डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत संविधानातील समतावादी भारत घडविणार -  रामदास आठवले नवी दिल्ली,  दि. २८ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत संविधानातील समतावादी भारत घडविणार, असा निर्धार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लंडन येथे व्यक्त केला. लंडन मधील भारतीय उच्चायुक्त  कार्यालय इंडिया हाऊस येथे ७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री.आठवले बोलत होते.       महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेल्या संविधानाची २६ जानेवारी १९५० पासून अंमलबजावणी सुरू झाली आणि तेव्हापासून भारत खरे प्रजासत्ताक राष्ट्र ठरले. भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ ... ...

कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन   नवी दिल्ली : कामगार नेते आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी दिल्ली येथे निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. कामगारांचा बुलंद आवाज अशी त्यांची ओळख होती. दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फर्नांडिस यांच्या निधनामुळे कामगारांसाठी लढणारा योद्धा हरपला अशी भावना देशभरातून व्यक्त होत आहे. फर्नांडिस यांचा जन्म कर्नाटकमधील मंगळुरु येथे ३ जून १९३० मध्ये झाला. त्यानंतर फर्नांडिस कामानिमित्त मुंबईत आले. येथे आल्यानंतर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले. यानंतर त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारात अपेक्षित वाढ न झाल्याने ८ मे १९७४ रोजी मुंबईत रेल्वे कामगारांचा संप घडवून आणला. येथूनच त्यांना लढवय्या कामगार नेता अशी ओळख मिळाली. आणीबाणीच्या काळात त्यांची आक्रमक भूमिका संपूर्ण देशाने पहिली ... ...

दिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी नवी दिल्ली : फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखता यावे यासाठी देशभरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी. अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. परंतु ही मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. फटाके विक्रीला परवानगी दिली असली तरी फटाक्यांच्या ऑनलाइन विक्रीवर मात्र बंदी घालण्यात आली आहे. तसेच ई-कॉमर्स कंपन्यांना तशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. दिवाळीत रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके फोडावेत असे बंधन नागरिकांना घालण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या बाबतीत हा महत्वपूर्ण निर्णय दिला. परवाना असलेले ट्रेडर्सच फटाक्यांची विक्री करू शकतात. असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच फटाक्यांवर देशभरात बंदी घालताना त्या काळाच संतुलन ठेवणे गरजेचे आहे. संविधानाचा अनुच्छेद-२१ हा ... ...

विजयलक्ष्य-२०१९ साठी भाजयुमो सज्ज: पूनम महाजन नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चा अर्थात भाजयुमो ही भाजपची बलशाली भुजा असून पक्षाने निर्धारित केलेल्या ‘विजयलक्ष्य-२०१९’ करिता भाजयुमो पूर्णतः सज्ज असल्याचे प्रतिपादन भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. पूनम महाजन यांनी केले. भाजयुमोचे राष्ट्रीय युवा महाअधिवेशन दि. २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान हैद्राबाद येथे होत आहे. या महाअधिवेशनाची माहिती देण्यासाठी नवी दिल्ली येथे भाजपच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पूनम महाजन बोलत होत्या. हैद्राबाद येथील परेड ग्राउंड येथे  २६ ऑक्टोबरची दुपार ते दि. २८ ऑक्टोबरची संध्याकाळ अशा कालावधीत भाजयुमोचे हे राष्ट्रीय अधिवेशन होत असून दक्षिण भारतात होत असलेले भाजयुमोचे पहिलेच अधिवेशन आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या व काही अन्य महत्वपूर्ण राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची युवा शाखा भाजयुमोचे हे महाअधिवेशन महत्वाचे मानले जात आहे. या पत्रकार ... ...

ऊस उत्पादकांना उसाचा रास्त दर देण्याची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उच्चस्तरीय बैठकीत मागणी नवी दिल्ली, 23 : चालू वर्षात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) मिळावा, अशी मागणी राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे उच्चस्तरीय बैठकीत केली. येथील परिवहन भवनात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी  यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी  केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, ग्रामविकासमंत्री तथा बीडच्या पालक मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख, आमदार, वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी विविध समस्यांना तोंड देत आहेत. त्यांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील  रास्त आणि किफायतशीर दर ... ...

इंधन दरवाढीचे सत्र कायम, पेट्रोल 9 पैसे तर डिझेल 16 पैशांनी महागले नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह इतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली असून इंधनदरवाढीचा भडका कायम अाहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 9 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 16 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 83.49 रुपये तर डिझेलचे दर प्रतिलीटर 74.79 रुपये इतक्‍या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.तर देशाची अार्थिक राजधानी मुंबईमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी 90.84 रूपये तर प्रति लीटर डिझेलसाठी 79.40 रूपये मोजावे लागत आहे. तर पुणे शहरात आज प्रति लीटर पेट्रोलचा 90.67 रूपये  तर डिझेलचा प्रति लीटर 78.01 रूपये असा दर आहे. दिल्लीमध्ये जानेवारी 2018 रोजी पेट्रोलचा दर 69.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 59.70 रुपये प्रति लिटर असा होता. जानेवारी 2018 महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत पेट्रोलचे दर 13.52 रूपयांनी तर डिझेलचे दर 15.09 रूपयांनी महागले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरात गेल्या काही ... ...

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर अंत्यसंस्कार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती       नवी दिल्ली, दि. 17 : माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज स्मृतिस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसेच विदेशी पाहुणे यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.     श्री.वाजपेयी यांचे गुरूवारी सायंकाळी येथील एम्स रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एम्स रूग्णालयात जाऊन त्यांचे दर्शन घेतले, तसेच 6-ए कृष्ण मेनन मार्गस्थित वाजपेयी यांच्या निवासस्थानी ... ...