सरन्यायाधीशांचे पदही माहिती अधिकार कायद्याखाली-सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली : सरन्यायाधिशांचे कार्यालय हेही माहिती अधिकार कायद्याच्या कार्यकक्षेत येतं, असा निर्वाळा सर्वेच्च न्यायलयाने बुधवारी दिला. त्याचप्रमाणे लवादांची नियुक्तीही त्यानुसार असेल, असेही न्यालयाने स्पष्ट केले. सरन्यायधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच जणांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायलयाने सरन्याधिशांचे पदही माहिती अधिकार कायद्याच्या अखत्यारीत येत असल्यावा निकाल उचलून धरला. माहिती अधिकार कायद्याची व्यापकता अधोरेखित केली. पारदर्शकतेमुळे न्यायव्यवस्थेला कोणताही धोका नाही, हेही न्यायलयाने स्पष्ट केले. दिल्ली उच्च न्यायलयाने देशाच्या सरन्याधिशांचे कार्यालय हे माहिती अधिकार कायद्याच्या अखत्यारीत येते, असा निर्वाळा 10 जानेवारी 2010 ला दिला होता. न्यालयीन स्वातंत्र्य हा न्यायाधिशांचा विशेषाधिकार नसून ... ...

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांना ‘सर्वोच्च’ दिलासा  नवी दिल्ली – कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या अपात्र आमदारांना पोटनिवडणूक लढवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. यामुळे बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांमध्ये १४ काँग्रेसचे आणि ३ जेडीएसचे आहेत. विधानसभेचे तत्कलीन अध्यक्ष के.आर.रमेश कुमार यांचा अपात्रतेचा निर्णय कायम ठेवत पोटनिवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांची बंडखोरी त्या मित्रपक्षांना भोवली. त्यांचे आघाडी सरकार बंडखोरीमुळे कोसळले. विधानसभेचे तत्कलीन अध्यक्ष के.आर.रमेश कुमार यांनी त्या बंडखोरांना दणका देत त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले. त्यातील रमेश एल.जारकीहोली आणि महेश कुमाथल्ली या कॉंग्रेसच्या दोन बंडखोरांनी त्या निर्णयाला आव्हान दिले आहे. अपात्र आमदारांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या तीन ... ...

चिदंबरम यांच्या न्यायलयीन कोठडीत वाढ नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत 27 नोव्हेंबरपर्यत वाढ करण्यात आली. त्यांना व्हिगडिओ कॉन्फरसींगच्या माध्यमांतून न्यायालयात हजर करण्यात आले. आयएनएक्‍स मिडिया प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायलयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांना अंमलबजावणी संचनालयाने ताब्यात घेतले होते. त्यांच्या न्यायलयीन कोठडीची मुदत बुधवारी संपत होती. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. ...

शरद पवारांवर हल्ला करणाऱ्याला अटक नवी दिल्ली: २०११ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार आणि पोलिसांवर हल्ला करणार्‍या अरविंदर उर्फ ​​हरविंदर सिंगला दिल्ली पोलिसांनी अटक केली. आरोपी बराच काळ फरार होता. कोर्टाने देखील त्याला फरारी घोषित केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद सिंह यांनी २४ नोव्हेंबर २०११ रोजी नवी दिल्लीतील एनडीएमसी सेंटरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या कृषिमंत्री शरद पवार यांना चापट मारली होती. सामान्य माणूस अस्वस्थ असून नेते योग्य मुद्द्यांकडे लक्ष देत नसल्याचे आरोपींनी म्हटले होते.  त्यानंतर त्यांनी तलवारीने पोलिसांवर हल्ला केला. यापूर्वी आरोपीने माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरुध्द दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि संसद पथ पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१४ मध्ये, जेव्हा त्याने कोर्टाच्या सुनावणीला येणे टाळले ... ...

आधी निकाह होईल, त्यानंतर…. – ओवेसी शिवसेना आणि काँग्रेसला पाठिंबा देणार नाही – ओवेसी नवी दिल्ली – राज्यात 19 दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेरच्या टप्प्यावर आहे. आता ‘महाशिवआघाडी’चे सरकार स्थपन करण्यासाठी राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याविषयी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खलबत्ते चालू आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी आपण शिवसेना आणि काँग्रेसला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. असदुद्दीन ओवेसी म्हणाले कि, आम्ही भाजप तसेच शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचा मला आनंद आहे. कोण कोणाची मते फोडत होता आणि कोण कोणाबरोबर काम करीत आहे हे लोकांना कळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाल्यास तुम्ही पाठिंबा देणार का? यावर ओवेसी म्हणाले कि, आधी निकाह होईल. त्यानंतर मुलगा का मुलगी होईल याचा विचार केला जाईल. अद्याप निकाहही नाही झाला. आताच काही ... ...

…तर ओवेसींनी भारत सोडून पाकिस्तानात जावे अयोध्या प्रकरणावरील ओवेसींच्या वक्‍तव्याचा महंतांनी घेतला समाचार नवी दिल्ली : देशातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या अयोध्येचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंच्या बाजूनी दिला. या निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी समधानी नसल्याचे सांगत न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्‍त केली आहे. ओवेसींनी यावर काही वक्‍तव्य करत न्यायालयाचा निर्णय हा सत्याचा नसून सध्यस्थितीतील आस्थेचा असल्याचे म्हटले होते. दरम्यान, त्यांच्या याच वक्‍तव्यावर संत समाजातून संताप व्यक्‍त करण्यात येत असून ओवेसींना भारत सोडून पाकिस्तानात जावे असा सल्लादेखील महंतांनी दिला आहे. अयोध्या प्रकरणात असदुद्दीन ओवैसी यांनी दिलेल्या वक्तव्यासंदर्भात संत समाजात संताप व्यक्‍त होत आहे. अखिल भारतीय अखाड़ा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हटले की सर्वोच्च ... ...

वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच - सर्वोच्च न्यायालय मुस्लिमांना अयोध्येत पर्यायी जागा देणार – सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली : देशात मागील अनेक दशकांपासून संवेदनशील असणाऱ्या अयोध्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही हिंदुंची असल्याचे सांगत ही जागा हिंदूंना देण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर अयोध्येतच पर्यायी 5 एकर जागा मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगाई यांच्यासह पाच न्यायाधिशांच्या पीठाने आज अयोध्या प्रकरणावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ निकाल देत दिला. न्यायालयाने राम मंदिर आणि बाबरी मशीद वादात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सलग 40 दिवसांच्या सुनावणीत ... ...