जलियाँवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण नवी दिल्ली : जलियाँवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. १३ एप्रिल १९१९ साली ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने अमृतसर येथील सुवर्णमंदिराजवळ असलेल्या जलियाँवाला बाग येथे सभेसाठी जमलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार करत, हजारो नागरिकांचा जीव घेतला होता. भारताच्या इतिहासातील ही सर्वात दुःखद घटना ठरली असली तरी या घटनेने ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचा क्रूर चेहरा जगासमोर आला. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या नागरिकांना स्मरण करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलियाँवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत, या हत्याकांडात शहीद झालेल्या पराक्रमी नागरिकांचे बलिदान कधीच विसरले जाणार नसल्याचे म्हटले. या वीरांचे स्मृतिस्थळ देशासाठी एक प्रेरणास्थान असून त्यांना अभिमान वाटेल असा भारत घडविण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रेरित करत ... ...

मसूद अजहर ‘जी’! राहुल गांधींची मुक्ताफळे   नवी दिल्ली : पुलवामा येथे भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेविषयी आणि तिचा म्होरक्या मसूद अझहरविषयी देशभरात उसळलेली संतापाची लाट अजूनही शमलेली नाही. दुसरीकडे, काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी मात्र या दहशतवाद्याचा उल्लेख आदरार्थी करत आहेत. नुकत्याच दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या एका सभेत राहुल यांनी मसूद अझहरचा उल्लेख चक्क ‘मसूद अझहरजी’ असा केला. राहुल गांधींच्या या मुक्ताफळांचा देशभरातील अनेक नागरिकांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे.   सोमवारी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांच्या झालेल्या एका मेळाव्यात राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित याही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. राहुल यांनी आपल्या भाषणाद्वारे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावेळी पुलवामा ... ...

रमजानच्या महिन्यात निवडणुकीला मुस्लिम धर्मगुरुंचा विरोध   नवी दिल्ली : रविवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. ही निवडणूक ७ टप्यांमध्ये होणार असून शेवटचे ३ टप्पे हे रमजानच्या महिन्यात येत आहेत. यामुळे मुस्लीम धर्मगुरुंनी या तारखांना विरोध केला आहे. रमजान महिन्यात मतदान ठेवल्याने मतदानाचा टक्का घसरु शकतो, त्यामुळे शेवटच्या तीन टप्प्यातील मतदानाच्या तारखा बदलण्यात याव्यात अशी मागणी मुस्लिम धर्मगुरुंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. देशभरात ११ एप्रिल २०१९ ते १९ मे २०१९ या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शेवटच्या तीन टप्प्यात ६,१२ आणि १९ मे रोजी मतदान होणार आहे. या तीनही तारखा रमजान महिन्यात येतात. या काळात मुस्लिम धर्मियांचा उपवास असतो. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरु शकतो असे मुस्लिम धर्मगुरुंचे मत आहे. त्यामुळे याकाळात मतदान घेऊ नये अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक रविवारी ... ...

महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान प्रा. वामन केंद्रे, शंकर महादेवन आणि कोल्हे दांपत्याला पद्मश्री प्रदान   नवी दिल्ली, दि. 11 :  राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज नाट्यकर्मी प्रा. वामन केंद्रे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.  रविंद्र व डॉ. स्मिता कोल्हे आणि गायक शंकर महादेवन या महाराष्ट्रातील मान्यवरांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.      ...

लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यात मतदान   नवी दिल्ली, दि. १० : देशात १७ व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिनांक ११ एप्रिल ते १९ मे २०१९ या कालावधीत एकूण  सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून २३ मे २०१९ रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात ११,१८, २३ आणि २९ एप्रिल २०१९ या तारखांना पहिल्या चार टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत.   केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून १७ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा आणि अशोक लवासा यावेळी उपस्थित होते.  निवडणूक कार्यक्रमांच्या या  घोषणेपासूनच देशात ... ...

महाराष्ट्रात होणार ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली, दि. 1 : रामायण महाकाव्याने जगाला मूल्य व नवी दिशा दिली. हाच विचार जगभर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘सुरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळ्यात’ केली. या महोत्सवासाठी त्यांनी देश -विदेशातील पर्यटकांना निमंत्रणही दिले. हरियाणातील फरीदाबाद येथे आयोजित 33 व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळ्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, हरियाणाचे पर्यटनमंत्री रामबिलास शर्मा , भारतातील थायलंडचे राजदूत ... ...

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये  सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपणार  नवी दिल्ली : उद्यापासून लोकसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होत आहे. देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागले असून सत्ताधारी भाजपचा हा आपल्या ५ वर्षांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प ठरणार आहे. निवडणूका तोंडावर आल्या असल्याने सरकारतर्फे सादर करण्यात येणारा हा अर्थसंकल्प सामान्यांसाठी भरघोस लोककल्याणकारी योजनांची भेट घेऊन येणार असल्याची दाट शक्यता आहे. विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी या अधिवेशनामध्ये राफेल करार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचा प्रश्न लावून धरला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीस संबोधित करणार आहेत.अर्थमंत्री पियुष गोयल हे शुक्रवारी (१ फेब्रुवारी) २०१९-२०२० सालसाठीचा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर करणार असून या ... ...