिक्षणमंत्र्यानी शाळांमध्ये जावुन विद्यार्थ्याच्या दफ्ताराचे वजन करून पाहिले होते. परंतु 2016 चे आरधे शैक्षणिक पत्र संपले असुन मुलांच्या दफ्तारांचे ओझे मात्र कमी झाले नाही. यामुळे याबाबत काही जागृत पालकांनी न्यायालयात दाद मागीतली. उच्च न्यायालयात याबाबत बुधवारी सुनावणी झाली. ज्या शाळा दफ्तरांचे ओझे कमी करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यांच्यावर थेट कारवाई करा असे आदेशच न्यायालयाने देवुन टाकले आहे. न्यायालयाच्या मते दफ्तारांच्या वाढत्या ओझ्यामुळे कोवळ्या वयात असलेल्या मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. मुलांना होणाऱ्या या त्रांसाची शाळांसह शिक्षक आणि पालकांना जाणीव करून देण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली आहे. दफ्तारांच्या या ओझ्याचा हा प्रश्न खूपच गंभीर होत चालला आहे. मुलांच्या या समस्येकडे कोणीच ... ...

नवी मुंबई महानगरपालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव पारित झाला. मुंढेची आता केव्हाही बदली होऊ शकते. ही बदलीच येथील लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना हवी होते. त्यामुळेच भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष मुंढे विरोधात एकवटले होते. मुंढे विरोधात किंवा मुंढे सारख्या अधिकारा विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित होणे हे महाराष्ट्राला नविन नाही. जुगाडी खेळ करणाऱ्या स्थानिक लोक प्रतिनिधीना असे शिस्तप्रिय अधिकारी चालत नाहीत. जेथे आपले इच्छित साध्य होत नाही. तेथे लोकप्रतिनिधींची चलबिचल होत असते. नवी मुंबई महानगरपालिकेत ही याच चलबिचलीने मुंढेचा बळी घेतला आहे. यापुर्वी मुंढे सारख्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आता मुंढेची बदली झाल्यास ती त्यांची आठ वर्षातील दहावी बदली असेल. म्हणजे सरसरी काढल्यास मुंढेनी एका ठिकाणी साधारण पणे आठ ते नऊ महिने काम केले आहे. शिस्त प्रिय अधिकाऱ्यांच्या अशाच प्रकारे बदल्या होत असल्यास विकासाचा गुंता कसा सुटणार हा खरा प्रश्न आहे. मुळात कायद्यांच्या चौकटीत राहुन ... ...