भयमुक्त जीवनातच खरा आनंद-प.पू.हिरालालजी महाराज ...

पापनाश करून धर्माची स्थापना करण्यासाठीच भगवंताचा अवतार-डॉ. रोहिणीप्रिय प्रभू औरंगाबाद - ''भगवंत नेमके कुठे असतात याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. मात्र एक बाब सार्वभौमिक सत्य म्हणून स्वीकारायलाच हवी की, ज्या ठिकाणी भगवंतांचे नामस्मरण होते, संकीर्तन होते, प्रभू भक्ती आणि आराधना केली जाते तेथे भगवंत नक्कीच असतात. भगवंतांचा जेथे वास तेथे सदगुण, सद् विचार असतातच. भगवंतांच्या सान्निध्यात होणारे नाम संकीर्तन, त्यांचे गुणगान, आराधना यामुळे सर्वत्र आनंद, समाधान निर्माण होते,'' असे प्रतिपादन  इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष तथा राधा गोपीनाथ मंदिर, मुंबईचे उपाध्यक्ष डॉ. रोहिणीप्रिय प्रभू यांनी केले. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) संस्थापकाचार्य ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने आयोजित जन्माष्टमी महामहोत्सवानिमित्त  सिडको एन १ येथील राधाकृष्ण मंदिरात सकाळ आणि सायंकाळ डॉ. रोहिणीप्रिय प्रभू ... ...

चातुर्मास प्रवचनमाला : न्याय आणि नितीच्या धनामध्येच सुख-प.पू.डॉ.सुप्रियाजी म.सा. जालना - पांडवांना राहण्याएवढीच जागा दे, अशी विनवणी खुद्द श्रीकृष्णांनीच दुर्योधनाला केली मात्र युध्दाशिवाय सुईच्या टोेकाएवढीही जागा देणार नाही, अशी प्रतिज्ञा केलेल्या दुर्योधनाच्या पदरात शेवटी काहीही पडलं नाही. कंसाचा इतिहासही याहून वेगळा नाही. दोघांकडेही प्रचंड धन संपत्ती होती. न्याय आणि निती थोडीही शिल्लक नव्हती म्हणूनच त्यांचा शेवट देखील दुख आणि वेदनादायी गेला. जगण्यापुरतच धन सुखी जीवन जगू देतं. मात्र लालसा, इच्छा, आकांक्षा आणि आसक्ती मनुष्याला दु:खाशिवाय काही देत नाही. म्हणूच धनाऐवजी सुखाचा विचार करा, असा हितोपदेश शासन प्रभाविका महासती प.पूू. डॉ. सुप्रियाजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे तपोभूमीतील गुरु गणेश सभा मंडपात सुरु असलेल्या चातुर्मास पर्वकाळानिमित्त आयोजित प्रवचन मालेत प.पू.डॉ. सुप्रियाजी बोलत होत्या. यावेळी तप रत्नेश्वरी ... ...

विठुरायाचे ‘लाइव दर्शन’ही आता एका क्‍लिकवर जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केले “पालखी सोहळा 2017 ऍप’ – 12 जूनपासून ‘प्ले स्टोअर’ उपलब्ध असेल मोबाइल ऍप पुणे – आषाढी वारीमध्ये विठ्ठल-रखुमाईचा गजर करता पंढपूरकडे वारकरी मार्गस्थ होतात. या काळात लाडक्‍या विठ्ठल-रखुमाईचे ‘लाइव दर्शन’ घेता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने “पालखी सोहळा-2017′ मोबाइल ऍप विकसित केले आहे. या माध्यमातून वारकरी कधीही विठ्ठल-रखुमाईचे ‘लाइव दर्शन’ घेऊ शकणार आहेत. सोबतच या ऍपवर वारकऱ्यांना वारीच मार्ग, विसावा आणि मुक्कामेच ठिकाण, वैद्यकीय सुविधा, व्यवस्थापन आणि सूचनांची माहिती मिळणार आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी तब्बल दहा लाख वारकरी येतात. त्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासन दरवर्षी माहिती पुस्तिका छापते. यामध्ये वारीशी संबधित सर्व माहिती असते. या वर्षी माहिती पुस्तकासह मोबाइल ऍपची सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केली आहे. 16 जून ते 9 जुलैदरम्यान पार पडणाऱ्या आषाढी वारीसाठी जिल्हा आपत्ती ... ...

महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा मुंबई : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.महावीर जयंती भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, विश्वशांती व अनेकांताच्या संदेशाचे स्मरण देते. मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषत: जैन बंधू-भगिनींना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. ...

सिद्धेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त आज  भव्य पशु व अश्व प्रदर्शन लातूर   :  ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवारी ( दि. २८ ) पशु संवर्धन विभाग , जिल्हा परिषद , पंचायत समिती लातूर व श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने भव्य पशु व अश्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.   या पशु प्रदर्शनामध्ये देवणी नर  व मादी गट , लालकंधारी नर व मादी गट , संकरित वासरू गट या  पशुना सहभागी करून घेतले जाणार आहे. पशूंचा वयोगट शून्य ते एक वर्षापर्यंत आणि एक वर्षाच्या पुढे असा असणार आहे.   अश्व गटात सहभागी होणारे अश्व १३ हाताखालील व १३ हातावरील असावेत. कुक्कुट गटात देशी व विदेशी असे दोन गट सहभागी  करून घेतले जातील.  शेळी गटात तीन पिल्ले देणारी उस्मानाबादी शेळी असणार्‍या पशुपालकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवावा. प्रत्येक गटातील पशूंना प्रथम ,द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत.  या पशु प्रदर्शनात जास्तीत जास्त पशुपालकांनी ... ...