सर्वात स्वस्त स्मार्टफोन देणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक नवी दिल्ली : देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन देणाऱ्या संचालकास अटक करण्यात आले आहे. संचालकास अटक झाल्याने फ्रिडम 251 हा स्वस्त स्मार्टफोन बनवणारी कंपनी सध्या अडचणीत सापडली आहे. रिंगिंग बेल या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पैसे घेऊन फोन न दिल्याचा या कंपनीवर आरोप आहे. गाझियाबादच्या सिंहानी गेट पोलीस स्टेशनमध्ये रिंगिंग बेल कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने व्यवसायिकांशी स्वस्त मोबाईल देण्याचा करार केला. मात्र फोनही नाही आणि पैसेही मिळाले नसल्याचे तक्रारीत म्हटले गेले आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित गोयल यांना ताब्यात घेतले आहे. वितरकांशी पैशांसंबंधित बोलणे झाले आहे आणि लवकरच पैसे परत दिले जातील, असे आश्‍वासन गोयल यांनी दिले आहे. 251 रुपयात सर्वात स्वस्त स्मार्टफोन देऊ असे म्हणत ही कंपनी जोरदार चर्चेत आली होती. कंपनीच्या ... ...

'हजारची नवीन नोट आणण्याचा सरकारचा विचार नाही' -  दास दिल्ली -गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये १ हजार रुपयाची नवीन नोट बाजार लवकरच दाखल होणार असल्याची बातमी दिली जात आहे. यावर केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सध्या १ हजार रुपयांची नवीन नोट बाजारात आणण्याचा सरकारचा कसलाही विचार नाही' अशी माहिती दास यांनी दिली. तसेच देशभरात चलन पुरवठा सुरळीतपणे सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक वृत्तपत्र आणि माध्यमांमध्ये १ हजारच्या नवीन नोटेचा फोटो वायरल होत आहे. तसेच सरकार लवकरच हजारची नोट चलनात आणणार असल्याच्या बातम्याही माध्यमांकडून प्रसारित केल्या जात होत्या. यावर दास यांनी सरकारचा असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच सध्या चलनात असलेल्या नोटांचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, याकडे आमचे लक्ष ... ...

नोटाबंदीमुळे राज्याला तब्बल एक हजार कोटींचा फटका मुंबई- राज्य सरकारला मुद्रांक शुल्कातून मिळणा-या महसुली उत्पन्नात तब्बल एक हजार कोटींचा फटका बसला आहे. हा फटका केंद्र सरकारने घातलेल्या नोटाबंदीमुळे बसला असल्याचे उघड झाले आहे. यामुळे राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याच्या गप्पा करणा-या नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे. गतवर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत वसूल महसूल आणि यावर्षीच्या जानेवारी महिनाअखेरच मुद्रांक शुल्काचा महसूल याची तुलनात्मक आकडेवारी पाहता हा महसूल चक्क एक हजार कोटींनी कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी 2016 पर्यंत राज्याचा मुद्रांक शुल्काचा महसूल हा 17 हजार 144 कोटी रुपयांचा होता. तोच महसूल यावर्षी जानेवारी 2017 अखेर16 हजार 254 इतका खाली आलेला आहे. म्हणजे तब्बल 1 हजार कोटींनी राज्याचा महसूल कमी झालेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर चलनातून 500 आणि 1000 नोटाबंद केल्याचे जाहीर केले होते ...

आता पॅन कार्ड मिळणार काही क्षणात प्राप्तीकर भरण्यासाठीही सरकारकडून नवे अॅप  नवी दिल्ली: आता तुम्हाला तुमचे पॅन कार्ड काही क्षणात मिळणार असून, तुम्ही तुमचा टॅक्‍स मोबाईलच्या माध्यमातून भरु शकणार आहात. कारण अर्थमंत्रालय आणि प्राप्तीकर विभाग करदात्यांचा त्रास कमी करण्यासाठी लवकरच नवे मोबाईल ऍप लॉन्च करणार आहे. तसेच पॅन कार्डही तत्काळ उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रकल्पावर काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. डायरेक्‍टोरेट ऑफ सिस्टीमच्या देखरेखीखाली केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) या दोन्ही उपक्रमांवर काम करत आहे. एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. यासाठी सीबीडीटीने आधारच्या ई-केवायसीच्या सुविधेचा वापर करुन, काही क्षणातच पॅन कार्ड उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी सीबीडीटी आणि कॉर्पोरेट मंत्रालयाने एका नव्या कंपनीला केवळ एका अर्जच्या माध्यमातून चार तासांच्या आत पॅन कार्ड उपलब्ध करुन ... ...

  स्टेट बँकेमध्ये पाच  बँकांच्या विलिनीकरणाला केंद्राची मान्यता दिल्ली :केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्याच्या पाच सहयोगी  बँकांच्या विलिनीकरणाला मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या बैठीकीनंतर दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा केली. दरम्यान, महिला बँकेच्या विलिनीकरणावर अदयाप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे जेटली यांनी सांगितले आहे. मागच्या वर्षीच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सहाय्य्क बँका आणि भारतीय महिला बँकांच्या विलिनीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला. स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ विकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट ... ...

२० फेब्रुवारी नंतर बँकेतून ५० हजार काढता येणार   मुंबई :भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आज जाहीर करण्यात आलेल्या व्दैमासिक पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर ६. २५ टक्क्यांवर कायम टेवण्यात आला असल्याची माहिती आज गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली आहे. रेपो दरात कोणताही बदल केला गेला नसल्याने रिव्हर्स रेपो दरही ५.७५ टक्के कायम राहणार आहे. २० फेब्रुवारी नंतर बँक खात्यातून आठवड्याला पैसे काढण्याची मर्यादा ५० हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सद्यस्थितीत ही मर्यादा २४ हजार रूपये होती. तसेच १३ मार्चनंतर यावरील संपूर्ण बंदी उठवली जाणार असल्याची घोषणाही आज करण्यात आली. २७ जानेवारी २०१७ पर्यंत ९.९२ लाख कोटी रूपयाच्या नव्या नोटा चलनात आल्या असल्याचेही आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. आरबीआयने चालू वर्ष २०१७ साठीचा विकासदर ६.९ टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय २०१८ आर्थिक वर्षात भारताची अर्थव्वस्था ७.४ टक्के इतक्या गतीने विकास करेल ... ...

अर्थसंकल्पात उद्योजकतेला प्रोत्साहन मिळाले=निर्मला सितारामन नवी दिल्ली - अर्थसंकल्पाच्या संदर्भात आज नवी दिल्ली येथे वाणिज्य व उद्योग मंत्री निर्मला सितारामन यांनी संवादसभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. अर्थसंकल्पात उद्योजकतेला प्रोत्साहन मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये भारत सरकारच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन आणि व्यापार आणि उद्योग मंत्रालय यांच्या वतीने सचिव रमेश अभिषेक सहभागी झाले होते. यामध्ये नैरोबी घोषणा, मेक इन इंडिया, थेट परदेशी गुंतवणूक अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रशासनाच्या नव्या धोरणांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम  : निर्मला सीतारामन  द नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अॅण्ड सर्व्हिस कंपनीज म्हणजेच नॅसकाॅम संदर्भात अमेरिकन कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याचे यावेळी निर्मला सितारामन यांनी सांगितले. तसेच जागतिक व्यापार संघटनेशी नैरोबी घोषणेबाबत डिसेंबर अखेर बोलणे होणे ... ...