कारागृहांमध्ये सॅनिटरी वेन्डिंग मशीन तर शाळांमध्ये आरोग्य रक्षक पेढी - विजया रहाटकर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे मंत्रालयात जागतिक महिला दिन साजरा मुंबई दि. ८: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिलांना स्वाभिमान मिळवून देणाऱ्या अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे महिलांमधील मासिक पाळीसंदर्भातला संकोच कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळेच येणाऱ्या काळात राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सॅनिटरी वेन्डिंग मशीन आणि शाळांमध्ये आरोग्य रक्षक पेढीसाठी राज्य महिला आयोग सक्रिय होणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज सांगितले.   जागतिक महिला दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाअंतर्गत दुर्गा महिला मंचाच्यावतीने मंत्रालयातील परिषद सभागृहात एका ... ...

महिलांच्या कर्करोगाचे प्राथमिक टप्प्यात निदान करण्यावर भर- गिरीष महाजन मुंबई, दि. ८ : महिलामध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असून या आजाराला वेळेवर नियंत्रित करण्यासाठी कर्करोगाचे प्राथमिक टप्प्यात निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी कर्करोगाच्या प्राथमिक निदानासाठी शासकीय रूग्णालयात बाह्यरूग्ण विभाग सुरू होणे आवश्यक आहे. जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कर्करोग जागृती शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी जागतिक महिला दिनानिमित्त केले.   ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जे. समूह रुग्णालये मुंबईच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर ज.जे. समूह रूग्णालय येथे कर्करोग बाह्य रूग्ण विभागाचे उद्घाटन आणि कर्करोग जागृती शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ... ...

उद्योग-व्यवसायात महिलांचा सहभाग वाढावा- सुभाष देसाई जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण महिला उद्योजकांचा सत्कार मुंबई, दि. ८: उद्योग व्यवसायात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.   ते मंत्रालयात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित ग्रामीण महिला उद्योजिकांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे चेअरमन विशाल चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रिचा बागला उपस्थित होत्या.       श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्रातील उद्योग ... ...

राज्य महिला आयोगाकडून महिलांसाठी 'सुहिता' हेल्पलाइन पीडित महिलांचे समुपदेशन करणारी देशातील पहिली हेल्पलाइन मुंबई, दि. ८  :  कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अनेक अन्यायाला बळी पडणाऱ्या आणि त्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या महिलांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने 'सुहिता' या नावाची समुपदेशन हेल्पलाइन कार्यान्वित केली. या कार्यक्रमात बोलताना आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आयोगामध्ये लवकरच मानवी तस्करीविरोधात (ह्यूमन ट्रॅफिकिंग) विशेष कक्ष सुरू करण्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये संकटग्रस्त, अन्यायग्रस्त महिलांसाठी अतीव उपयोगी ठरू शकते, अशी समुपदेशन हेल्पलाइन कार्यान्वित करण्याचा सोहळा गुरूवारी आयोगाच्या ... ...

गेल्या ६६ वर्षात संसदेत ८१८ महिला खासदार नवी दिल्ली, दि. ७ : भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत गेल्या ६६ वर्षात ८१८ महिला खासदार निवडून आल्या आहेत, यामध्ये लोकसभेच्या ६३२ तर राज्यसभेच्या १८६ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेत गेल्या ६६ वर्षात २१ महिला खासदारांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे. सन १९५२ पासून आजतागायत देशात १० हजार ९७० खासदार निवडले गेले आहेत, यामध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या खासदारांची संख्या ही ८८५५ इतकी आहे तर  २११५ खासदार राज्यसभेवर निवडून गेले आहेत.    महाराष्ट्रातून ४६ महिला खासदार लोकसभेत महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून ते आजपर्यंत महाराष्ट्रातून ६८७ खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत, यामध्ये ४६ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेवर आजतागायत निवडल्या गेलेल्या २११५ खासदारांपैकी महाराष्ट्रातून १५१ खासदार निवडले गेले, यामध्ये महाराष्ट्रातील १४ महिला खासदारांचा ... ...

महिला मंत्री, आमदार, पत्रकारांच्या उपस्थितीत मासिक पाळी, सॅनिटर पॅडसंदर्भात प्रबोधनासह चर्चासत्र जागतिक महिला दिन विशेष मुंबई, दि. ७ : महिलांची मासिक पाळी, सॅनिटरी पॅड यासंदर्भात असलेला संकोच दूर होणे गरजेचे आहे. महिलांना मासिक पाळीच्या काळात ४ दिवसासाठी वर्षानुवर्षे उंबरठ्याच्या आत डांबण्यात आले. आता ग्रामविकास विभागाच्या अस्मितासारख्या योजनेतून या विषयावर किमान चर्चा होत आहे. मासिक पाळी, सॅनिटर पॅड यांसारख्या विषयावर महिलांना विनासंकोच बोलता आले पाहिजे. अस्मिता योजनेतून हे निश्चितच साध्य होईल, असा विश्वास विधानभवनातील पत्रकार कक्षात आज झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आला. ग्रामविकास आणि महिला - बालविकासमंत्री पंकजा मुंडे, महिला आमदार आणि पत्रकारांच्या उपस्थितीत आज ही चर्चा झाली.   मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ आणि राज्य शासनाच्या महिला - ... ...

राज्यात  सुरु होणार अस्मिता योजना महिला दिनानिमित्त राज्य शासनाची भेट  मुंबई, दि. ७ : ग्रामीण भागातील मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणाऱ्या अस्मिता योजनेचा शुभारंभ उद्या जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या योजनेतून ग्रामीण भागातील मुलींना फक्त ५ रुपयांत ८ सॅनिटरी नॅपकिन्स मिळणार आहेत.    उद्या दुपारी ०१.३० वाजता मुंबई विद्यापीठातील कॉन्व्होकेशन हॉल येथे होणाऱ्या या समारंभात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी  राणा कपूर हेही उपस्थित राहणार आहेत.    स्वच्छतेबरोबर महिलांना रोजगारही मिळणार – मंत्री पंकजा ... ...