टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणा-या उद्योगांना राज्य सरकार प्रोत्साहन देणार - सुभाष देसाई मुंबई, दि. १० : टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्रान्स येथील शिष्टमंडळास दिले.   मोठ्या शहरात दिवसेंदिवस स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. याचसोबत कालबाह्य झालेल्या वाहनांची समस्यादेखील सर्वांना भेडसावत आहे. कालबाह्य वाहने नष्ट करून किंवा त्या वाहनांचा पुन्हा वापर करण्यासाठी फ्रान्सची इंदिरा कंपनी कार्यरत आहे. भारतात ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरण संवर्धनासोबत भंगार वाहने नष्ट करण्याचे काम ही कंपनी करत आहे. ... ...

राज्यात खासगी औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यास चालना देणार -  सुभाष देसाई मुंबई, दि. ५ : राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी पोषक ठरतील असे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतेलेले आहेत. खासगी संस्थांमार्फत त्यांचे स्वतःचे औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्यास पुढाकार घेतला जाणार असेल तर राज्य शासन त्यास सहकार्य करेल, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज सांगितले.   ‘झिंटीयो एक्सचेंज इंडिया 2022’ या जागतिक परिषदेचे आज मुंबई येथील ताज पॅलेस येथे उद्‍घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेत जागतिक बदलांसह होत असलेल्या औद्योगिक बदलांचा आढावा घेण्यात येणार आहे. देश विदेशातील मान्यवर या परिषदेत सहभागी झाले होते. ...

आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय उपकरणे पुरविण्याचा फिलिप्स कंपनीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-फिलिप्सचे मेझॉन यांच्यात चर्चा मुंबई : राज्यातील आरोग्य केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण सुविधा पुरविण्याबाबत फिलिप्स कंपनीने तयारी दर्शविली असून प्रस्तावावर अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला दिल्या.   फिलिप्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मेझॉन यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ... ...

जीएसटी आणि नोटाबंदीचा 'इम्पॅक्ट' , प्रत्यक्ष करामध्ये १८ टक्क्यांची  वाढ नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा करांच्या अंमलबजावणीचा परिणाम आता भारतीय महसूल खात्यावर होत असल्याचे दिसत आहे. नोटाबंदीनंतर देशात जीएसटी लागू केल्यानंतर एका वर्षात सरकारकडे जमा होणाऱ्या प्रत्यक्ष करामध्ये तब्बल १८ टक्क्यांची भरघोस वाढ झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केले आहे. तसेच यंदा करदात्यांमध्ये देखील विक्रमी वाढ झाली असल्याचे देखील मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वतः देखील याविषयी माहिती दिली आहे. २०१७-१८ च्या आर्थिक वर्षामध्ये केंद्रकडे तब्बल १० लाख २ हजार ६०७ कोटी रुपये इतका प्रत्यक्ष कर जमा झाला आहे, असे जेटली यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्यक्ष करामध्ये झालेली ही सर्वात मोठी असून कर जमा होण्याचे हे प्रमाण तब्बल १८ टक्क्यांनी ... ...

या आठवड्यात पाच दिवस बँका राहणार नाहीत बंद मुंबई: या आठवड्यात बँकांना गुरुवारपासून सलग पाच दिवस सुट्टी असल्याचा मेसेज सोशल मीडिावर फिरत आहे. त्यामुळे बँकांच्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. मात्र बँकांच्या सलग सुट्ट्यांबाबत बँक प्रशासनाकडून स्पष्टीकरण समोर आले आहे. त्यानुसार बँकांना या आठवड्यात सलग पाच दिवस नव्हे तर केवळ गुरुवारी आणि शुक्रवारी बँका बंद राहणार आहेत. तर ३१ मार्च रोजी पाचवा शनिवार असल्याने बँका सुरू राहतील. बँक प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या परिपत्रकानुसार बँकांना फक्त गुरुवारी २९ मार्च रोजी महावीर जयंतीची आणि शुक्रवारी ३० मार्च रोजी गुड फ्रायडेची सुट्टी असेल. शनिवारी बँकेचे कामकाज सुरू राहील. त्यानंतर सोमवार पासून नियमित कामकाज सुरू होईल. या आठवड्यात 5 दिवस सुट्टी असणार नाही, असे बँकांच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीएस प्रणालीमुळे वर्षअखेरीस बँकांचे काम सोपे झाले आहे. ते शनिवारी सायंकाळी किंवा रविवारी केले जाणार आहे. मार्च अखेरीस ... ...

नीरव मोदीची ७६६४ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त मुंबई : सक्तीवसुली संचलनालयाने आज केलेल्या कारवाईमध्ये हिरे व्यावसायिक नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये नीरव मोदी याच्या मुंबईतील सागर महल या घरात झालेल्या कारवाईमध्ये ही मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती सक्तीवसुली संचलनालयाने ट्टिटरवर दिली आहे. ------------------------------------------- ED @dir_ed ED searches Nirav Modi's Samudra Mahal & seizes high end/ antique jewellery worth Rs 15 crore , watches worth Rs 1.40 crore & paintings of Hussain, Hebbar, Amrita Shergil worth Rs 10 Crore. Total attachment & seizures made till now is worth Rs 7664 Crore. 12:32 PM - Mar 24, 2018 --------------------------------------------------------------------------- या वसूलीमध्ये १५ कोटी रूपयांचे उंची आणि अॅंटीक दागिने, १.४० कोटी रूपयांची घड्याळे, १० कोटी रूपयांची हुसेन, हेब्बार, अम्रिता सिंग अश्या प्रसिध्द कलाकारांची चित्रे अशी संपत्ती यावेळी नीरव मोदीच्या घरातून जप्त करण्यात आली ... ...

उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावे -उपराष्ट्रपती नायडू मुंबई, दि. २३ : उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावे, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले.   ते आज हॉटेल ताज येथे मिंट वृत्तपत्रातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या ‘मिंट कार्पोरेट स्ट्रॅटेजी’  पारितोषिक प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे उपस्थित होते.   श्री. नायडू म्हणाले, देशाच्या विकासात उद्योजकांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे देशाचा विकास दर सातत्याने वाढत आहे. इज ऑफ डुइंग बिझनेसमुळे ... ...