विजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चा अर्थात भाजयुमो ही भाजपची बलशाली भुजा असून पक्षाने निर्धारित केलेल्या ‘विजयलक्ष्य-२०१९’ करिता भाजयुमो पूर्णतः सज्ज असल्याचे प्रतिपादन भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन यांनी केले. भाजयुमोचे राष्ट्रीय युवा महाअधिवेशन दि. २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान हैद्राबाद येथे होत आहे. या महाअधिवेशनाची माहिती देण्यासाठी नवी दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पूनम महाजन बोलत होत्या. हैद्राबाद येथील परेड ग्राउंड येथे  २६ ऑक्टोबरची दुपार ते दि. २८ ऑक्टोबरची संध्याकाळ अशा कालावधीत भाजयुमोचे हे राष्ट्रीय अधिवेशन होत असून दक्षिण भारतात होत असलेले भाजयुमोचे पहिलेच अधिवेशन आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या व काही अन्य महत्वपूर्ण राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची युवा शाखा भाजयुमोचे हे महाअधिवेशन महत्वाचे मानले जात आहे. या पत्रकार ... ...

ऊस उत्पादकांना उसाचा रास्त दर देण्याची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उच्चस्तरीय बैठकीत मागणी नवी दिल्ली, 23 : चालू वर्षात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) मिळावा, अशी मागणी राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे उच्चस्तरीय बैठकीत केली. येथील परिवहन भवनात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी  केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, ग्रामविकासमंत्री तथा बीडच्या पालक मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख, आमदार, वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी विविध समस्यांना तोंड देत आहेत. त्यांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील  रास्त आणि किफायतशीर दर ... ...

इंधन दरवाढीचे सत्र कायम, पेट्रोल 9 पैसे तर डिझेल 16 पैशांनी महागले नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह इतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली असून इंधनदरवाढीचा भडका कायम अाहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 9 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 16 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 83.49 रुपये तर डिझेलचे दर प्रतिलीटर 74.79 रुपये इतक्‍या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.तर देशाची अार्थिक राजधानी मुंबईमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 90.84 रूपये तर प्रति लीटर डिझेलसाठी 79.40 रूपये मोजावे लागत आहे. तर पुणे शहरात आज प्रति लीटर पेट्रोलचा 90.67 रूपये  तर डिझेलचा प्रति लीटर 78.01 रूपये असा दर आहे. दिल्लीमध्ये जानेवारी 2018 रोजी पेट्रोलचा दर 69.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 59.70 रुपये प्रति लिटर असा होता. जानेवारी 2018 महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत पेट्रोलचे दर 13.52 रूपयांनी तर डिझेलचे दर 15.09 रूपयांनी महागले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरात गेल्या काही ... ...

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती       नवी दिल्ली, दि. 17 : माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज स्मृतिस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसेच विदेशी पाहुणे यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.     श्री.वाजपेयी यांचे गुरूवारी सायंकाळी येथील एम्स रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एम्स रूग्णालयात जाऊन त्यांचे दर्शन घेतले, तसेच 6-ए कृष्ण मेनन मार्गस्थित वाजपेयी यांच्या निवासस्थानी ... ...

अटलजींचे जाणे म्हणजे ‘एका काळाचा अंत’- नरेंद्र मोदी   नवी दिल्ली: भारतीय राजकारणातील निस्वार्थी नेता हरवला. भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आज एम्स रुगालयात अखेरचा श्वास घेतला. मागच्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या ९४वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किडनी संसर्गामुळे अटल बिहारी वाजपेयी यांना ११ जून रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री एम्सने जारी केलेल्या बुलेटीननुसार, वाजपेयींची प्रकृती मागील २४ तासात चिंताजनक होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले ” अटलजी आपल्यामध्ये नाहीत पण त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन प्रत्येक भारतीयाला मिळत राहील. ईश्वर त्यांचा आत्म्याला शांती देवो”   Narendra Modi✔@narendramodi ...

राजकारणातला ‘भीष्म’ काळाच्या पडद्याआड- शरद पवार भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज निधन झाले. मागच्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या ९४वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. किडनी संसर्गामुळे अटल बिहारी वाजपेयी यांना ११ जून रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री एम्सने जारी केलेल्या बुलेटीननुसार, वाजपेयींची प्रकृती मागील २४ तासात चिंताजनक होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी निधनामुळे आपण एक महान आत्मा, एक प्रशंसनीय कवी, उत्कृष्ट मानव आणि भारतातील महान संसदपटू, राजकारणातला भीष्म काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.   ...

अटलजींचे विराट व प्रेमळ व्यक्तीमत्व कायम आठवणीत राहिल : राष्ट्रपती नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान, कवी, मुत्सदी नेता अशी अोळख असलेले भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी एम्स रूग्णलयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागच्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून अटलजींना श्रध्दाजंली वाहिली आहे. प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘माजी पंतप्रधान आणि भारतीय राजकारणातील महान व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने मला अतिशय दु:ख झालं. विलक्षण नेतृत्व, दूरदृष्टी आणि अदुभत भाषण हे त्यांना एक मोठं व्यक्तिमत्व बनवतं. अटलजींचे विराट आणि प्रेमळ असे व्यक्तिमत्व आमच्या आठवणीत कायम राहिल’. ...