शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी सहा हजार रुपये   शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार   नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळातील अंतरिम अर्थसंकल्प हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी संसदेत मांडला. शेतकरी, कामगार व मध्यमवर्गीयांना समोर ठेऊन अनेक योजना व घोषणा या अर्थसंकल्पातून गोयल यांनी मांडल्या आहेत. अर्थमंत्री गोयल यांनी केलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे. यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. या योजनेचा १२ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू होणार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. ही योजना लागू करण्यासाठी वर्षाला 75 हजार कोटी रुपये ... ...

प्रगतीच्या दिशेने देशाला घेऊन जाणारे #Budget 2019 – अरूण जेटली नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पियुष गोयल यांनी छोट्या शेतकऱ्यांपासून मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. याबदल केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी अर्थमंत्री पियूष गोयल यांचे कौतुक केले आहे. या बजेटमुळे मध्यम वर्गीय लोकांची स्वप्ने साकार होतील असे म्हटले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेला गेले असल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार पियूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जेटली यांच्या गैरहजेरीत गोयल यांनी शुक्रवारी 2019-20 चा अंतरिम बजेट मांडले. त्यानंतर जेटली यांनी ट्टिट करत म्हटलं आहे की, हे बजेट प्रगतीच्या दिशेने देशाला घेऊन जाणारे आहे. गरीबांना शक्ती देणारा, मध्यमवर्गाची स्वप्ने साकार करणारा आणि श्रमिकांना सन्मान देणारा तसेच सर्वाना अनुकूल असा हा अर्थसंकल्प आहे. त्यांनी म्हटले, ... ...

#Budget 2019: जाणून घ्या…अर्थसंकल्पातील ३७ महत्वाचे मुद्दे !   नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. गोयल यांनी लोकसभेत २ तास अर्थसंकल्पावर भाषण दिले. दरम्यान, त्यांनी मोदी सरकारची ५ वर्षाची कामगिरी सांगितली. तसेच अनेक आश्वासने आणि घोषणा केल्या. जाणून घ्या थोडक्यात संपूर्ण अर्थसंकल्प… #Budget 2019 : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा #Budget 2019 :कामगारांना 7 हजाराचा ... ...

पाहा काय म्हणतात अर्थमंत्री नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार २०१९चा अर्थसंकल्प आज संसदेत आज सादर होत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे अर्थसंकल्प सादर करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. मोदी सरकारने भ्रष्टाचाराला थारा दिला नसल्याचा उल्लेखदेखील त्यांनी केला. पुढील चार महिन्यासाठीचा हा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या भाषणातील ठळक मुद्दे  • रेल्वे खात्यासाठी ६४ हजार ५०० कोटींची तरतूद • २४ तासांत आयटी रिटर्नची प्रक्रिया पूर्ण होणार • देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्या प्रवांशांमध्ये दुपटीने वाढ झाली • गर्भवती महिलांसाठी २६ आठवड्यांची पगारी सुट्टी मिळणार • २१ हजारापर्यंत पगार असलेल्या कामगारांना ७ हजार रुपये बोनस ... ...

देशाच्या इतिहासात संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक निधी! २०१९-२०च्या अर्थसंकल्पात तब्बल ३ लाख कोटी रुपयांची तरतुद नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी सरकारने २०१९-२०चा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठं-मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी देखील मोठी आणि ऐतिहासिक तरतुद केली आहे. तब्बल ३ लाख कोटी रुपयांची तरतुद संरक्षण क्षेत्रासाठी केली असल्याची माहिती गोयल यांनी दिली. अर्थमंत्री गोयल यांनी संरक्षण क्षेत्रासाठी ३ लाख कोटी रुपयांची केलेली तरतुद ही भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतरचे सर्वात मोठी तरतूद आहे. यावेळी गोयल म्हणाले, "आपले सैनिक अत्यंत कठीण परिस्थितीत आपले व आपल्या सीमेचे संरक्षण करतात. याचा आम्हाला त्याचा अभिमान आणि गर्व आहे. आम्ही आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पात ३ लाख कोटी ... ...

अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला – धनंजय मुंडे पुणे – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पियुष गोयल यांनी छोट्या शेतकऱ्यांपासून मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. मात्र आजच्या अर्थसंकल्पबाबत आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मोदी सरकारनं आज सादर केलेला अर्थसंकल्प ‘चुनावी जुमला’असून गेल्या चार वर्षातली सरकारची पापं धुवून टाकण्यात हा अर्थसंकल्प सपशेल अपयशी ठरला आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारचा ‘अंतिम’अर्थसंकल्प आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. View image on Twitter Dhananjay Munde ...

व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा निशाणा पुणे – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पियुष गोयल यांनी छोट्या शेतकऱ्यांपासून मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. मात्र आजच्या अर्थसंकल्पबाबत आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यावर आता राष्ट्रवादीने व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी लक्ष करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमच्या घोटाळ्यांची लक्तरं इतकी आहेत की कितीही सारवासारव केली किंवा मोठमोठी आश्वासने दिली तरीही आता काहीही फायदा होणार नाही. बुँदसे गयी वो हौदसे नहीं आती अशी सरकारची परिस्थिती आहे अशी टीका या व्यंगचित्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. NCP ...