सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे  जाहीर न करण्याचा केंद्राचा निर्णय नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे पुरावे जाहीर झाल्यास पाकिस्तानी लष्कर अडचणीत येऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते. त्यामुळे हे पुरावे सार्वजनिक न करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते. सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, भारताला युद्धात रस नाही. मात्र, याचा अर्थ आमच्यावर युद्ध लादले गेल्यास त्याला आम्ही शांत बसू, असा होत नाही. या सर्जिकल स्ट्राईकनंतर एकाही देशाने भारताच्या कृतीवर आक्षेप घेतलेला नाही. बहुतांश देशांनी भारताच्या कारवाईचे समर्थनच केले. भारताच्या दृष्टीने हे मोठे यश आहे. सर्जिकल स्ट्राईकसाठी भारताने वेळही जाणीवपूर्वक निवडली. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजनैतिक प्रयत्नांमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून ... ...

विकलांग सरकारी कर्मचाऱ्यांची पदावनती करू नका केंद्र सरकारचे आदेश नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला शासनाच्या सेवेत असताना अपंगत्व आल्यास त्याला पदमुक्त किंवा त्याची पदावनती करू नये, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासाठी केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून 1972 सालच्या केंद्रीय नागरी सेवा कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे सरकारी सेवेतील विकलांग कर्मचाऱ्यांना नोकरी राखण्यात किंवा योग्य निवृत्तीवेतन मिळण्यासाठी मदत होणार आहे. सरकारी सेवेत असताना अपंगत्व आल्यास संबंधित कर्मचाऱ्याला अपंग व्यक्तींच्या हक्कांच्या रक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या  सालच्या कायद्याचे नियम लागू होतील. या कलमातील कलम 47 नुसार कोणतेही आस्थापन अपंगत्वामुळे कर्मचाऱ्याला पदमुक्त किंवा त्याची पदावनती करू शकत नाही. तसेच केवळ अपंगत्त्वामुळे संबंधित व्यक्तीला पदोन्नती नाकारता येत नाही. सरकारी नोकरी कायद्यातील कलम 47 लागू नसलेल्या कर्मचाऱ्याला सेवेत रुजू असताना कायमस्वरुपी शारीरिक किंवा ... ...

जेएनयूत रावण म्हणून जाळले मोदी, शहांचे पुतळे विद्यापीठाच्या व्यवस्थापनाचे मौन, विद्यार्थी अडचणीत येण्याची शक्यता नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-देशभरात मंगळवारी मोठ्या उत्साहात दसरा साजरा झाला. यावेळी रावणाचे दहन करताना देशभरात अनेक ठिकाणी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ, 26/11 चा मास्टरमाईंड हफिज सईद यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मात्र दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी दसऱ्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिमा जाळल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच कथित देशविरोधी घोषणांवरुन जेएनयूतील विद्यार्थी अडचणीत आले होते. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या प्रतिमा जाळल्यामुळे जेएनयूतील विद्यार्थी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात जेएनयूतील विद्यार्थ्यांनी गुजरात सरकार आणि गोरक्षकांच्या प्रतिकात्मक पुतळे जाळले होते. यामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कॉंग्रेसप्रणित ... ...

रेल्वे प्रवासात लॅपटॉप आणि मोबाईलला विमा कवच नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- आयआरसीटीसी आता प्रवाशांच्या मोबाईल आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांसाठीही विमा योजना सुरु करण्याच्या विचारात आहे. रेल्वे प्रवाशांसाठी सुरु केलेल्या विमा योजनेच्या यशानंतर रेल्वे प्रशासनाने हा विचार चालवला आहे. यासंबंधी आयआरसीटीसी आणि विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांची पहिली बैठकही झाली आहे. आयआरसीटीसीचे अध्यक्ष ए के मनोचा यांनी ही माहिती दिली. विमा कंपन्यांनी खोट्या दाव्यांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही काही पर्याय दिले आहेत आणि त्यावर विमा कंपन्यांची मतं मागितली आहेत. प्रवासी विम्यासोबतच आम्ही गॅझेट्‌ससाठी विमा सुरु करण्याच्या विचारात आहोत. त्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचारही आम्ही सुरु केला आहे. सुरुवातीला ही विमा योजना क्रेडिट कार्ड धारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देण्याच्या विचारात आहोत. असंही ते म्हणाले. रेल्वेतील चोरीच्या घटनांनाही विम्याचं कवच असावं अशी आमची योजना आहे. ज्यामुळे प्रवाशांना निर्धास्तपणे प्रवास करता येईल. पण विमा ... ...

दहशतवादावरून राजकीय फायदा घेऊ नका, चीनचा भारतावर निशाणा नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- दहशतवादविरोधी कारवायांच्या नावाखाली कोणीही राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करू नये, असा अप्रत्यक्ष टोला चीनने भारताला लगावला आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अझर याला संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रस्तावावर टिप्पणी करताना चीनने हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग या आठवड्यात गोव्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भारतात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारताकडून चीनला कसे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यानंतर  मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये ठराव मांडला होता. मात्र चीनने अझरला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावावर नकाराधिकाराचा वापर करुन त्याला अभय दिले होते. या ठरावाची मुदत सोमवारी संपणार होती. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ यावेळी तरी मसूद अझरला दहशतवादी घोषित करेल, अशी ... ...

ऑलिव्हर हार्ट, बेंट हॉमस्ट्रॉम यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भौतिक, रसायन, वैद्यकीय आणि शांतता पुरस्कारानंतर सोमवारी (दि.10) अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ब्रिटिशवंशीय अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलॅंडचे बेंट हॉमस्ट्रॉम यांना प्रतिष्ठेचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. हार्ट आणि हॉमस्ट्रॉंग यांच्या अर्थशास्त्रातील कॉन्ट्रॅक्ट थिअरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हार्ट आणि हॉमस्ट्रॉम यांनी जगाला दिलेली कॉन्ट्रॅक्ट थिअरी अत्यंत मौल्यवान असून वास्तविक जीवनात विविध संस्था आणि व्यक्तींसाठी महत्वपूर्ण असल्याचे मत दि रॉयल स्वीडिश ऍकडमीने पुरस्कार जाहीर करताना नोंदवले. मंगळवारी (दि.10) साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करून पुरस्काराची सांगता होणार आहे. नोबेल पुरस्काराची सुरूवात 1895 साली झाली पण अर्थशास्त्रातील पुरस्कार देण्याची सुरूवात 1969 साली करण्यात आली. गतवर्षी हा पुरस्कार ब्रिटनचे अर्थतज्ज्ञ अँगस डिटॉन यांना प्रदान ... ...

यंदाची विजयादशमी देशासाठी विशेष नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या सर्जिकल हल्ल्यांच्या पार्श्र्वभूमीवर, या वर्षीची विजयादशमी देशासाठी अत्यंत विशेष अशी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. सामर्थ्यवान राष्ट्रासाठी अतिशय सक्षम अशी सैन्यदले असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या वर्षीची विजयादशमी देशासाठी अत्यंत विशेष अशी आहे, असे मोदी यांनी विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात सांगितले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल हल्ल्यांचा संदर्भ मोदी यांच्या वक्तव्याला होता. धर्माचा अधर्मावर विजय दर्शवणाऱ्या या सणानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. जनसंघाचे माजी अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन आणि शिकवण यावरील 15 पुस्तकांच्या संग्रहाचे प्रकाशन त्यांनी या वेळी केले. पंडित उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष यंदा साजरे करण्यात येत आहे. दीनदयाळ यांच्या लेखनाचा संदर्भ देऊन, बलवान राष्ट्रासाठी अत्यंत कणखर सैन्यबल असणे आवश्यक आहे, यावर ... ...