काजळ न पसरण्यासाठी हे काही सोपे टिप्स बहुतेक मुलींना काजळ लावायला खूप आवडते. काजळ लावल्याने डोळे मोठे आणि सुंदर दिसतात. अनेक मुलींवर तर काजळ इतके छान जिसते की एक दिवस जरी काजळ लावले नसेल तरी चेहरा वेगळाच दिसतो. पण काजळ लावणेही एक कला आहे. काजळाचा स्ट्रोक तुम्ही कसा लावतात याला खास महत्त्व आहे. काजळ पसरणे ही बऱ्याच मुलींची समस्या असते. अशावेळी काजळ कसे लावावे ज्याने ते पसरणार नाही यासाठी खाली काही टिप्स दिले आहेत. 1. काजळ लावण्याअगोदर चेहरा टोनरने साफ करा. यामुळे त्वचेवरील तेल निघून जाईल आणि काजळ कमी पसरेल. 2. काजळ लावण्याअगोदर डोळ्यांच्या खाली थोडी पावडर लावा. स्पंज अथवा ब्रशची यासाठी मदत घ्या.  3. नेहमी वॉटरप्रुफ काजळ लावा. हे काजळ पसरतही नाही आणि खूप वेळ टिकतेही. 4. आयलाईनर लावून काजळ लावल्याने हे कमी पसरते.   ...