सीएमएः कॉर्पोरेट फायनान्समधील महत्‍त्वपूर्ण करिअर कमी वेळ व कमी खर्चामध्ये करता येणारा कोर्स म्हणून सी.एम.ए. आयसीएआय कोर्सची ओळख झाली आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येतो. सीए कोर्सप्रमाणेच सीएमए म्हणजेच 'कॉस्ट अॅँड मॅनेजमेंट' अकाऊटंट कोर्सविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. सीएएमच्या कामाचे स्वरुपः आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. उद्योग- व्यवसायाच्या प्रचंड स्पर्धेमध्ये ग्राहकांना कमी किंमतीमध्ये चांगल्या गुणवत्‍तेचे सेवा व उत्पादन हवे असते. कच्‍च्या मालाचे वाढते भाव, कामगारांचे वेतन, भत्‍ते, उद्योगाला लागणा-या इतर सेवांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता, उत्पादनाची किंमत वाढवणे आजच्या युगात शक्य नाही. उत्पादन खर्च कमी करणे (कॉस्ट रिडक्‍शन) हा एकमेव पर्याय यावेळी उरतो. सीएमएची उपयुक्तता इथेच स्पष्ट होते. म्हणूनच या कोर्सचे महत्‍त्व असून येत्या काळात देशाला दरवर्षी ५० हजार सीएमएची गरज भासणार आहे. ...... ...

विमान उड्डाणाच्या प्रशिक्षणासाठी १२ एपिलपर्यंत अर्ज करावेत मुंबई : देशातील तरुणांना विमान उड्डाणाचे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने दि. 07 नोव्हेंबर, 1985 रोजी उत्तर प्रदेशातील अमेथी जिल्ह्यातील फुरसतगंज येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमी स्थापन करण्यात आली. ही अकादमी भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारित असून स्वायत्तपणे कामकाज करते. अकादमीचे कामकाज पाहण्यासाठी कार्यकारी मंडळ नेमले असून भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या खात्याचे सचिव पदसिद्ध अध्यक्ष असतात तर अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती सदस्य म्हणून कार्यरत असतात. या संस्थेच्या शिक्षणाचा दर्जा जागतिक स्तराचा असून संस्थेने कॅनडा मधील कॅनेडियन ॲव्हीएशन इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेसमवेत सामंजस्य करार केला आहे. या संस्थेत आतापर्यंत अफगाणिस्तान, नेपाळ,मॉरिशस, झांबिया, सिशेलीस आदी ... ...

राज्यातील उच्च शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी  सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय  मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये विशेष सोयी सवलती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शनिवारी घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सवलती प्राप्त होणार आहेत. यामध्ये प्रत्येक दिव्यांगाच्या वर्गवारीनुसार त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालये, विद्यापीठे यांची राहणार आहे. दिव्यांगामुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणाची दारे उघडली जाणार आहेत. उच्च शिक्षणाच्या समन्यायी वाटपासाठीचे हे शासनाचे एक प्रमुख व महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेला हा निर्णय राज्यातील सर्व विद्यापीठांमधील, महाविद्यालयामधील ... ...