वारकरी संप्रदायाचा अभिमान बाळगा- कृष्णा महाराज आरगडे काल्याचे किर्तन, महाप्रसादाने तःपपूर्ती महोत्सवाचा उत्साहात समारोप औरंगाबाद : काल्याचे किर्तन म्ळणाजे भगवान, परमात्म्याचे चरित्र उच्चारण आहे. साधना केल्याने त्या परमात्म्याचे दर्शन, भक्ती ही वाढणारी असते. परमात्म्याकडे जाण्यासाठी कोणताही भेदभाव नाही. त्यामुळे त्या परमात्म्याची सेवा करतांना वारकरी संप्रदायाचा अभिमान बाळगा असे मत हभप. कृष्णा महाराज आरगडे, बार्शीकर यांनी केले.    विष्णूनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी महादेव मंदिरात रामकृष्ण हरि सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्‍ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी बार्शी येथील श्री कृष्णा महाराज आरगडे यांच्या काल्याचे किर्तनाचे आयोजन आज करण्यात आले होते. याप्रसंगी रामकृष्ण हरी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड, तपःपूर्ती महोत्सवाचे ... ...

त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज मंदिर पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणार-महाजन पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा नाशिक : निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.   त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची पालकमंत्री श्री.महाजन यांनी पत्नी साधनाताई यांच्यासह आज पहाटे शासकीय महापूजा केली. यावेळी ते बोलत होते. पूजेप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, आमदार निर्मला गावित, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, श्रीकांतजी भारती, उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, मुख्याधिकारी चेतना केरुरे तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   श्री.महाजन म्हणाले, येथील पावित्र्य व ... ...

श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा   शारदीय नवरात्र महोत्सव-२०१७ उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात बुधवार २७ सप्टेंबर रोजी सातव्या दिवशी तुळजापूरात श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. राज्य व परराज्यातील चालत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. प्रशासनाच्या चोख व्यवस्थापनामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता चांगल्या पद्धतीने दर्शन घेता येत आहे. श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आशिर्वाद दिला होता, म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, ही अवतार पूजा मांडण्यात येते. ...

श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात मंगळवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेषशय्येवर विश्राम घेत असताना मातेने नेत्रकमळात जाऊन विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन दैत्य उत्पन्न झाले, त्यांची नावे शुंभ व निशुंभ होती, ते उत्पन्न होताच शेषशय्येवर विष्णूवर आक्रमण करण्यासाठी जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्रकमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करुन श्रीस जागविले व विष्णूवर आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने ... ...

श्री तुळजाभवानी देवीजींच्या मंचकी निद्रेस प्रारंभ उस्मानाबाद- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस बुधवार, 13 रोजी रात्री प्रारंभ झाला. देवीजींची मूर्ती विधीवत पूजन करुन शेजघरातील पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. देवीजींची मंचकी निद्रा अश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत म्हणजेच 21 सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत राहील. 21 सप्टेंबर रोजी पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना आणि दुपारी विधीवत घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.  शारदीय नवरात्र महोत्सव काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंधप्रदेश, तेलंगणा तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक देवीजींच्या दर्शनासाठी येतात. त्यादृष्टीने शारदीय नवरात्र महोत्सवाची लगबग सध्या सुरु आहे. महोत्सव कालावधीत दर्शनासाठी येणार्‍या भ्नतांची संख्या लक्षात घेता नगर पालिकेच्यावतीने स्वागतकमानी, सर्व प्रमुख मार्ग आणि वाहनतळावर लाकडी बॅरिकेड्स उभारण्याचे काम हाती घेण्यात आले ... ...

बाप्पा! पुढच्या वर्षी लवकर या… हैदराबाद : १२ दिवसांच्या पाहुणचार घेतल्यानंतर भाविकांचा लाडका बाप्पा आज विसर्जनासाठी निघाले आहेत. मुंबई, पुण्यासह संपूर्ण देशभरात घरगुती बाप्पांसह सार्वजनिक मंडळातील बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जात आहे. महाराष्ट्रसह गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, दिल्लीतील काही ठिकाणी आज सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. हैदराबाद मध्ये आज सकाळ पासून बाप्पांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. विसर्जन मिरवणुकी दरम्यान कसल्याही प्रकरचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीची विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. हैदराबादमधील प्रसिद्ध खैरताबाद येथील बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन यंदा मंडळाने विसर्जन मिरवणुकीला सकाळी ७ वाजल्यापासूनच सुरुवात केली आहे. ५७ फुट उंचीच्या बाप्पाच्या या भव्य ... ...

भक्तीभावानं बाप्पाची प्रतिष्ठापना औरंगाबाद -गणपती बाप्पा मोरया चा गगनभेदी जयघोष, वरुणराजाने दिलेली सलामी, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीत आज गणरायाचे आगमन झाले. गुरुवारी सायंकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाने शहरातील रस्ते फुलून गेले होते. लहान-थोरांनी मोठ्या भक्तीभावानं बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली.अनेक मंडळांनी सकाळीच भव्य मिरवणूकीने गणरायचे स्वागत केले तर घराघरांमध्ये धार्मिक वातावरणात गणेशाची विधिवत पुजा करुन स्थापना करण्यात आली. आज पासून सुरु झालेला हा उत्सव आता बारा दिवस रंगत जाणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी गेल्या पंधरा दिवसांपासूनच जय्यत तयारी सुरू होती. आजच्या दिवसाची वाट पाहणाऱ्या सर्वच गणेशभक्तांनी अगदी पारंपारिक वेषात बाप्पाचे स्वागत केले. शहराच्या मध्यवस्तीमधील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. उत्सवाच्या काळात शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला ... ...