मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा नवी दिल्ली : ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत’ आयोजित ‘मातृवंदना सप्ताहाच्या’ उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी आज केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.   केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने येथील हॉटेल अशोक मध्ये आयोजित कार्यक्रमात मंत्रालयाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीसह मातृवंदना सप्ताहाची उत्कृष्ट अंमलबजावणी  करणाऱ्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.   प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत २ ते ८ डिसेंबर २०१९ दरम्यान देशभर ‘मातृवंदना सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले. या सप्ताहाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना यावेळी मोठे व छोटे राज्य अशा दोन श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात . मोठ्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक ... ...

महाराष्ट्राला १३ पद्म पुरस्कार आनंद महिंद्रा यांना पद्म भूषण नवी दिल्ली, दि. 25 : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी श्री.जॉर्ज फर्नाडिस, श्री. अरूण जेटली, श्रीमती सुषमा स्वराज यांना मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राला यावर्षी 13 पद्म पुरस्कार मिळाले आहेत.   दरवर्षी गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा होते. यावर्षी विविध क्षेत्राती 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 13 मान्यवरांना पद्म  भूषण आणि 118 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.   महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक श्री.आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहेत. तर विविध क्षेत्रातील 12 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार ... ...

अयोध्या प्रकरणातल्या १८ पुनर्विचार याचिका रद्द नवी दिल्ली=अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद विवादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निकालाविरोधात दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका गुरुवारी फेटाळण्यात आल्या. फेरविचार याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर याचिका फेटाळण्यात आल्या.सरन्यायाधीश एस.ए.बोबडे, न्यायमूर्ती अशोक भुषण, न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड, न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना या ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने या पुनर्विचार याचिका रद्द केल्या आहेत. या याचिका सुनावणीच्या लायक नाहीत. यात कोणतीच अशी गोष्ट नाही ज्याबद्दल ९ नोव्हेंबरच्या निकालात भाष्य करण्यात आलेलं नाही, असं मत सगळ्या न्यायमूर्तींनी मांडलं. अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी एकमताने निर्णय दिला होता. त्यामध्ये वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्ला ... ...

हैदराबाद एन्काऊंटर: माजी न्यायाधीशामार्फत चौकशी होण्याची शक्यता हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांमार्फत करण्याबाबत विचार करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले. सरन्यायाधीश एस. ए बोबडे, एस. अब्दुल नजीर आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. याबद्दल आम्हाला जाणीव आहे. आम्हाला असे वाटते की, सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीत राहणाऱ्या एखाद्या माजी न्यायाधीशामार्फेत या प्रकरणाची चौकशी करावी, असे त्यांनी सांगितले.  एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश नेमण्याचा आमचा प्रस्ताव आहे, असे पीठाने सांगितले. तसंच, पीठाने हे देखील स्पष्ट केले आहे की, या माजी न्यायाधीशाला दिल्लीत राहून काम करावे लागेल. हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर १२ डिसेंबर म्हणजे गुरुवारी विचार करण्यात ... ...

महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्राला १९५ कोटींचा निधी नवी दिल्ली, 12 : महिला सुरक्षेच्या विविध योजनांतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.     केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणाऱ्या निर्भया फंड, वनस्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन या योजनांसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना निधी वितरित करण्यात आला आहे. महाराष्ट्राला या योजनांतर्गत एकूण 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.       ‘निर्भया फंड’ अंतर्गत राज्याला 149 कोटींचा निधी   महिला सुरक्षेसाठी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘निर्भया फंड’ तयार करण्यात आला असून देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना याअंतर्गत निधी वितरित करण्यात आला आहे. महाराष्ट्राला ‘निर्भया ... ...

'मला जगायचं आहे', सामूहिक बलात्कार पीडितेचे अखेरचे शब्द नवी दिल्ली: उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री 11.40 वाजता दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. रात्री 11.10 च्या सुमारास पीडितेकडून उपचारास प्रतिसाद मिळणं बंद झालं. त्याचबरोबर हृदयही काम करत नसल्याचं समजलं. त्यानंतर डॉक्टरांनी पीडितेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तिची झुंज अपयशी ठरली. पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. शलभ कुमार यांनी दिली. सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा ती 90 ते 95 टक्के जळाली होती. तिच्या अवस्थेत कोणतीही सुधारणा होत नव्हती. व्हेंटिलेटरवर असलेल्या पीडितेसाठी 48 तास महत्वाचे होते. मात्र अखेर शुक्रवारी रात्री तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. उपचार सुरू असतानाही पीडितेनं धीर सोडला नव्हता. 'उपचारादरम्यान मी वाचेन ... ...

हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका, सोमवारी सुनावणी नवी दिल्ली : हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. एन्काऊंटरच्या संपूर्ण चौकशीची तसेच हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार आणि एन्काऊंटरमध्ये समाविष्ट असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. एन्काऊंटरसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. सोमवारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी खासदार जया बच्चन आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे. याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. दिशाच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तेलंगणा पोलिसांविरोधात या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अॅड. ... ...