शारदीय नवरात्र महोत्सव तोंडावर; प्रशासनाकडून हालचाली ठप्प भवानीतीर्थ कुंड कुलूपबंद ,कायमस्वरुपी भक्तांच्या  सेवेत कार्यान्वित ठेवावी उस्मानाबाद- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सव तोंडावर आलेला असताना प्रशासनाकडून भाविकांसह भक्तांना  नागरी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अद्याप नियोजनाला सुरुवात झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे यात्रेत भक्तांचे  हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भक्तांच्या स्नानासाठी ११ कोटी रुपये खर्चून उभारलेले भवानीतीर्थकुंड महोत्सवातील दहा दिवस वगळता कुलूपबंद असते.हे कायमस्वरूपी सुरु करण्याची मागणी केली जात आहे . शारदीय नवरात्र महोत्सवास महोत्सवास २१ सप्टेंबर रोजी विधीवत घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी १३ सप्टेंबर रोजी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे. २१ सप्टेंबर रोजी पहाटे मंचकी निद्रा संपल्यानंतर देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होऊन शारदीय नवरात्र ... ...

आलुरे गुरुजी यांच्या नागरी सत्कार सोहळ्याची अणदूर येथे जय्यत तयारी. उस्मानाबाद - माजी आमदार, शिक्षणमहर्षि सि. ना. आलुरे गुरुजी यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त बुधवार, 6 सप्टेंबर रोजी अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच गुरूजींची शैक्षणिक,सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कामगिरी व जीवनकार्यावर आधारित ‘परीस’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या भव्य गौरव सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती गौरव समितीचे अध्यक्ष आमदार मधुकर चव्हाण यांनी दिली. आलुरे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी सकाळी 11 वाजता आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाची आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले. आलुरे गुरुजी यांच्यामुळे अणदूरसारख्या गावामध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर कुटूंबातील मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली. अणदूरच्या शाळेची महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी ... ...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार,दोघा नराधमांना अटक.   उस्मानाबाद - एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी वेगवेगळे अमिष दाखवून वर्षभरापासून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावात घडली आहे. या प्रकरणातील पीडिता 7 महिन्याची गरोदर आहे तिने दिलेल्या तक्रारीवरून मुरूम पोलिसानी दोन्ही नराधमाना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुरुवारी पोस्कोसह वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आले आहे.   केसरजवळगा गावातील सुधाकर मल्लिनाथ साखरे तसेच प्रशांत कलकेरी असे आरोपींचे नावे आहेत. यातील साखरे हा पीडित मुलीला तुझ्यावर प्रेम करतो ,तुला पाहिजे ते देतो असे सांगून तिच्यावर डिसेंम्बर २०१६  पासून बलात्कार करत राहिला तर नराधम प्रशांत करकेरीने पिडीताला मोबाईल देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे .गावातील एका किराणा दुकानात आणि शेतात अशा ठिकाणी बलात्कार केल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने आपल्या आई व नातेवाईकासोबत मुरूम पोलिसात येवून तक्रार दिली आहे. या ... ...

मोटारसायकलची समोरासमोर टक्कर , पोलिसासह दोघे ठार, एक गंभीर   उस्मानाबाद- वळण रस्त्यावर मोटारसायकलींची समोरासमोर भीषण ट्नकर होऊन झालेल्या अपघातात पोलिस  कर्मचार्‍यासह दोघेजण जागीच ठार तर एकजण जखमी झाला.  मुरुम-आष्टाकासार रस्त्यावर मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी दुपारी हा अपघात घडला. मयत पोलीस कर्मचारी उस्मानाबाद तर अन्य एकजण उमरगा तालु्नयातील रहिवाशी आहे.  मुरूम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी एस. एम. बोंदर (वय 43, रा. उतमी कायापूर, ता. उस्मानाबाद) हे आष्टाकासार मार्गे मुरूम पोलीस ठाण्याकडे जात होते. दरम्यान, अब्दुलरब महंमद सन्नाटे (वय 40 रा. मुरूम, ता.  उमरगा) हे मोटारसायकलवरुन शेताकडे जात होते. दोघांच्या मोटारसायकलींची आष्टाकासार-मुरुम रस्त्यावरील वळणावर समोरासमोर भीषण ट्नकर झाली. या अपघातात पोलीस बोंदर आणि सन्नाटे हे दोघे जागीच ठार झाले. तर सन्नाटे यांच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला सचिन वाकळे हा जखमी झाला. या अपघाताची मुरूम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...

पर्यटकांसाठी पर्वणी; मादी धबधबा कोसळू लागला.. लवकरच नर धबधबाही ओसंडणार उस्मानाबाद - पावसाळी पर्यटकांसाठी खास आकर्षण असलेल्या नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधब्यापैकी मादी धबधबा सोमवारी झालेल्या दमदार पावसानंतर कोसळू लागला आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे लवकरच नर धबधबा देखील ओसंडून वाहण्याची श्नयता आहे. यंदा सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉन या कंपनीने किल्ल्याचे रुपडे पालटून टाकल्यामुळे किल्ल्याच्या सौंदर्यात कमालीची भर पडली आहे. त्यातच यंदाही नर-मादी धबधब्याकडे डोळे लावून बसलेल्या पर्यटकांना लवकरच किल्ल्यात दोन्ही धबधब्यांसह किल्ल्यातील मनोरंजनाच्या साधनांचा आनंद लुटता येणार आहे.  भुईकोट किल्ल्यांपैकी विस्तीर्ण क्षेत्रावर उभारण्यात आलेला नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातील लाखो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. अनेक वर्षापासून किल्ल्याच्या डागडुजीकडे फारसे लक्ष न  दिल्याने मोठी दूरवस्था झाली होती. दरम्यान, सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉन ... ...

डीसीसीचे वरातीमागून घोडे रब्बीच्या तोंडावर खरीपासाठी कर्जाचे गाजर; अवघ्या दोन दिवसांची मुदत उस्मानाबाद- रब्बी, खरीप हंगामातील पीकविमा वाटपातील गोंधळ आणि पीकविमा हप्ता भरण्यासाठी लागलेल्या प्रचंड विलंबानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेने रब्बी हंगामाच्या तोंडावर खरीप हंगामासाठी 10 हजार रुपये कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 10 हजाराच्या कर्जासाठी अवघ्या दोन दिवसाची म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत मुदत ठेवण्यात आली आहे. लाखो सभासद शेतकरी आणि केवळ दोन दिवसाची मुदत आणि अपुरा कर्मचारी वर्ग त्यातच ऑनलाईनचा खोळंबा यामुळे जिल्हा बँकेला मोठी कसरत करावी लागणार आहे.  खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच जून महिन्यात शेतकर्‍यांनी पुकारलेल्या ऐतिहासिक संपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करतानाच शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी 10 हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचे जाहीर केले होते. या घोषणेमुळे आर्थिक संकटाच्या खाईत लोटलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र ... ...

उस्मानाबादच्या पावणारा गणपती मंडळाने पतंगातून साकारली गणरायाची मूर्ती उस्मानाबाद - दरवर्षी इतरांपेक्षा वेगवेगळे प्रयोग करणार्‍या शहरातील पावणारा गणपती गणेश मंडळाने यंदा च्नक पतंगाच्या साह्याने गणरायाची मूर्ती साकारली आहे. एकुण 27 पतंगाचा वापर करुन साकारलेली ही गणेशमूर्ती भ्नतांचे लक्ष वेधून घेत आहे. अतिशय कल्पकतेने साकारलेल्या या मूर्तीसाठी महिनाभराचा कालावधी लागल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले.  शहरातील नेहरू चौकालगत असलेल्या पावणारा गणपती गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध साहित्याचा उपयोग करून गणेशमूर्ती तयार केल्या जातात. संसारोपयोगी भांडी, धान्यासह एकाच प्रकारच्या साहित्याचा  वापर करुन केलेल्या गणेशमूर्ती भ्नतांचे लक्ष वेधून घेतात. यावर्षी मंडळाने चक्क पतंगांचा वापर करून चार फूट उंचीची गणेशमूर्ती तयार केली आहे. संगणक अभियंता असलेले मंडळाचे कार्यकर्ते संदीप मैंदरकर यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या मूर्तीसाठी सागर कठारे, हेमंत कठारे यांनी ... ...