पेट्रोल १ रूपया २३ पैशांनी तर डिझेल ८९ पैशांनी महाग नवी दिल्ली -लिटरमागे पेट्रोल १ रूपया २३ पैशांनी आणि डिझेल ८९ पैशांनी महागले आहे. नवे दर बुधवारची मध्यरात्र उलटल्यानंतर लागू करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनाची वाढलेली किंमत आणि अमेरिकी डॉलर-रूपया विनिमय दर हे घटक ध्यानात घेऊन इंधन दरवाढ करण्याचा निर्णय आज सार्वजनिक कंपन्यांनी घेतला. या दरवाढीत स्थानिक कराची रक्कम समाविष्ट नाही. ही रक्कम समाविष्ट झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर अधिक आणि वेगवेगळे असतील. याआधी 16 मेपासून पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 2 रूपये 16 पैसे आणि 2 रूपये 10 पैशांनी स्वस्त झाले होते. सार्वजनिक कंपन्यांकडून महिन्यातून दोनवेळा इंधन दराचा आढावा घेतला जातो. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखांना पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात किंवा जैसे थे राहतात. ...

डीएमआयसीमध्ये जलदगतीने उद्योग सुरु करा  खासदार चंद्रकांत खैरे यांची लोकसभेत मागणी     औरंगाबाद -शेंद्रा - बिडकीन येथे जवळपास ३०००० एकर जमिनीवर दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर (डीएमआयसी) चा प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाचा  जलदगतीने विकास करून किया मोटर्स सह  चांगल्या उद्योगांना संधी देण्याची मागणी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत वाणिज्य व उद्योग मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याकडे केली.  राष्ट्रीय गुंतवणूक व उत्पादन क्षेत्रात याचा समावेश केल्याबद्दल शासनाचा आभारी असून बऱ्याच उद्योगांनी बुकिंग करून काहीच प्रगती केली नाही. त्यामुळे त्यांना त्यासंबंधी सूचना देण्याची मागणी यावेळी केली.   या उद्योगामुळे साडे सात लाख रोजगार उपलब्ध होणार असल्यामुळे आपल्या माध्यमातून लवकरात लवकर दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर (डीएमआयसी)  शेंद्रा - बिडकीन येथे जास्तीत जास्त उद्योगांना गुंतवणुकीसाठी ... ...

राज्यभरातील एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिक त्रस्त !   मुंबई : नोटाबंदीनंतर देशभरात चलनट टंचाईचा फटका सर्वांनाच बसला होता. आता पुन्हा एकदा तिच परिस्थिती पुन्हा राज्यात आल्याचे दिसत आहे. कारण मुंबई, नवी मुंबई, पुणे यांसह राज्यभरातील अनेक एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मुंबईत सकाळपासूनच अनेक एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे सकाळी सकाळी मुंबईकरांना एटीएमची शोधाशोध करावी लागली. रविवारची सुट्टी आल्यामुळे अशी परिस्थिती झाली असावी, असे बोलले जात आहे. मुंबईप्रमाणेच राज्यभरातही अशीच परिस्थिती आहे. जिल्हा आणि तालुक्‍याच्या ठिकाणी अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकांना एटीएममध्ये पैसे नसल्याने बॅंकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अभूतपूर्व नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर ही परिस्थिती आटोक्‍यात आली होती. ... ...

२५ मार्च ते १ एप्रिलपर्यंत सर्व बँका खुल्या ठेवण्याचे आरबीआयचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकने येत्या २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान देशातील सर्व खाजगी आणि सरकारी बँका खुल्या ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार येत्या १ तारखेपर्यंत शनिवारी आणि रविवारी सुद्धा देशातील सर्व बँका खुल्या राहणार आहेत. यामुळे नागरिकांना आपले सर्व रोखीचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही करता येणार आहेत. आरबीआयने आज प्रसिद्ध केलेल्या आपल्या प्रसिद्धीपत्रात येत्या २५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान येणाऱ्या सर्व सार्वजनिक सुट्ट्या रद्द करून बँक ग्राहकांसाठी सुरु ठेवा असे निर्देश सर्व बँकांना दिले आहे. आरबीआयच्या या निर्णयाला देशातील अनेक बँकांनी आपला होकार दर्शवला असून बँका सुरु ठेवण्याचे आदेश प्रत्येक शाखेला देण्यात आले आहे. तसेच ... ...

शेतक-यांच्या कर्जमाफीला एसबीआयच्या अध्यक्षांचा विरोध मुंबई : शेतकऱ्याचं कर्ज माफ करणे ही चूक असल्याचे मत स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करतानाच अरुंधती भट्टाचार्य यांनी पीएएसयू बॅंकांनाही सरकारी मदतीची अपेक्षा ठेवू नये असेही म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा विरोध व्यक्‍त केला आहे. एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सराकरकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या आश्वासनाला विरोध केला आहे. अरुंधती भट्टाचार्य याबाबत, कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांकडून बॅंकांचे कर्ज चुकवण्याच्या जबाबदारीवर चुकीचा परिणाम होतो. कर्जमाफीमुळे शेतकरी पुन्हा निवडणुकीची वाट पाहत राहतील आणि कर्ज चुकवण्याऐवजी कर्ज माफ होण्याची वाट बघतील असे त्यांनी म्हटले. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका जेव्हा डबघाईला येतात, तेव्हा त्या सरकारी मदतीची अपेक्षा करतात. मात्र, सार्वजनिक ... ...

बचत खात्यातून कितीही पैसे काढा , रिझर्व्ह बँकेने निर्बंध उठविले नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने देशातील जनतेला होळीचे गिफ्ट दिले आहे. बचत खात्यामधून पैसे काढण्यासाठी आजपासून कोणतीही मर्यादा नसणार आहे. बचत खात्यामधून रोकड काढण्याची मर्यादा संपली आहे. इतकेच नाही तर विविध खात्यांमधून रोख रक्कमेवरील सर्व प्रकारची मर्यादा संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत बचत खात्यामधून आठवड्याला जास्तीत जास्त 50 हजार रुपये काढता येत होते. काळा पैसा आणि बनावट नोटांवर आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यामुळे 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द झाल्या होत्या. यानंतर चलन तुटवड्यामुळे आरबीआयने बॅंक आणि एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर अनेक मर्यादा घातल्या होता. परंतु चलन तुटवडा कमी झाल्याने वेळोवेळी या मर्यादा कमी करण्यात आल्या. करंट अकाऊंट, ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिट अकाऊंटमधून रोकड काढण्याची मर्यादा 31 जानेवारीला संपली होती. तर ... ...

बँकेतून स्वतःचेच पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्कभार मुंबई-मोदी सरकारच्या डिजीटल इंडियाच्या अंतर्गत आता बँक खात्यातील रोख रक्कम काढण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. हा नियम १ मार्च २०१७ पासून लागू झाला आहे. देशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीने हा नियम आपल्या बचत आणि पगारधारक खातेदारांना लागू केला आहे. बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०१७ पासून बँकेतून रोख रक्कम काढल्यास शुल्क आकारले जाणार आहे. एचडीएफसीने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी हा नियम केला आहे. या नियमामुळे एचडीएफसी बँकेतून स्वतःचेच पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्कभार सोसावा लागणार आहे. या नियमानुसार अशी असेल शुल्क आकारणी- १.  रोख व्यवहार संख्या (व्यवहार एकत्र) – खात्यासाठी एक महिन्यात केवळ ४ वेळा रोख व्यवहार मोफत – पाचव्या व्यवहारवेळी शुल्क आकारणी (स्वतंत्रपणे सेवा कर आणि कर) १५० रुपये प्रति व्यवहार २.  रोख व्यवहार मूल्य (पैसे जमा करणे किंवा काढणे ... ...