१०० दिवसांत ऐतिहासिक निर्णय -प्रकाश जावडेकर  दिल्ली :पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दुसऱ्या कार्यकालातील पहिल्या १००दिवसांत ऐतिहासिक निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पत्रकारांना दिली. जम्मू कश्मीर आणि लडाख संदर्भात घेतलेला निर्णय इतिहास घडविणारा आहे.  केंद्रात मोदी सरकारला १००दिवस पूर्ण झाले . या सरकारची उपलब्धी त्यांनी देशासमोर ठेवली.पत्रकारांशी बोलताना जावडेकर म्हणाले,जम्मू कश्मीरमधून  घटनेचे कलम ३७० और कलम  ३५ अ हटविणे हा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.आता देशभरात लागू असलेल्या योजनांचा लाभ या राज्यातील जनतेला मिळणार आहे.  प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले , पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांचे   दरवाजे वाजविले परंतु साऱ्या देशांनी भारताबरोबर राहणे पसंत केले.तीन तलाक पीड़ित महिलांना सामाजिक न्याय मिळाला. ही खूप जुनी मागणी होती ती आता कुठे पूर्ण झाली आहे.  गेल्या ७० ... ...

100 दिवस ऱ्हासाचे : प्रियांका गांधी नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी पुन्हा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आता सरकारने दुसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस पूर्ण केल्याचे निमित्त साधून विविध कार्यक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. त्याचा संदर्भ घेत मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवरून प्रियांका यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.काँग्रेस सचिव प्रियांका गांधी यांनी  भाजप सरकारवर तोफ डागली आहे. व्यापार ठप्प होऊन अर्थव्यवस्था कोलमडली असताना सरकार गप्प बसले आहे. खोटा प्रचार करुन देशाच्या जनतेची दिशाभूल सुरु आहे, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.  भाजप सरकार 100 दिवसांचा कार्यकाळ साजरा करणार आहे. मात्र, वाहन, वाहतूक आणि खाण उद्योग त्याकडे आपल्या ऱ्हासाचा जल्लोष म्हणून पाहतील. प्रत्येक क्षेत्रातून कारखाने बंद होण्याच्या आणि नोकऱ्या जाण्याच्या बातम्या येत आहेत, असे ट्‌विट प्रियांका यांनी केले आहे. राहुल गांधींचा सरकारला टोमणा   ...

जेठमलानी कायम स्मरणात राहतील – मोदी   नवी दिल्ली – माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांच्या निधनाुळे भारताने कार्यशिल वकील गमावला असल्याची भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे. “आणीबाणीच्या काळात लोकांच्या स्वातंत्र्यासाठी विचलित न होता त्यांनी लढा दिला होता. त्यासाठी ते कायम आपल्या स्मरणात राहतील”, अशा शब्दांमध्ये मोदींंनी ट्विटरवरून जेठमलानी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Narendra Modi✔@narendramodi In the passing away of Shri Ram Jethmalani Ji, India has lost an exceptional lawyer and iconic public figure who made rich contributions both in the Court and Parliament. He was witty, courageous and never shied away from boldly expressing himself on any subject. मोदी म्हणतात की  “जेठमलानी यांच्या जाण्यामुळे भारताने अनन्य साधारण वकील गमावला आहे. जेठमलानी हे असं आदर्श व्यक्तिमत्त्व होत ज्यांनी वकिली आणि संसद या दोन्हींमध्ये अमूल्य योगदान दिले. त्यांचा स्वभाव धाडसी आणि विनोदी होता. तसेच ते कोणत्याही विषयावर बिनधास्त मत ... ...

माजी केंद्रीय कायदामंत्री राम जेठमलानी यांचे निधन नवी दिल्ली – जेष्ठ वकील, माजी केंद्रीय कायदामंत्री राम जेठमलानी यांचे रविवारी सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते मागील २ आठवड्यांपासून आजारी होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेठमलानी यांच्या पश्चात मुलगा महेश आणि मुलगी असा परिवार असून, मुलगी अमेरिकेत राहते. त्यांची दुसरी मुलगी राणी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने ज्येष्ठ विधिज्ञ आणि कायद्याचा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. जेठमलानी यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या बॉम्बे प्रातांतील सिंध विभागात १४ सप्टेंबर १९२३ रोजी झाला होता. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी एलएल.बीची पदवी घेतली आणि वकिली सुरू केली. फाळणी होईपर्यंत त्यांनी गावातच वकिली केली. फाळणीनंतर त्यांनी मुंबईत वकिलीला सुरूवात केली. काही काळ सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. अनेक महत्त्वाच्या ... ...

संसदेचे आजपासून अधिवेशन : विरोधक अजूनही पराभवाच्या धक्क्यातच  नवी दिल्ली : १७व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि शपथविधी सोहळाही पार पडला. आता सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास शिल्लक असताना विरोधकांमध्ये संभ्रम कायम आहे.सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र विरोधी पक्षांकडून अशा प्रकारचे कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकते, असे राज्यसभा खासदार पी. एन. पुनिया यांनी सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे विरोधी पक्षांच्या आत्मविश्वासाला प्रचंड धक्का बसल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्ष अद्याप पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यामुळे संसदेत सत्ताधारी पक्षाला घेरण्याची पुरेशी तयारीही विरोधी पक्षांनी केली नसल्याचे चित्र दिल्लीत ... ...

  राज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थ‍ितीतही लक्षणीय कृषी उत्पादन नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबई, दि. १५: जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे सांगतानाच आजवरची सर्वाधिक अशी ४,७०० कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्राचे आभार मानले.       राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात नीती आयोगाच्या प्रशासकीय समितीची ५ वी बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, गृहमंत्री अमित शहा,संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ व रस्ते वाहतूक तथा सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योग ... ...

नदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळमुक्त करू - मुख्यमंत्री    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट   नवी दिल्ली, दि. 15 : केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने नदी जोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र पुढील पाच वर्षात दुष्काळमुक्त करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. येथील श्रमशक्ती भवनात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. या बैठकीनंतर श्री. फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.   राज्यातील दुष्काळ निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये नदी जोड प्रकल्पाची महत्त्वपूर्ण भूमिका असून केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून गोदावरी खोऱ्यात ... ...