डॉ. मृणालिनी फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त‍ी मुंबई, दि. ३ : नागपूर येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. (श्रीमती) मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गुरुवारी (दिनांक ३) डॉ. फडणवीस यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा त्या वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे. डॉ. एन. एन. मालदार यांचा  कुलगुरूपदाचा कार्यकाळ दिनांक १० डिसेंबर २०१७ रोजी संपल्यापासून हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा ... ...

कास्टिंग काऊचमधून महिला खासदारही सुटल्या नाहीत: रेणुका चौधरी नवी दिल्ली: कास्टिंग काऊचबाबत बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण प्रतिक्रिया आली आहे ती म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्या   रेणुका चौधरी यांची. “कास्टिंग काऊच केवळ फिल्म इंडस्ट्रीमध्येच होतं असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी होतं. महिला खासदार यातून सुटलेल्या आहेत असं समजू नये. त्यामुळे आता हा मुद्दा उपस्थित करुन, देशाने एकत्र होणं गरजेचं असून, Me Too अर्था मी सुद्धा पीडित आहे”, असं म्हणायला हवं, असे रेणुका चौधरी म्हणाल्या. दरम्यान, या पूर्वी सरोज खान यांनी “हे प्रकार तर बाबाआदमच्या जमान्यापासून सुरु आहेत. कोणी ना कोणी प्रत्येक मुलीवर हात साफ करण्याचा प्रयत्न करतं. सरकारी खात्यातील लोकही करतात. मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या मागे का लागला आहात? ती किमान रोटी तरी ... ...

रेश्मा शेट्ये प्रकरणात बांधकाम विभागाचे अभिप्राय घेण्याचे विद्या ठाकूर यांचे निर्देश मंत्रालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन मुंबई, दि. १० : रेश्मा राजन शेट्ये यांच्या प्रकरणासंदर्भातील पुढील सुनावणी करताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अभिप्राय घेण्याचे निर्देश महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी राज्य महिला आयोगाचे सदस्यांना दिले.    राज्यातील महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आज मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी बृहन्मुंबईच्या सहपोलीस आयुक्त अर्चना त्यागी शर्मा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सदस्य यांच्यासह महिला व बाल विकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या, श्रीमती रेश्मा राजन शेट्ये यांनी महिला आयोगाकडे त्यांच्या प्रकरणाबाबत ... ...

फिक्की महिला संघटनेच्यावतीने महाराष्ट्रातील ३ महिलांचा सन्मान नवी दिल्ली दि. ५ : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (फिक्की) च्या महिला संघटनेच्यावतीने आज महाराष्ट्रातील विशेष महिला उद्योजक कमल कुंभार, लेखक, स्तंभकर, चित्रपट निर्माती तसेच इंटेरीयर डिझायनर ट्विंकल खन्ना, चित्रपट आणि दूरचित्रवाणी निर्माती एकता कपूर यांना आज दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.   येथील विज्ञान भवनात फेडरेशन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री (फिक्कीच्या)च्या महिला संघटनेच्या ३४ व्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ३ महिलांचा समावेश होता. या कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद, फिक्कीचे अध्यक्ष रमेश शाह, फिक्कीच्या महिला संघटनेच्या अध्यक्षा वासवी ... ...

महिला सक्षमीकरणासाठी राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी 'सक्षमा' केंद्र उभारावे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे निर्देश मुंबई: महिला सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करत राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्त्री संसाधन केंद्र उभारावे असे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सर्व महापालिका तसेच जिल्हा परिषदाना दिले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन अविरत प्रयत्नशील आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपला वाटा उचलला पाहिजे. त्यादृष्टिकोनातून स्थानिक स्वराज संस्थांनी सक्रिय सहभाग घेत स्त्री संसाधन केंद्र (जेंडर रिसोर्सेस सेंटर) उभारावे. त्यास ‘सक्षमा कक्ष’ असे नाव देता येऊ शकेल असे आयोगाने आपल्या निर्देशात ... ...

क्षमता बांधणी कार्यक्रमाव्दारे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करणार-विजया रहाटकर औरंगाबाद, दि.26 --महिलांच्या सुरक्षित, सन्मानित जगण्यासाठी राज्य महिला आयोग विविध उपक्रम राबवत असून, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या सक्षमिकरणासाठी क्षमता बांधणी, प्रशिक्षणाचे विशेष कार्यक्रम  महिला आयोग या क्षेत्रात कार्यरत स्वंयसेवा संस्थांच्या सोबतीने राबविणार असल्याचे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी येथे सांगितले. महसूल प्रबोधिनी येथे राज्य महिला आयोग,विभागीय आयुक्त कार्यालय आणि महिला किसान अधिकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतक-यांचे प्रश्न या  दोन दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी विजया रहाटकर बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी तृप्ती ढेरे, मकामच्या सिमा कुलकर्णी यांच्यासह ... ...

महिलांसाठी औद्योगिक धोरण आणणारे  महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य - उद्योगमंत्री सुभाष देसाई मुंबई, दि. २६ : महिला परिचालित उद्योगांचे प्रमाण 9 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत सुधारण्यासाठी राज्याने महिला उद्योजिकांसाठी विशेष औद्योगिक धोरण आणले आहे. असे धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे गौरवोद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला काढले.   श्री. देसाई पुढे म्हणाले, महिला उद्योजिकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी डिसेंबर 2017 मध्ये जाहीर करण्यात आले होते, यावर राज्यातील उद्योजिकांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आलेल्या प्रस्तावांसाठी निधीची तरतूद करण्यात येईल. उद्योगांमध्ये शंभर टक्के महिलांची भागिदारी असावी, कर्मचारी संख्या ही किमान 50 टक्के महिलांची असावी अशा अटी शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. भांडवली अनुदान, वीज अनुदान, उबवण केंद्र, साहस भांडवल निधी,  तसेच प्रदर्शन आणि विपणनासाठी विशेष प्रोत्साहन ... ...