महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा मुंबई : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.महावीर जयंती भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, विश्वशांती व अनेकांताच्या संदेशाचे स्मरण देते. मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषत: जैन बंधू-भगिनींना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. ...

सिद्धेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त आज  भव्य पशु व अश्व प्रदर्शन लातूर   :  ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवारी ( दि. २८ ) पशु संवर्धन विभाग , जिल्हा परिषद , पंचायत समिती लातूर व श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने भव्य पशु व अश्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.   या पशु प्रदर्शनामध्ये देवणी नर  व मादी गट , लालकंधारी नर व मादी गट , संकरित वासरू गट या  पशुना सहभागी करून घेतले जाणार आहे. पशूंचा वयोगट शून्य ते एक वर्षापर्यंत आणि एक वर्षाच्या पुढे असा असणार आहे.   अश्व गटात सहभागी होणारे अश्व १३ हाताखालील व १३ हातावरील असावेत. कुक्कुट गटात देशी व विदेशी असे दोन गट सहभागी  करून घेतले जातील.  शेळी गटात तीन पिल्ले देणारी उस्मानाबादी शेळी असणार्‍या पशुपालकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवावा. प्रत्येक गटातील पशूंना प्रथम ,द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत.  या पशु प्रदर्शनात जास्तीत जास्त पशुपालकांनी ... ...